परिमळांमाजी कस्तुरी…

जैसे हरळांमाजी रत्नकिळा । कि रत्नांमाजि हिरा निळा । तैसी भाषांमाजी चोखळा । भाषा मराठी ।। जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी । किं परिमळांमाजि कस्तुरि । तैसी भाषांमाजि साजिरी । भाषा मराठी ।। पखियांमध्ये मयोरु । ब्रुखियांमध्ये कल्पतरु । भाषांमध्ये मानु थोरु । मराठियेसी ।। तारांमध्ये बारा रासी । सप्तवारांमध्ये रवि-शशि । या दीपिंचेया भाषांमध्ये तैसी । बोली मराठीया ।। - फादर स्टिफन्स

0 Comments

मराठी अभिमान गीत

लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच्या मनामनात दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या उराउरात स्पंदते मराठी आमुच्या नसानसात नाचते मराठी आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी आमुच्या लहानग्यात रंगते मराठी आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी आमुच्या घराघरात वाढते मराठी आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी येथल्या फुलाफुलात हासते मराठी येथल्या दिशादिशात दाटते मराठी येथल्या नगानगात गर्जते मराठी येथल्या दरीदरीत हिंडते मराठी येथल्या वनावनात गुंजते मराठी येथल्या तरुलतात साजते मराठी येथल्या कळीकळीत लाजते मराठी येथल्या नभामधून वर्षते मराठी येथल्या पिकांमधून डोलते मराठी येथल्या नद्यांमधून वाहते मराठी येथल्या चराचरात राहते…

0 Comments

मराठी

जशी मायभूमी तशी मातृभाषा असे वंद्य आम्हांस त्रैलोकिंही नव्या भारताचा नकाशा पहा तो असे आद्यभूमी महाराष्ट्र ही ! अहा ! ही मराठी किती रम्य मंजूळ वाणी असे प्राण गे जीवनीं जिने घेतला वारसा ज्ञानदेवे मुखांतून गीर्वाण भाषेंतुनी !! अये आज आम्ही तुला भूषवाया पुढें ठाकलो एक होऊनिया अता ना कुणाची अम्हां रोधण्याला पहा छाति होईल येऊनिया | अम्हाला हवी राजभाषा तशी राजभूमी अखंडीत या हिंदवी जिची गर्जना ऐकुनी ज्ञानराजा-तुकाबादि येतील पुन्हां महीं !! मयूरासनी मान होता तुझा गे, परी विश्वविद्यालयीं ये अता तुझें भाग्य तें लोकशाहीं उदेलें, किती उच्च स्वातंत्र्य लाभे मतां ! मराठीचिया मंदिराला झराळे नवद्वार दाही दिशेला पहा…

0 Comments

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी

नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! नमस्ते प्रशस्ते कृपा तूं करी ! तुझ्या पुण्यवाणीत झाला खुला अगे भक्तिसोपान सोपा भला दुजा वेद तूं ! धन्य तूं वैखरी ! नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 1 प्रतापी तुझ्या मंत्रतेजोबलें मराठी स्वराज्या असे स्थापिलें अशी धन्य तूं वीरधात्री खरी ! नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 2 तुझी माधुरी मोदमात्रावहा फुलांनी, मुलांनी खुले गे अहा ! कसें प्रेम साठे तुझ्या अंतरी ! नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 3 तुका-ज्ञानबा-दास-मोरेश्वरा नमो कृष्ण-रामा नमो भास्करा तुझे लाडके हे धरावे शिरीं नमो हे महाराष्ट्रवागीश्वरी ! 4 - रा.अ.काळेले

0 Comments

माझी मराठी

माझ्या मराठीची गोडी          ज्ञानोबांची-तुक्यांची मला वाटते अवीट                मुक्तेशाची-जनाईची माझ्या मराठीचा छंद            माझी मराठी चोखडी मना नित्य मोहवीत !-- 1       रामदास-शिवाजीची –- 2 ‘ या रे या रे अवघेजण ‘          डफ-तुण्तुणें घेऊन हाक माय मराठीची               उभी शाहीर मंडळी बंध खळाळा गळाले               मुजऱ्याची मानकरी साक्ष भीमेच्या पाण्याची !-- 3  वीरांची ही मायबोली -- 4 नांगराचा चाले फाळ              नव्या प्राणाची ‘तुतारी’ अभंगाच्या तालावर               कुणी ऐकवी उठून कोवळीक विसावली              ‘मधुघट’ अर्पी कुणी पहाटेच्या जात्यावर ! -- 5       कुणी ‘माला’ दे बांधुन ! – 6 लेक लाडका एखादा               हिचें स्वरुप देखणें गळां घाली ‘वैजयंती’             हिची चाल तडफेची मुक्त प्रीतीचा, क्रांतीचा           हिच्या नेत्रीं प्रभा दाटे -- कुणी…

