मराठी भाषा विभाग (खुद्द) व अधिपत्याखालील
क्षेत्रिय कार्यालयांची सुधारित व अद्ययावत नागरिकांची
सनद एकत्रितरित्या प्रसिध्द करण्याबाबत
महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग
शासन निर्णय, क्रमांक-संकिर्ण-२०१७/प्र.क्र.२४/आस्था-१
मंत्रालय, मुंबई-४०० ३२.
दिनांक :- १९ नोव्हेंबर, २०१८
प्रस्तावना :-
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील कलम ८ (१) (२) मधील तरतुदीनुसार प्रत्येक विभाग व त्याच्या अधिपत्याखालील कार्यालय प्रमुखांना नागरिकांची सनद प्रसिध्द करण्याची तरतूद केली आहे. त्यानुसार विभागाची नागरिकांची सनद प्रसिध्द करण्यात आली आहे. तथापि, विभागातील आधिकारी / कर्मचारी त्यांच्या झालेल्या बदल्या / नवीन पदस्थापना व विषयसूची मध्ये झालेल्या बदलामुळे विभागाची तसेच विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांची नागरिकांची सनद एकत्रितरित्या प्रसिध्द करण्याचे प्रस्तावित होते.
शासन निर्णय :-
मराठी भाषा विभाग (खुद्द) तसेच विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रिय कार्यालयांची सुधारित व अद्ययावत नागरिकांची सनद एकत्रितरित्या प्रसिध्द करण्यात येत आहे. सदरहू नागरिकांची सनद शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक क्रमांक २०१८१११९१११५१८७६३३ असा आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशावरुन व नांवाने.
सही/-
( अपर्णा अ. गावडे )
सह सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत:-
- मा.राज्यपालांचे सचिव, मुंबई
- मा.मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई.
- मा.मंत्री /राज्यमंत्री यांची खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- उप सचिव (र.व.का.), सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- भाषा संचालक, भाषा संचालनालय, प्रशासकीय इमारत, ५ वा मजला,डॅा. आंबेडकर उद्यानाजवळ, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१.
- सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, रविंद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, पु.ल. देशपांडे कला अकादमी, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई- ४०० ०२५.
- सचिव, विश्वकोश निर्मिती मंडळ, रविंद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, पु.ल. देशपांडे कला अकादमी, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई- ४०० २५.
- प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, एल्फिस्टन तांत्रिक विद्यालय, ३, महापालिका मार्ग, धोबीतलाव, मुंबई- ४०० ००१.
- सर्व अवर सचिव व सर्व कार्यासन अधिकारी, मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- निवडनस्ती.
नागरिकांची सनद
मराठी भाषा विभाग,
मंत्रालय, मुंबई-४०० ३२.
अनुक्रमणिका
अ.क्र. | विषय | पृष्ठ क्र. |
१ | प्रस्तावना, विभाग व विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांची रचना व संरचना तक्ता | |
२ | परिशिष्ट-१
(अधिकाऱ्यांची यादी व संपर्क दूरध्वनी) |
|
३ | परिशिष्ट -२
(कार्यपूर्तीचे वेळापत्रक) |
|
४ | परिशिष्ट-३
(अधिनियम व नियमांची यादी) |
|
५ | परिशिष्ट-४
(विभागांतर्गत महत्वाच्या समित्या व मंडळे) |
|
६ | परिशिष्ट-५
(विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयांचे विविध उपक्रम) |
|
७ | परिशिष्ट-६
(विभागामार्फत साहित्यिक क्षेत्रात देण्यात येणारे पुरस्कारांचे स्वरुप) |
|
८ | परिशिष्ट-७
(केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम, 2005 अन्वये नियुक्त केलेले जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची यादी ) |
|
९ | परिशिष्ट-८
मराठी भाषा विभाग सन २०१४-१५ ते २०१७-१८ या चार वर्षांकरीता केलेली आर्थिक तरतूद व खर्च दर्शविणारे विवरणपत्र |
प्रस्तावना
मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्र राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये ” मराठी भाषा विभाग ” असा स्वतंत्र प्रशासकीय विभाग स्थापन करण्याचा निर्णय दि.२४ जून, २०१० च्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करण्यात आली असून, नव्याने निर्माण करण्यात आलेल्या विभागामध्ये महाराष्ट्र शासन कार्यनियमावलीच्या अनुसूचीमधील सामान्य प्रशासन विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अखत्यारितील मराठी भाषेशी संबंधित विषय तसेच मराठी भाषा विषयक कामकाज पाहणारे (१) भाषा संचालनालय, वांद्रे, मुंबई, (२) राज्य मराठी विकास संस्था, मुंबई, (३) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई व (४) महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई ही कार्यालये / संस्था / मंडळ मराठी भाषा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली वर्ग करण्यात आली. स्वतंत्र मराठी भाषा विभागाच्या स्थापनेबाबतचे आदेश शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांक-मभावा-२०१०/४५८/प्र.क्र.९५(भाग-२)/२०-ब, दिनांक २२ जुलै, २०१० अन्वये निर्गमित करण्यात आले आहेत. याबाबतची अधिसूचना दि.२९ नोव्हेंबर, २०१० रोजी निर्गमित करण्यात आली व त्यानुसार स्वतंत्र मराठी भाषा विभागाचे कामकाज सुरु झाले.
