माझी बोली असे मराठी माझी बोली असे मराठी
जी शिवबाच्या फुलली ओठीं झुंज झुंजली सत्यासाठी
ज्ञानेशाला त्या तुकयाला परचक्राच्या घोर संकटी
नाचविले नित भक्तीसाठी – 1 अन्यायाची फोडून छाती – 2
माझी बोली असे मराठी माझी बोली असे मराठी
जिने सोसले प्रहार पाठीं जिने शिकविला स्वाभिमानही
पचवुन हलाहल; अमृत ओठीं ज्या बोलीस्तव रणांत मेले
तीच असे मम माय मराठी – 3 शूर-वीर ते लाखो गणती – 4
माझी बोली असे मराठी माझी बोली असे मराठी
उभी राहिली संतांपाठी जीस्तव झिजले कविवर शाहिर
शूरांची, नरवीरांची जी भाष्यकार ते निबंधकार
फुलवित, उजळित छाती छाती – 5 नाटककर्ते किती मातब्बर – 6
माझी बोली असे मराठी असोत बोली कितीक सुंदर
प्राणाहुन ती प्रियतम मजला परि श्रेष्ठचि मज माय मराठी
महाराष्ट्राची पवित्र भूमी अभंग उज्वल ही मम बोली
करिते मंगल वेळोवेळी – 7 देह जळो हा तिचियासाठी – 8
– मा.रा.पोतदार