0 Comments

आमुची लिपी

लिपी आमुची नागरी                      नसे उच्चारांची व्याधी स्पष्ट उच्चारांचे वर्ण                         नसे लेखनात अढी महाराष्ट्रीयां लाभली                      जात धोपट मार्गाने वाणी तैसी ही संपूर्ण ||1||               स्वर-व्यंजनांची जोडी ||2|| अहो, हिची जोडाक्षरे                    जैसे लिहू तैसे वाचू तोड नाही त्यांना कुठे                   जैसे बोलू तैशा खुणा उच्चारातली प्रचीती                      जे जे लेखी तेच मुखी जशी ओठांवरी उठे ! ||3||             ऐसा मराठीचा बाणा ||4|| सर्व उच्चारांचे शोधा                     नाद-ध्वनी उच्चारांना शास्त्रज्ञांनो, यंत्र एक                    देत सदा आवाहन तेच दिसेल तुम्हाला                    लिपी ऐसी ही प्रभावी महाराष्ट्रीयांचे मुख ! ||5||            माझ्या भाषेचे वाहन ||6|| - सोपानदेव चौधरी

0 Comments

मराठी

माझी बोली असे मराठी                   माझी बोली असे मराठी जी शिवबाच्या फुलली ओठीं              झुंज झुंजली सत्यासाठी ज्ञानेशाला त्या तुकयाला                   परचक्राच्या घोर संकटी नाचविले नित भक्तीसाठी – 1            अन्यायाची फोडून छाती – 2 माझी बोली असे मराठी                    माझी बोली असे मराठी जिने सोसले प्रहार पाठीं                    जिने शिकविला स्वाभिमानही पचवुन हलाहल; अमृत ओठीं              ज्या बोलीस्तव रणांत मेले तीच असे मम माय मराठी – 3           शूर-वीर ते लाखो गणती – 4 माझी बोली असे मराठी                   माझी बोली असे मराठी उभी राहिली संतांपाठी                   जीस्तव झिजले कविवर शाहिर शूरांची, नरवीरांची जी                   भाष्यकार ते निबंधकार फुलवित, उजळित छाती छाती – 5   नाटककर्ते किती मातब्बर – 6 माझी बोली…

0 Comments

माझा मराठाचि बोलु

माझा मराठाचि बोलु कौतुकें | परि अमृतातेंही पैजां जिंके ऐसीं अक्षरें रसिकें | मेळवीन ||1|| जिये कोंवळिकेचेनि पाडें | दिसती नादींचे रंग थोडे | वेधें परिमळाचें बीक मोडे | जयाचेनि ||2|| ऐका रसाळपणाचिया लोभा | कीं श्रवणींचि होती जिभा | बोलें इंद्रियां लागे कळंभा | एकमेकां ||3|| सहजें शब्दु तरी विषो श्रवणाचा | परि रसना म्हणेरसु हा आमुचा | घ्राणासि भावो जाय परिमळाचा | हा तोचि होईल ||4|| नवल बोलतीये रेखेची वाहणी | देखतां डोळयांही पुरों लागे धणी | ते म्हणती उघडली खाणी | रुपाची हे ||5|| जेथ संपूर्ण पद उभारे | तेथ मनचि धांवे बाहिरें | बोलुं भुजांहीं आविष्करे…

0 Comments

तिरंगी आमचा भारतीय झेंडा

तिरंगी आमचा भारतीय झेंडा उंच उंच फडकवू प्राणपणाने लढून आम्ही शान याची वाढवू ||धृ|| कित्येक लढले याच्यासाठी कितीकानी दिधले प्राण यांच्याचसाठी कितीकांनी फासात घातली मान देवासमान हा आम्हास त्याचा मान आम्ही राखू ||1|| क्रांतीकारी अन समाजसेवक हाती घेवून जातसे चालत शत्रूच्याही उरात बसती उंच पाहून याला धडकी न राहू मागे आपण चला बळ तिरंग्याचे आपण दावू ||2|| युध्द जरी हो आज नसले भय देशावरी रोजच कसले दहशत घालती दहशतवादी फुकाची करती वादावादी झाला तिरंगा निमीत्त केवळ वाद सारे आता बाजू सारुन देवू ||3|| - पाषाणभेद

0 Comments

उभवू उंच निशाण

उभवू उंच निशाण ! नव्या युगाचे नव्या जगाचे, उभवू उंच निशाण ! दीन दीन जे, दलित दलित जे त्या सर्वांना ध्वज हा देईल सदैव छाया छान उभवू उंच निशाण ! अंध अमानुषा रुढी घालिती अखंड जगी थैमान त्या क्रुरांना हे क्रांतिचे मूर्तिमंत अव्हान ताठ ठेविती मान झुंजुनी भीमदेव धीमान शूर शिपाई आम्ही त्यांचे व्यर्थ न ते बलिदान ध्वज मिरवीत हा गौतम गेले टाकूनी राज्य महान पुसुनी आसवें मानवतेची होती बुध्द महान हे समतेचे, हे ममतेचे, गांधीजीचे गान हरिजन धरुनी उरी स्वीकरी जे फकिरीचे वाण - वि.स.खांडेकर

0 Comments

End of content

No more pages to load