मराठी भाषा विभागाची माहिती सर्व सामान्य नागरिकांना प्राप्त व्हावी याकरिता मराठी भाषा विभाग व त्याअंतर्गत असलेल्या चार क्षेत्रीय कार्यालयांची एकत्रित नागरिकांची सनद प्रसिद्ध करण्यात येत आहे. ही नागरिकांची सनद सर्वसामान्य नागरिकांना छाननीसाठी नेहमीच खुली असेल आणि सन्माननीय नागरिकांच्या बहुमूल्य सूचनांचा विचार करुन या सनदेमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात येतील. मराठी भाषा विभाग व त्याच्या अधिपत्याखालील सर्व कार्यालये नागरिकांच्या या सनदेची अंमलबजावणी करण्यास कटीबद्ध आहेत. तसेच विभागाकडून पुरविण्यात येणाऱ्या सर्व सेवा कर्तव्य भावनेने व कर्तव्य तत्परतेने उपलब्ध करुन देण्याची मी हमी देत आहे.
()
प्रधान सचिव
मराठी भाषा विभाग
मराठी भाषा विभागाच्या विकासासाठी शासनाने दिनांक २९ नोव्हेंबर, २०१० च्या अधिसुचनेद्वारे मराठी भाषा विभागाची निर्मिती केली आहे. राजभाषा अधिनियम १९६४ च्या अनुषंगाने मराठी भाषेचा प्रशासनामध्ये सक्षमपणे वापर करण्याकरिता शासनस्तरावर विविध धोरणात्मक निर्णय घेणे तसेच मराठी भाषेचा प्रचार व प्रसार याकरिता प्रयत्न करणे ही या विभागाची मुख्य उद्दिष्टे आहेत.
मराठी भाषा विभागाची रचना –
मा.मंत्री (मराठी भाषा) हे मराठी भाषा विभागाचे प्रभारी मंत्री आहेत. विभागासाठी सचिव (मराठी भाषा) हे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आहेत. या प्रशासकीय विभागांतर्गत वर्ग-१ चे ५ अधिकारी व वर्ग-२ चे ८ अधिकारी असून, एकूण ८ कार्यासनांमध्ये या विभागाकडील सर्व विषयांची विभागणी करण्यात आली आहे. सदर अधिकारी व त्यांना वाटप केलेल्या कार्यासनांचा तपशील परिशिष्ट-१ मध्ये अंतर्भूत केला आहे. परिशिष्ट-१ आणि विभागाचा संरचना तक्ता सोबत जोडला आहे. मराठी भाषा विभागामध्ये खालील विषयांचे कामकाज हाताळण्यात येते:-
१) मराठी भाषा विभाग (खुद्द) शी संबंधित तसेच मराठी भाषेच्या विकासासंबंधी धोरणात्मक बाबी.
२) भाषा संचालनालय व त्यांच्याशी संबंधित शासन स्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
३) राज्य मराठी विकास संस्था व त्यांच्याशी संबंधित शासन स्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
४) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व त्यांच्याशी संबंधित शासन स्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
५) महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व त्यांच्याशी संबंधित शासन स्तरावरील सर्व कामकाजाचे संनियंत्रण व समन्वय.
