ऑफिशियल लँग्वेज रुल्स, १९७६ मधील ११ (3) च्या तरतुदीच्या अनुषंगाने तसेच या संदर्भातील दि.१८ जून, १९७७ या नियमानुसार त्रिभाषा सूत्राच्या अनुषंगाने सर्व केंद्र शासकीय कार्यालये व त्यांच्या अखत्यारीतील कार्यालये, राष्ट्रीयीकृत बँका, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम यांना प्रादेशिक भाषा, हिंदी व इंग्रजी अशा तिन्ही भाषेत नामफलक, सूचनाफलक, निर्देशफलक इ.लावण्याचे निर्देश देण्याबाबत सूचना या केंद्र शासनाच्या ज्ञापनान्वये देण्यात आल्या आहेत.
केंद्र शासनाचे ज्ञापन क्र.१-14013/2/86-ओ.एल. (अे-1),दि.26 फेब्रुवारी, 1986.