परिमळांमाजी कस्तुरी…
जैसे हरळांमाजी रत्नकिळा । कि रत्नांमाजि हिरा निळा । तैसी भाषांमाजी चोखळा । भाषा मराठी ।। जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी । किं परिमळांमाजि कस्तुरि । तैसी भाषांमाजि साजिरी । भाषा मराठी ।। पखियांमध्ये मयोरु । ब्रुखियांमध्ये कल्पतरु । भाषांमध्ये मानु थोरु । मराठियेसी ।। तारांमध्ये बारा रासी । सप्तवारांमध्ये रवि-शशि । या दीपिंचेया भाषांमध्ये तैसी । बोली मराठीया ।। - फादर स्टिफन्स