अहिंदी भाषिक राज्यामध्ये असलेल्या केंद्र शासनाच्या कार्यालयात नामफलक, सूचनाफलक, निर्देशफलक इ. हिंदी व इंग्रजी भाषेबरोबरच स्थानिक लोकांना समजण्यासाठी प्रादेशिक भाषेतही असावेत.  त्यांचा क्रम, (१) प्रादेशिक भाषा  (२) हिंदी व (३) इंग्रजी असा असावा.  तसेच सर्व भाषेतील लिपीतील अक्षरे सारखी असावीत, अशी तरतूद या नियमान्वये करण्यात आली आहे.   अशा प्रकारे त्रिभाषा सुत्राचा पुनरुच्चार या ज्ञापनान्वये करण्यात आला आहे.

केंद्र शासनाचे ज्ञापन क्र.१-14013/५/७6-ओ.एल. (अे-1),दि.१८ जून, १९७७.

Leave a Reply