शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत

शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत - या शासन निर्णयान्वये माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये हिंदी विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या अधिकारी/कर्मचारी यांनी  एतदर्थ मंडळाची उच्च व निम्नश्रेणी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली तसेच डिसेंबर, १९६६ नंतर आणि दि.२४ नोव्हेंबर, १९७७ पूर्वी हिंदी भाषेची परीक्षा घेणा-या खाजगी संस्थांच्या परीक्षांना समकक्ष म्हणून दिलेली मान्यता काढण्यात आली आहे. शासन निर्णय क्र.हिंभाप-१०८०/१३१/वीस,दि.२५ मे, १९81.

0 Comments

मराठी मातृभाषा असलेल्यांना एतदर्थ मंडळाची मराठी उच्चश्रेणी व निम्नश्रेणी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत

मराठी मातृभाषा असलेल्यांना एतदर्थ मंडळाची मराठी उच्चश्रेणी व निम्नश्रेणी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत - हिंदी मातृभाषा असलेल्या अधिकारी/कर्मचारी  यांना एतदर्थ मंडळाची हिंदी उच्चश्रेणी व निम्नश्रेणी परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत हिंदी मातृभाषेचे निकष ठरविण्यासाठी मराठी मातृभाषेसंदर्भातील दि.१० फेब्रुवारी, १९७८ अन्वये ठरविण्यात आलेले निकष लागू असल्याने मराठी भाषेतील शासन निर्णय उपलब्ध करुन देण्यात येत आहे. शासन निर्णय.मभाप-१५७७-२८,दि.१० फेब्रुवारी,१९७८.

0 Comments

खाजगी संस्थांमार्फत घेतल्या जाणा-या हिंदी भाषा परीक्षांची एतदर्थ मंडळाच्या उच्च व निम्न श्रेणी परीक्षांशी समकक्षता ठरविणेबाबत

खाजगी संस्थांमार्फत घेतल्या जाणा-या हिंदी भाषा परीक्षांची एतदर्थ मंडळाच्या उच्च व निम्न श्रेणी परीक्षांशी समकक्षता ठरविणेबाबत.- या शासन निर्णयान्वये ज्या  खाजगी संस्थांमार्फत हिंदी भाषा परीक्षा घेतल्या जातात, अशा संस्थांची यादी परिशिष्टामध्ये जोडून त्यामध्ये संस्थानिहाय एतदर्थ मंडळाच्या उच्च व निम्न श्रेणी परीक्षांशी समकक्ष अशी  मान्यता देण्यात आली आहे. शासन निर्णय क्र.हिंभाप-१९७६/४६१/२८,दि.२४ नोव्हेंबर, १९७७.

0 Comments

अहिंदी भाषिक राज्यामध्ये असलेल्या केंद्र शासनाच्या कार्यालयात नामफलक, सूचनाफलक, निर्देशफलक इ. हिंदी व इंग्रजी भाषेबरोबरच स्थानिक लोकांना समजण्यासाठी प्रादेशिक भाषेतही असावेत.

अहिंदी भाषिक राज्यामध्ये असलेल्या केंद्र शासनाच्या कार्यालयात नामफलक, सूचनाफलक, निर्देशफलक इ. हिंदी व इंग्रजी भाषेबरोबरच स्थानिक लोकांना समजण्यासाठी प्रादेशिक भाषेतही असावेत.  त्यांचा क्रम, (१) प्रादेशिक भाषा  (२) हिंदी व (३) इंग्रजी असा असावा.  तसेच सर्व भाषेतील लिपीतील अक्षरे सारखी असावीत, अशी तरतूद या नियमान्वये करण्यात आली आहे.   अशा प्रकारे त्रिभाषा सुत्राचा पुनरुच्चार या ज्ञापनान्वये करण्यात आला आहे. केंद्र शासनाचे ज्ञापन क्र.१-14013/५/७6-ओ.एल. (अे-1),दि.१८ जून, १९७७.

0 Comments

राज्य शासकीय कर्मचा-यांनी उत्तीर्ण व्हावयाच्या हिंदी भाषा परीक्षा, नियम, पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तके

राज्य शासकीय कर्मचा-यांनी उत्तीर्ण व्हावयाच्या हिंदी भाषा परीक्षा, नियम, पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तके - या शासन निर्णयान्वये पूर्वीच्या नियमांमध्ये, अभ्यासक्रमांमध्ये काही फेरबदल करण्यात आले आहेत. शासन निर्णय क्र.हिंभाप-१९७६-२८, दि.१०जून, १९७६.