१ ) विभाग (खुद्द) व क्षेत्रीय कार्यालयातील संपर्क अधिकारी यांची माहिती :-
मराठी भाषा विभाग (खुद्द) व क्षेत्रीय कार्यालयातील कार्यरत अधिकाऱ्यांची यादी, संपर्क दूरध्वनी सह परिशिष्ट-१ मध्ये देण्यात आली आहे.
२)कार्यपूर्तीचे वेळापत्रक :
मराठी भाषा विभागामार्फत पुरविण्यात येणा-या सेवांच्या कार्यपूर्तीचे वेळापत्रक परिशिष्ट-२ येथे सादर करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रशासकीय कर्मचा-यांचे बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील प्रकरण क्र.३ च्या कलम ११ मध्ये नमूद केलेल्या न्यायप्रविष्ट बाबी, लोक आयुक्त किंवा उप लोक आयुक्त आणि अन्य घटनात्मक संस्था, आयोग, न्यायिकत्व बाबी, केंद्र किंवा अन्य राज्य शासनांच्या संबंधातील प्रकरणे, विधी विधानांशी संबंधातील प्रकरणे/बाबी, मंत्रिमंडळास सादर होणाऱ्या मुख्य धोरणात्मक बाबी इत्यादींना कार्यपूर्तीच्या स्तंभ क्र.३ येथील वेळापत्रकातून सूट राहील.
३) महत्वाचे अधिनियम व शासन निर्णय :
या विभागाशी संबंधित नियम अथवा महत्वाचे शासन निर्णय https://marathi.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. त्यापैकी विभागाशी संबंधित अधिनियम व नियम यांची यादी परिशिष्ट-३ मध्ये देण्यात आली आहे.
४) विभागांतर्गत महत्वाच्या समित्यांची माहिती :
या विभागाच्या विविध योजना / कामकाज कार्यान्वित करण्याकरिता स्थापना केलेल्या मुख्य समित्या यांची माहिती परिशिष्ट – ४ मध्ये देण्यात आली आहे.
५) क्षेत्रीय कार्यालयांचे विविध उपक्रम :
या विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील विविध उपक्रम यांची माहिती परिशिष्ट – ५ मध्ये देण्यात आली आहे.
६) विभागांतर्गत पुरस्कार :
मराठी भाषा विभागाकडून देण्यात येणारे विविध वाङ्मयीन पुरस्काराचे स्वरूप व मान्यवरांची यादी याबाबतची माहिती परिशिष्ट – ६ मध्ये देण्यात आलेली आहे.
७) माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची माहिती:-
माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या विभाग व विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालयातील जन माहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांची माहिती परिशिष्ट-७ मध्ये देण्यात आली आहे.
८) मराठी भाषा विभागामधील सन २०१४-१५ ते सन २०१७-१८ या चार वर्षांकरीता केलेली आर्थिक तरतूद व खर्च दर्शविणारे विवरणपत्र –
सदर माहिती परिशिष्ट ८ मध्ये देण्यात आली आहे.
नागरिकांच्या सनदेचा आढावा / सिंहावलोकन :
या नागरिकांच्या सनदेच्या उपयुक्ततेबाबत तथा परिमाणकारकतेचा आढावा मराठी भाषा विभागाकडून दरवर्षी घेण्यात येईल व त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येतील.
