प्रस्तावना

मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये “मराठी भाषा विभाग” असा स्वतंत्र प्रशासकीय विभाग स्थापन करण्याचा निर्णय दि. 24 जून, 2010 च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. नव्याने निर्माण करण्यात आलेल्या विभागामध्ये महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या अनुसूचीमधील सामान्य प्रशासन‍ विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अखत्यारितील मराठी भाषेशी संबंधित विषय तसेच मराठी भाषा विषयक कामकाज पाहणारे भाषा संचालनालय, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ इ.कार्यालये/संस्था/मंडळ मराठी भाषा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली वर्ग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सदर निर्णयास अनुलक्षून स्वतंत्र मराठी भाषा विभागाच्या स्थापनेबाबतचा आदेश शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक-मभावा-210/458/प्र.क्र.95(भाग-2)/20-ब, दि.22 जुलै, 2010 अन्वये निर्गमित करण्यात आला असून याबाबतची अधिसूचना दि.29 नोव्हेंबर, 2010 रोजी निर्गमित करण्यात आली आहे.

उद्दिष्टे

  • मराठी भाषा विभाग (खुद्द) शी संबंधित तसेच मराठी भाषेच्या विकासासंबंधी शासनस्तरावरील सर्व कामे.
  • भाषा संचालनालय व त्यांच्याशी संबंधित शासनस्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
  • राज्य मराठी विकास संस्था व त्यांच्याशी संबंधित शासनस्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
  • महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व त्यांच्याशी संबंधित शासनस्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
  • महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व त्यांच्याशी संबंधित शासनस्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
  • पाठयपुस्तके सोडून मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती, मराठी कला या सर्व विषयांशी संबंधित उत्तम पुस्तकांना उत्तेजन देण्याकरिता पुस्तक निवड करणेबाबत. (पुस्तक निवड समिती) व अनुषंगिक बाबी.

नवनिर्मित मराठी भाषा विभाग लवकर कार्यान्वित होण्याच्या दृष्टीने मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली शक्ती प्रदत्त समिती शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक-शप्रस-2010/प्र.क्र.116/20-ब, दि.14 जुलै, 2010 व दि.10 ऑगस्ट, 2010 अन्वये स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे.

  • नवीन मराठी भाषा विभागामध्ये इतर संबंधित विभागातील कर्मचारीवृंद वर्ग करणे व आवश्यकतेनुसार नवीन पदे निर्माण करणे.
  • नवीन विभागासाठी जागा, साधन सामग्री व इतर सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे.
  • सचिवांसाठी मंत्रालयात जागा उपलब्ध करुन देणे व वाहन खरेदी करण्यास मंजुरी देणे.

मराठी भाषा विभागात अन्य विभागातील वर्ग होणारे विषय विचारात घेऊन विभागासाठी समितीने प्रथम 35 पदांना मंजुरी दिली. याबाबतचा शासन निर्णय सा.प्र.विभाग दि.31 जानेवारी 2011 रोजी निर्गमित करण्यात आला. तसेच दिनांक 6.9.2011 रोजी सचिव कार्यालयासाठी 4 व विभागासाठी 6 अशा 10 अतिरिक्त पदांना मंजुरी देण्यात आली. याबाबतचा शासन निर्णय दिनांक 4 ऑक्टोबर 2011 रोजी निर्गमित करण्यात आला. तसेच वाढीव कामकाज विचारात घेऊन आणखी अतिरिक्त 8 पदांना मंजुरी देण्यात आली असून त्याबाबत शा. नि. दि. 27/4/2012 रोजी निर्गमित करण्यात आला. अशा प्रकारे एकूण 53 मंजूर पदे होती. शासन निर्णय क्रमाक-संकिर्ण -2015/प्र.क्र.161/आस्था-1, दिनांक-24 मे 2016 अन्वये शिपाई संवर्गातील 3 पदे निरसित करण्यात आलेली आहेत. त्यामुळे एकूण मंजूर पदांची संख्या 50 झालेली आहे. मराठी भाषा विभागात वर्ग करण्यात आलेले विषय व मंजूर कर्मचारीवृंद विचारात घेऊन शासन निर्णय दिनांक 6 मे 2011 दि. 14/11/2011 व दि. 2/5/2012 अन्वये विभागातील कामकाजासाठी 8 कार्यासने निर्माण करण्यात आली व कर्मचारीवृंदाचे वाटप करण्यात आले आहे. विभागासाठी नवीन प्रशासन भवनाच्या 8 व्या मजल्यावरील 2400 चौ.फू.च्या जागेचे वाटप माहे जुलै 2011 मध्ये करण्यात आले असून विभागाचे कामकाज सुरु झाले आहे.

