माझ्या मराठीची गोडी ज्ञानोबांची-तुक्यांची
मला वाटते अवीट मुक्तेशाची-जनाईची
माझ्या मराठीचा छंद माझी मराठी चोखडी
मना नित्य मोहवीत !– 1 रामदास-शिवाजीची –- 2
‘ या रे या रे अवघेजण ‘ डफ-तुण्तुणें घेऊन
हाक माय मराठीची उभी शाहीर मंडळी
बंध खळाळा गळाले मुजऱ्याची मानकरी
साक्ष भीमेच्या पाण्याची !– 3 वीरांची ही मायबोली — 4
नांगराचा चाले फाळ नव्या प्राणाची ‘तुतारी’
अभंगाच्या तालावर कुणी ऐकवी उठून
कोवळीक विसावली ‘मधुघट’ अर्पी कुणी
पहाटेच्या जात्यावर ! — 5 कुणी ‘माला’ दे बांधुन ! – 6
लेक लाडका एखादा हिचें स्वरुप देखणें
गळां घाली ‘वैजयंती’ हिची चाल तडफेची
मुक्त प्रीतीचा, क्रांतीचा हिच्या नेत्रीं प्रभा दाटे —
कुणी नजराणा देती – 7 सात्विकाची-कांचनाची ! – 8
कृष्णा-गोदा-सिंधुजळ माझ्या मराठीची थोरी
हिची वाढविती कांती नित्य नवें रुप दावी
आचार्यांचे आशीर्वाद अवनत होई माथा
हिच्या मुखीं वेद होती – 9 मुखीं उमटते ओवी ! — 10
– वि.म.कुळकर्णी