(संकेतस्थळ – https://marathi.gov.in)
मराठी भाषा विभागाची संरचना
⇓
मा.मंत्री
⇓
मा.राज्यमंत्री
⇓
सचिव
(श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा)
⇓
प्र.उप सचिव
(श्री.हर्षवर्धन तु.जाधव )
————————————————————————————
⇓ ⇓ ⇓
अवर सचिव (आस्था) अवर सचिव ( गृह व्यवस्थापन) अवर सचिव (भाषा)
(श्री.हर्षवर्धन तु.जाधव) (श्रीम.नंदा मा.राऊत) (श्रीम.नंदा मा.राऊत)
⇓ ⇓ ⇓
कक्ष अधिकारी (आस्था-१) कक्ष अधिकारी (भाषा-१) कक्ष अधिकारी (भाषा-२)
(श्रीम.ऐश्वर्या नि.गोवेकर) (रिक्त) (श्रीम.राजश्री उ.बापट)
कक्ष अधिकारी (रोख शाखा) कक्ष अधिकारी (नोंदणी शाखा) कक्ष अधिकारी (भाषा-३)
(श्री.सुरेंद्र तु.साळवी ) (श्रीम.सुप्रिया कि.घोटाळे) (श्री.अजय धो.भोसले)
कक्ष अधिकारी (आस्था-२) कक्ष अधिकारी (अर्थसंकल्प शाखा)
(श्री.मंगेश प.कुडतरकर) (श्रीम.सुप्रिया कि.घोटाळे)
मराठी भाषा विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालये
विभागाच्या अधिपत्याखाली पुढील क्षेत्रीय कार्यालये कार्यरत आहेत :-
- भाषा संचालनालय, प्रशासकीय इमारत, ५ वा मजला,डॅा.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाजवळ, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई-४०० ०५१.
- महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, रविंद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, पु.ल. देशपांडे कला अकादमी, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई- ४०० २५.
- विश्वकोश निर्मिती मंडळ, रविंद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, पु.ल. देशपांडे कला अकादमी, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई- ४०० ०२५.
- राज्य मराठी विकास संस्था, एल्फिस्टन तांत्रिक विद्यालय, ३, महापालिका मार्ग, धोबीतलाव, मुंबई- ४०० ००१.
१)भाषा संचालनालय
राजभाषा अधिनियम १९६४ अन्वये राज्य शासनाने “ मराठी भाषा ” राजभाषा म्हणून घोषित केली आहे. शासन व्यवहारात मराठीचा वापर या शासनाच्या वैधानिक बाबींची पूर्तता करण्यासाठी भाषा संचालनालयाकडून विविध उपाययोजना करण्यात येतात.
भाषा संचालनालयाकडून पार पाडले जाणारे कामकाजात मुख्यत्वे करुन पुढील बाबींचा समावेश आहे:-
१. विधानसभा विधेयके, विधानपरिषद विधेयके, अध्यादेश आणि सर्व राज्य अधिनियम व त्याखालील तयार केलेले नियम, उपविधि यांचा मराठीमध्ये अनुवाद करणे, अनुवादित राज्य अधिनियम अद्ययावत करणे तसेच तो पुस्तकरुपात उपलब्ध करणे. विधानसभा / विधानपरिषद विधेयके, अध्यादेश आणि अधिनियम हिंदीमध्ये अनुवादित करणे.
२. अर्थसंकल्प विषयक सर्व प्रकाशनांचा, राज्यपालांच्या अभिभाषणाचा, शासनाने नियुक्त केलेल्या विविध समित्यांच्या व आयोगांच्या अहवालांचा तसेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांच्या सहा इंग्रजी अहवालांचा मराठी अनुवाद करून देणे.
३. विभागीय नियमपुस्तिका आणि सर्वसाधारण तसेच विशेष प्रमाण नमुने व प्रपत्रे यांचा मराठी अनुवाद करुन देणे.
४. विद्यापीठ स्तरावरील अभ्यासक्रम मराठीतून शिकविण्यासाठी उपयोगी ठरणारे प्रशासनिक, विधिविषयक, तांत्रिक व विज्ञान विषयक परिभाषा शब्दकोश तयार करणे.
५. सर्व केंद्रीय अधिनियमांचा मराठीत अनुवाद करणे, त्यास राजभाषा खंड, नवी दिल्ली यांची संमती घेऊन तो प्राधिकृत मराठी पाठ भारताच्या राष्ट्रपतींच्या नावे भारत सरकारच्या राजपत्रात प्रसिद्ध करणे तसेच ते प्राधिकृत पाठ म्हणून पुस्तकरुपात प्रसिध्द करणे.
६. शासकीय कार्यालयातील अमराठी भाषिक राजपत्रित अधिकारी व अराजपत्रित कर्मचारी यांच्यासाठी मराठी भाषा परीक्षा, तसेच सर्वांसाठी हिंदी भाषा परीक्षा वर्षातून दोनदा आयोजित करणे, शासकीय सेवेतील इंग्रजी टंकलेखक व लघुलेखक तसेच लघुटंकलेखक यांच्यासाठी एतदर्थ मंडळाच्या मराठी टंकलेखन/ लघुलेखन परीक्षा वर्षातून दोनदा आयोजित करणे.
