प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याबाबत

दि.१ मे, १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली असल्याने १ मे हा राजभाषा मराठी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. शासन निर्णय क्र.मभावा-१०९६/११६/ प्र.क्र.७/ ९६/२० ब,दि.१० एप्रिल, १९९७.

0 Comments

भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या एतदर्थ मंडळाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन परीक्षा

महाराष्ट्र नागरी सेवा (इंग्रजी लघुलेखन व इंग्रजी टंकलेखक यांच्यासाठी सक्तीची मराठी लघुलेखन व मराठी टंकलेखन परीक्षा ) (सुधारणा)  नियमावली, 1993 - दि.06.05.1991 च्या “महाराष्ट्र नागरी सेवा (इंगजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत” अधिसूचनेमध्ये या नियमान्वये परीक्षेसाठी अर्ज पाठविण्यासंदर्भातील महिन्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. शासन अधिसूचना क्र. टंलेप्र- 1081/ सीआर/344/वीस-ब,दि. 30 सप्टेंबर, 1993

0 Comments

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना एतदर्थ मंडळाची हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना  एतदर्थ मंडळाची  हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्याबाबत   -  या शासन निर्णयान्वये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ५० अथवा १०० गुणांच्या हिंदी विषयासह उत्तीर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांना केव्हापासून सूट देण्यात यावी ते निश्चित करण्यात आले आहे. शासन निर्णय क्र.हिंभाप-१०९२/१३०६/ प्र.क्र.१२९/९२/२०,दि.१६ नोव्हेंबर, १९९२.

0 Comments

मातृभाषा मराठी असलेल्या राजपत्रित अधिका-यांना आणि अराजपत्रित कर्मचा-यांना मराठी भाषा परीक्षेतून सूट देण्याबाबत

मातृभाषा मराठी असलेल्या राजपत्रित अधिका-यांना आणि अराजपत्रित कर्मचा-यांना मराठी भाषा परीक्षेतून सूट देण्याबाबत - या शासन परिपत्रकान्वये मातृभाषेसंबंधीच्या नियमातील निकष पूर्ण करणा-या शासकीय अधिकारी व कर्मचा-यांना केव्हापासून सूट द्यावी आणि  माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किेंवा त्यापेक्षा वरच्या दर्जाची परीक्षा १०० गुणांचा मराठी उच्चस्तर विषय घेऊन उत्तीर्ण  करणा-या शासकीय अधिकारी व कर्मचा-यांना केव्हापासून सूट द्यावी.  याबाबत तरतूद करण्यात आली आहे. शासन परिपत्रक क्र.मभाप-१०९२/ १०४५/प्र.क्र.९८/ ९२/२०, दि. ३ सप्टेंबर, १९९२.

0 Comments

मराठी भाषा विभाग व क्षेत्रीय कार्यालयांच्या निर्मितीचे शासन निर्णय

राज्यात व राज्याबाहेर मराठी भाषेचा विकास व्हावा या उद्देशाने दि.१ मे १९९२ पाासून  राज्य मराठी विकास संस्था या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. क्र. इएसटी-5592/448/ 92/प्रशा-1,दि. 20.04.1992

0 Comments

भाषा संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या एतदर्थ मंडळाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन परीक्षा

महाराष्ट्र नागरी सेवा (इंगजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांना प्राप्त करावयाच्या मराठी लघुलेखन/मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत- या नियमानुसार इंग्रजी लघुलेखनाचे काम करणाऱ्या प्रत्येक लघुलेखकाला एतदर्थ मंडळाची 80 श.प्र. मि. लघुलेखनाची व 30 श.प्र. मि. मराठी टंकलेखनाची परीक्षा किंवा  इंग्रजी टंकलेखनाचे काम करणाऱ्या प्रत्येक टंकलेखकाला  30 श.प्र. मि. मराठी टंकलेखनाची परीक्षा विहित कालावधीत उत्तीर्ण  करणे आवश्यक आहे. शासन अधिसूचना क्र. टंलेप्र 1081/ सीआर-344/वीस-ब, दि. 06 मे, 1991

0 Comments

महाराष्ट्र शासकीय कर्मचारी (न्यायिक विभागातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त) मराठी भाषा परीक्षा नियम, 1987

महाराष्ट्र शासकीय कर्मचारी (न्यायिक विभागातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त) मराठी भाषा परीक्षा नियम, 1987 - राजपत्रित  व अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी पूर्वी असलेले वेगवेगळे मराठी भाषा परीक्षा नियम अधिक्रमित करुन एकत्रित नवीन नियम तयार करण्यात आले आहेत. शासन अधिसूचना क्र. मभाप -1087/ 14/सीआर-2/87/ 20, दि.30 डिसेंबर, 1987

0 Comments

ऑफिशियल लँग्वेज रुल्स, १९७६ मधील ११ (3) च्या  तरतुदीच्या अनुषंगाने

ऑफिशियल लँग्वेज रुल्स, १९७६ मधील ११ (3) च्या  तरतुदीच्या अनुषंगाने तसेच या संदर्भातील दि.१८ जून, १९७७ या नियमानुसार त्रिभाषा सूत्राच्या अनुषंगाने सर्व केंद्र शासकीय कार्यालये व त्यांच्या अखत्यारीतील कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँका, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम यांना प्रादेशिक भाषा, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही भाषेत नामफलक, सूचनाफलक, निर्देशफलक इ.लावण्याचे निर्देश देण्याबाबत सूचना या  केंद्र शासनाच्या ज्ञापनान्वये  देण्यात आल्या आहेत. केंद्र शासनाचे ज्ञापन क्र.१-14013/2/86-ओ.एल. (अे-1),दि.26 फेब्रुवारी, 1986.  

0 Comments

राज्य शासकीय कर्मचा-यांनी एतदर्थ मंडळाची हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत

राज्य शासकीय कर्मचा-यांनी एतदर्थ मंडळाची  हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत  - माध्यमिक शालांत परीक्षेत ५० अथवा १००  गुणांचा स्वतंत्र तसेच हिंदी-संस्कृत, हिंदी-मराठी, हिंदी-उर्दू  इ.  संयुक्त हिंदी विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्‍या  अधिकारी व कर्मचारी यांना एतदर्थ मंडळाच्या हिंदी भाषा परीक्षेतून सूट देण्याचा निर्णय या शासन निर्णयान्वये घेण्यात आला. शासन निर्णय क्र.हिंभाप-१०८३/ १४४८/वीस, दि.१ डिसेंबर,१९८४.

0 Comments

राज्य शासकीय कर्मचा-यांनी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत

राज्य शासकीय कर्मचा-यांनी हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्याबाबत - हिंदी मातृभाषा असलेल्या अधिकारी व कर्मचारी यांना एतदर्थ मंडळाच्या हिंदी उच्चस्तर व निम्नस्तर परीक्षेतून  सूट देण्याची तरतूद या नियमान्वये करण्यात आली आहे. हिंदी मातृभाषेचे निकष ठरविण्यासाठी मराठी मातृभाषेसंदर्भातील दि.१० फेब्रुवारी, १९७८ अन्वये ठरविण्यात आलेले निकष लागू असतील. शासन अधिसूचना क्र.हिंभाप-१०८१/३०५/वीस,दि.२१ जून, १९८२.

0 Comments

End of content

No more pages to load