“मराठी भाषा गौरव दिन” २०२२
ज्येष्ठ कवी वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा करणेबाबत...शासन परिपत्रकाची प्रत स्थापित करा....
ज्येष्ठ कवी वि.वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा दिनांक २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस "मराठी भाषा गौरव दिन" म्हणून साजरा करणेबाबत...शासन परिपत्रकाची प्रत स्थापित करा....
१) भारताचे संविधान (शासकीय कामकाजाच्या भाषेसंदर्भात तरतूद) अनुच्छेद ३४३ ते ३५१ २) महाराष्ट्र राजभाषा अधिनियम,१९६४ ३) महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अधिनियम, २०१५ (मराठी व इंग्रजी) दि.२१.०८.२०१५ ४) महाराष्ट्र राजभाषा वर्जित प्रयोजने नियम, दि. ३०.०४.१९६६. नियमांची प्रत येथे डाऊनलोड करा....
संस्कृतीचा ठेवा तिला वैभवाचे साज चढवणाऱ्या व्यक्ती, संस्था, स्थळे, परंपरा, उत्सव, कला इत्यादींमधून साकारतो. ग्लोबल वातावरणात महाराष्ट्रीयन संस्कृतिवैभवाच्या खुणा जपाव्या व त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ पोर्टल हे काही ऑनलाइन मॅगझीन नाही, तर महाराष्ट्रामतील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे "डिजीटल व्यासपीठ" आहे. महाराष्ट्रीअन माणसाला ग्लोबल व्यासपिठ निर्माण व्हावे म्हणून प्रत्येकाने ह्यात सहभागी झाले पाहीजे! https://thinkmaharashtra.com/
माहितीच्या महासागरात उत्तम, आशयघन, मजकुराच्या शोधात असलेले वाचक आणि तो अगत्याने पुरवून योग्य अर्थपूर्ण सहकार्याची अपेक्षा असणारा चालक यांना एकत्र आणणारा हा प्लॅटफॉर्म आहे- "बहुविध.कॉम". छापिल साहित्याच्या आणि सोशल मीडियाच्या मर्यादांवर मात करून, लेखकांना थेट वाचकांशी जोडू शकेल, साहित्य व्यवहार, पुस्तक व्यवहार वाढू शकेल, उत्तम वाचक घडवू शकेल आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करुन नव्या पिढीलाही वाचणाची गोडी लावू शकेल असा हा प्रयत्न आहे https://bahuvidh.com/
मायबोली हा मराठी साहित्य डिजीटल स्वरूपात प्रसारीत करणारा २० वर्षे जूना लेखनसमूह आहे.. http://mayboli..com/
मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – २०१८/प्र.क्र.१२८ /२०१८/भाषा – ३, दि. २० डिसेंबर, २०१८ अन्वये स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१७ जाहीर करण्यात आलेले आहेत. निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा
मराठी भाषा गौरव दिन (मराठी भाषा दिवस, मराठी राजभाषा दिन) हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे लेखक मानले जातात. वि. स. खांडेकरांनंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. १९८७ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. 'नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला' ही त्यांची नाटके. ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार अशा पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. मडगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, कोल्हापुरातील मराठी नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद, मुंबईतील जागतिक मराठी परिषदेचे अध्यक्ष…