७. शासकीय कार्यालयांतून दैनंदिन कामकाजात मराठीचा वापर होतो किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी मंत्रालयीन विभाग, महामंडळे, जिल्हा व विभागीय स्तरावरील शासकीय कार्यालये, महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा व जिल्हा ग्रामीण यंत्रणा यांची प्रत्यक्ष तपासणी करणे व त्यांच्या अडीअडचणी दूर करणे.
८. संचालनालयाकडून भारताचे संविधान मराठीत अनुवादित केले असून मराठीमधील त्याच्या ६ आवृत्त्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्याचप्रमाणे सन २०१३-१४ या वर्षात भारताच्या संविधानाची सातवी द्विभाषी आवृत्ती इंग्रजी / मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित केली आहे.
९. शासन व्यवहारात मराठीचा सक्षमपणे वापर करण्याकरिता भाषा समृद्धीसाठी शब्दकोश / परिभाषाकोश या सारख्या पायाभूत सुविधांची निर्मिती करणे. यामध्ये प्रामुख्याने पुढील प्रकाशनांचा समावेश आहे :-
भाषा संचालनालयामार्फत आतापर्यंत पदनाम कोश, प्रशासनिक लेखन, प्रशासन वाक्प्रयोग, शासन व्यवहार कोश, कार्यदर्शिका आणि शासकीय कर्मचाऱ्यांना तसेच इतरांना मराठी लेखनात मार्गदर्शन करण्यासाठी प्रमाणलेखन नियमावली तसेच राज्यशास्त्र, लोकप्रशासन, अर्थशास्त्र, साहित्य समीक्षा, धातुशास्त्र, मानसशास्त्र, व्यवसाय व्यवस्थापन, ग्रंथालयशास्त्र (सुधारित), रसायनशास्त्र (सुधारित), संख्याशास्त्र, गणितशास्त्र (सुधारित), औषधशास्त्र, विकृतिशास्त्र, भाषाविज्ञान व वाङ्मयविद्या, भूगोलशास्त्र व वृत्तपत्र विद्याशास्त्र या सारखे २९ परिभाषा कोश, ३ पारिभाषिक शब्दावल्या तसेच शब्दकोश ६ व १० मार्गदर्शक पुस्तिका धरुन एकूण ४८ विविध प्रकाशने प्रसिद्ध करण्यात आली आहेत. संचालनालयाची सर्व प्रकाशने शासकीय मुद्रणालयात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
भाषा विषयक विविध प्रकारचे सहाय्य करण्यासाठी व मौलिक सूचना देण्याकरिता शासनाने “ भाषा सल्लागार समितीची ” निर्मिती केली आहे. या समितीच्या मौलिक सूचना विचारात घेऊन भाषा संचालनालयाचे विविध उपक्रम हाती घेण्यात येतात. तसेच शासन व्यवहारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यासंदर्भात शासकीय कार्यालयांची तपासणी करण्याचे कामही या कार्यालयामार्फत करण्यात येते. शासन निर्णय, क्रमांक-भासस-२०१५/प्र.क्र.३०/भाषा-१, दिनांक ५ ऑगस्ट २०१५ अन्वये भाषा सल्लागार समितीची पुर्नरचना करण्यात आली आहे. सदर समितीमध्ये १९ अशासकीय व ८ शासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य व केंद्रीय अधिनियमांचा मराठीत अनुवाद :-
महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, १९६४ अन्वये सर्व प्रशासनिक व्यवहारात मराठीचा वापर करण्याचे धोरण अंमलात आणले आहे. त्याअनुषंगाने विधिविषयक कामकाजात देखील मराठीचा वापर करण्याची कार्यवाही सुरु केलेली आहे. विधानमंडळात विधेयक मांडताना ते मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत मांडण्यात येते. विधेयकाचे कायद्यात रुपांतर करताना मराठी व इंग्रजीमध्ये सदर कायदा प्रसिद्ध करण्यात येतो. आतापर्यंत एकूण ५८६ राज्य अधिनियम (मराठी) राज्याच्या मुख्य संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. तसेच केंद्र शासनाचे प्राधिकृत पाठ (केंद्रीय विधि) अधिनियम (Authoritative