मराठी भाषा गौरव दिन (मराठी भाषा दिवस, मराठी राजभाषा दिन) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो.
ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे लेखक मानले जातात. वि. स. खांडेकरांनंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. १९८७ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ‘नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला’ ही त्यांची नाटके. ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, कोल्हापुरातील मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद, मुंबईतील जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष ही पदे त्यांनी भूषविली.
या कविश्रेष्ठांचे 10 मार्च 1999 रोजी निधन झाले. शासनाने हा दिवस गौरव दिन म्हणून जाहीर केला. त्यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.