मराठी भाषा विभागाची रचना –

मा.मंत्री ( मराठी भाषा) हे मराठी भाषा विभागाचे प्रभारी मंत्री आहेत. विभागासाठी सचिव (मराठी भाषा) हे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत. या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे वर्ग-1 चे 5 अधिकारी व वर्ग-2 चे 8 अधिकारी असून, एकूण 8 कार्यासनांमध्ये या विभागाकडील सर्व विषयांची विभागणी, विभागाचा संरचना तक्ता आणि अधिकाऱ्यांची माहिती व संपर्क खालीलप्रमाणे आहे –

अनु.क्र. नाव व पदनाम कार्यालय व दूरध्वनी विषय
1 कक्ष अधिकारी मराठी भाषा विभाग,
8 वा मजला,
नवीन प्रशासकीय भवन,
मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-400 032.
फॅक्स : 022-22836877
फोन : 022-22794170
आस्थापना-1
मराठी भाषा विभाग (खुद्द) आस्थापनाविषयक बाबी
2 कक्ष अधिकारीकक्ष अधिकारी मराठी भाषा विभाग,
8 वा मजला,
नवीन प्रशासकीय भवन,
मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-400 032.
फॅक्स : 022-22836877
फोन : 022-22794168
रोख शाखा
> मराठी भाषा विभागातील अधिकारी/कर्मचारी  यांची वेतन देयके व अन्य देयके यांचे आहरण व संवितरण
> मराठी भाषा विभाग (खुद्द) खर्चमेळ्याची कामे
> सेवा पुस्तकातील सर्व नोंदी जतन करणे.
3 कक्ष अधिकारी मराठी भाषा विभाग,
8 वा मजला,
नवीन प्रशासकीय भवन,
मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-400 032.
फॅक्स : 022-22836877
फोन : 022-22794168
अर्थसंकल्प शाखा
प्रशासकीय विभाग तसेच क्षेत्रिय कार्यालयांचे अर्थसंकल्पीय अंदाज (सुधारित अंदाजासह) विधानमंडळ समित्या, विनियोजन लेखे
4 कक्ष अधिकारी मराठी भाषा विभाग,
8 वा मजला,
नवीन प्रशासकीय भवन,
मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-400 032.
फॅक्स : 022-22836877
फोन : 022-22794169
नोंदणी शाखा
> विभागात आलेले टपाल/धारीका यांची आवक-जावक (गोपनिय टपालासह) नोंदी ठेवणे व त्यांचे कार्यासननिहाय वाटप करणे.
> मराठी भाषा विभागातील अभिलेख्यांची नोंदणी व जतन
> विधिमंडळ कामकाजाशी समन्वयाची कामे व विभागातील एकापेक्षा अधिक कार्यासनांशी संबंधीत कामकाजाचे समन्वय
> गृहव्यवस्थापन
5 कक्ष अधिकारी मराठी भाषा विभाग,
8 वा मजला,
नवीन प्रशासकीय भवन,
मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-400 032.
फॅक्स : 022-22836877
फोन : 022-22794169
आस्थापना-2
क्षेत्रीय कार्यालयांच्या आस्थापना विषयक बाबी
6 कक्ष अधिकारी मराठी भाषा विभाग,
8 वा मजला,
नवीन प्रशासकीय भवन,
मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-400 032.
फॅक्स : 022-22836877
फोन : 022-22794170
भाषा-2
भाषा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या धोरणात्मक बाबी. (आस्थापना विषयक बाबी वगळून)
7 कक्ष अधिकारी मराठी भाषा विभाग,
8 वा मजला,
नवीन प्रशासकीय भवन,
मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-400 032.
फॅक्स : 022-22836877
फोन : 022-22794169
भाषा-3
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था या कार्यालयांचे धोरणात्मक बाबी (आस्थापना विषयक बाबी  वगळून)
8 कक्ष अधिकारी मराठी भाषा विभाग,
8 वा मजला,
नवीन प्रशासकीय भवन,
मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-400 032.
फॅक्स : 022-22836877
फोन : 022-22794168
भाषा-1
विभागांतर्गत स्थापन केलेल्या समित्यांचे कामकाज, अभिजात भाषा विषयक कामकाज, मराठी भाषा धोरण विषयक कामकाज व  व क्षेत्रीय कार्यालयांचे गृह व्यवस्थापन
X