Text Act), १९७३ अन्वये केंद्र शासनाच्या केंद्रीय कायद्यांच्या प्रादेशिक भाषेत प्राधिकृत अनुवाद करण्यात येतात. केंद्रीय कायद्याची प्रत अनुवादाकरिता राज्य शासनाकडे प्राप्त झाल्यानंतर भाषा संचालनालयाकडून त्याचा मराठी अनुवाद करण्यात येतो. सदर अनुवाद केंद्रीय अनुवाद समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर मा. राष्ट्रपतींच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येतो. मान्यतेनंतर कायद्यांचा प्राधिकृत पाठ हा अनुवाद अधिकृतरित्या राज्य शासनाकडून प्रसिद्ध करण्यात येतो. या प्रक्रियेनुसार आतापर्यंत १७० केंद्रीय अधिनियमांचा मराठीत अनुवाद करण्यात आलेला असून, सदर केंद्रीय कायदे शासनाच्या मुख्य संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
(संकेतस्थळ – http://directorate.marathi.gov.in)
भाषा संचालनालय व भाषा संचालनालयाच्या अंतर्गत असलेल्या विभागीय कार्यालयाच्या संरचनेचा तक्ता
भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
⇓
भाषा संचालक (गट-अ) १ पद
मुख्यालय (मुंबई) अनुवाद व परिभाषा परिभाषा निर्मिती शाखा |
विविध चार विभागीय कार्यालये |
||||||
विधी अनुवाद शाखा | मराठी अनुवाद व परि भाषा निर्मिती शाखा | हिंदी अनुवाद शाखा | लिपिक वर्गीय शाखा | विभागीय कार्यालय, नवी मुंबई | विभागीय कार्यालय, पुणे | विभागीय कार्यालय, नागपूर | विभागीय कार्यालय, औरंगाबाद |
भाषा उपसंचालक (विधी)
(गट-अ) १ पद |
भाषा उपसंचालक
(अनुवाद व शब्दावली) (गट-अ) १ पद |
भाषा अधिकारी (हिंदी)
(गट-ब) १ पद |
सहायक संचालक
(प्रशिक्षण व आस्थापना) (गट-ब) १ पदे |
विभागीय सहायक भाषा संचालक
(गट-ब) १ पद |
विभागीय सहायक भाषा संचालक
(गट-ब) १ पद |
विभागीय सहायक भाषा संचालक
(गट-ब) १ पद |
विभागीय सहायक भाषा संचालक
(गट-ब) १ पद |
सहायक भाषा संचालक
(गट-ब) २ पदे |
सहायक भाषा संचालक
(अनुवाद व शब्दावली) (गट-ब) २ पदे |
पर्यवेक्षक (हिंदी)
(गट-क) १ पद |
उच्चश्रेणी
लघुलेखक १ पद
|
अनुवादक (मराठी)
(गट-क) १ पद |
अनुवादक (मराठी)
(गट-क) २ पदे |
अनुवादक (मराठी)
(गट-क) २ पदे |
अनुवादक
(मराठी) (गट-क) २ पदे |
पर्यवेक्षक
५ पदे
|
पर्यवेक्षक (मराठी)
(गट-क) ४ पदे |
अनुवादक (हिंदी)
(गट-क) ४ पदे |
अधीक्षक
(गट-क) ३ पदे |
अधीक्षक
(गट-क) १ पद
|
अधीक्षक
(गट-क) १ पद
|
अधीक्षक
(गट-क) १ पद
|
अधीक्षक
(गट-क) १ पद |
अनुवादक
(गट-क) १९ पदे |
अनुवादक (मराठी)
(गट-क) १६ पदे |
वरिष्ठ लिपिक
(गट-क) ६ पदे
|
वरिष्ठ लिपिक
(गट-क) १ पद
|
वरिष्ठ लिपिक
(गट-क) १ पद
|
वरिष्ठ लिपिक
(गट-क) १ पद
|
वरिष्ठ लिपिक
(गट-क) १ पद
|
|
लघुटंकलेखक
(गट-क) २ पदे |
लिपिक-टंकलेखक
(गट-क) २ पदे |
लिपिक-टंकलेखक
(गट-क) २ पदे
|
लिपिक-टंकलेखक
(गट-क) २ पदे
|
लिपिक-टंकलेखक
(गट-क) २ पदे
|
|||
टंकलेखक/
लिपिक- टंकलेखक (गट-क) १२ पदे |
शिपाई
(गट-ड) २ पदे
|
शिपाई
(गट-ड) २ पदे |
शिपाई
(गट-ड) २ पदे |
शिपाई
(गट-ड) २ पदे |
|||
कनिष्ठ ग्रंथपाल
(गट-क) १ पद |
|||||||
वाहनचालक
१ पद |
|||||||
नाईक
(गट-ड) २ पदे |
|||||||
शिपाई
(गट-ड) १० पदे |
२) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