0 Comments

ऑफिशियल लँग्वेज रुल्स, १९७६

ऑफिशियल लँग्वेज रुल्स, १९७६ - केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यातील संवादाची भाषा तसेच केंद्रीय कार्यालयातील परस्परांमधील संवादाची भाषा, इ. बाबी या नियमात नमूद करण्यात आल्या आहेत.   तसेच नामफलक, सूचनाफलक, निर्देशफलक इ. हिंदी व इंग्रजी भाषेत असावेत. अशी तरतूद या नियमात असली तरी, केंद्रशासनाला आवश्यक वाटल्यास एखाद्या केंद्रीय कार्यालयास या नियमातून सूट देऊ देता येईल, अशी तरतूद या नियमातील 11 (3) अन्वये करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या राजभाषा विभागाचे नियम क्र.जी.एस.आर.१०५२

0 Comments

अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी मराठी भाषेच्या परीक्षा

अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी मराठी भाषेच्या परीक्षा-  महाराष्ट्र राज्यात समाविष्ट असलेल्या जुन्या मुंबई राज्यातील तसेच पूर्वीच्या मध्यप्रदेशातील व हैद्राबाद राज्यातील अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी प्रादेशिक भाषा परीक्षा नियमावलीत एकसूत्रता आणून सगळयांसाठी समान भाषा परीक्षा नियमावली या शासन निर्णयान्वये तयार करण्यात आली आहे. शासन निर्णय क्र. मभाप-1569/20990-म, दि.21 जून, 1969

0 Comments

केंद्रशासनाचे भाषेसंदर्भातील नियम तसेच राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये/सार्वजनिक उपक्रम इ. करीता केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीचे आदेश

मनी ऑर्डर फॉर्म आणि लोकांद्वारे उपयोगात आणल्या जाणा-या वेगवेगळ्या अर्जांचे नमुने प्रादेशिक भाषेत छापण्याबाबत - सदर निर्णयाद्वारे केंद्रीय  कार्यालयात भरावे लागणारे विविध अर्जांचे नमुने स्थानिक जनतेच्या सोयीसाठी  प्रादेशिक भाषेत छापण्याच्या सूचना त्रिभाषा सुत्राच्या अनुषंगाने देण्यात आल्या आहेत. शासन निर्णय क्र.७/९/६५/ओएल दि.२५.३.१९६८.

0 Comments

केंद्रशासनाचे भाषेसंदर्भातील नियम तसेच राज्यातील केंद्र शासनाची कार्यालये/सार्वजनिक उपक्रम इ. करीता केंद्र शासनाच्या त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीचे आदेश

दि ऑफिशियल लँग्वेज रिझोल्युशन,  १९६८- सदर निर्णयान्वये देशाच्या विविध भागातील लोकांना केंद्रशासनाशी संवाद साधणे सोपे व्हावे यासाठी हिंदी,  इंग्रजी यासह स्थानिक जनतेच्या भाषेचाही प्रशासकीय कामकाजात समावेश करण्याबाबतचे  त्रिभाषा सुत्र पहिल्यांदाच  स्विकारण्यात आले आहे. केंद्र  शासनाच्या गृह विभागाचा शासन  निर्णय क्र.एफ/४/८/६५/ओएल,दि.१८ जानेवारी, १९६८

0 Comments

राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी मराठी भाषेच्या परीक्षा-

राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी मराठी भाषेच्या परीक्षा-  महाराष्ट्र राज्यात समाविष्ट असलेल्या जुन्या मुंबई राज्यातील तसेच पूर्वीच्या मध्यप्रदेशातील व हैद्राबाद राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी प्रादेशिक भाषा परीक्षा नियमावलीत एकसूत्रता आणून सगळयांसाठी समान भाषा परीक्षा नियमावली या शासन निर्णयान्वये तयार करण्यात आली आहे. शासन निर्णय क्र. मभाप-1567-1729-म, दि.03 ऑगस्ट, 1967

0 Comments

End of content

No more pages to load