मराठी भाषा, साहित्य संस्कृती व कला या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रास लाभलेला थोर वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी आणि मराठी भाषेत विविध विषयांवरील मूलभूत संशोधन व प्रकाशन यांना उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने १९ नोव्हेंबर, १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. अशा तऱ्हेची मंडळाची मूळ संकल्पना महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व.यशवंतरावजी चव्हाण यांची होती. सर्व देशामध्ये राज्य पातळीवर साहित्य आणि संस्कृती विषयक स्थापन करण्यात आलेले हे पहिलेच मंडळ होय. मंडळाचे पहिले अध्यक्ष तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी होते.
महाराष्ट्राची भाषा, साहित्य, संस्कृती आणि इतिहास हे विषय तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाऱ्या विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करण्यासाठी विविध वाङ्मयीन योजनांना चालना देणे, मदत करणे व अशा योजना मंडळाने स्वत: हाती घेणे हे साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. शासनाने मंडळाकडे सोपविलेली वरील उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि आधुनिक महाराष्ट्राच्या वाङ्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरुवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाङ्€मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. शासन निर्णय, क्रमांक-सासंमं १०१५/प्र.क्र.58/2015/भाषा-3, दिनांक 5 ऑगस्ट 2015 अन्वये मंडळाची पुर्नरचना करण्यात आली आहे. मंडळामध्ये एकूण 27 अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत :-
- मौलिक विषयावरील विविध लेखन प्रकल्प हाती घेणे.
- नवलेखकांना उत्तेजन देणे.
- साहित्य संमेलनांना अनुदान देणे.
- लेखन कार्यशाळांचे आयोजन करणे.
- नियतकालिके व साहित्य संस्था यांना अनुदान देणे.
- राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार व विविध वाङ्मय पुरस्कार इ. पुरस्कारांचे वितरण करणे.
- पुस्तक प्रकाशन उपक्रम
(पुरस्कार परिशिष्ट – ५)
(संकेतस्थळ – http://sahitya.marathi.gov.in)
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ संरचना
सचिव गट – अ
⇓
अधीक्षक – १ पद
⇓
प्रपाठक – १ पद
⇓
सहायक लेखा अधिकारी – १ पद
⇓
उच्चश्रेणी लघुलेखक – १ पद
⇓
निम्नश्रेणी लघुलेखक – १ पद
⇓
वरिष्ठ लिपिक – ४ पदे
⇓
ग्रंथालयीन सहायक – १ पद
⇓
लिपिक – टंकलेखक – ७ पदे
⇓
वाहन चालक – १ पद
⇓
शिपाई – २ पदे
३) महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी राज्यकारभारा संबंधी मूलभूत धोरण सूचित करणारी काही सुत्रे सांगितली. त्या सुत्रानुसार मराठी भाषा व साहित्य यांच्या अभिवृध्दिसाठी राज्य शासनाने दिनांक १९ नोव्हेंबर, १९६० रोजी कै. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची स्थापना केली. या मंडळाने जे अनेकविध उपक्रम सुरु केले, त्यांपैकी एक प्रमुख व वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे मराठी विश्वकोशाची निर्मिती हा होय.
सन १९६० पासून महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामध्येच विश्वकोशाचे काम अंतर्भूत होते. तथापि, विश्वकोशाच्या उपक्रमाला चालना मिळावी याकरिता दिनांक १ डिसेंबर, १९८० रोजी “महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ ” या राज्यस्तरीय स्वतंत्र मंडळाची स्थापना करण्यात आली. दिनांक 5 ऑगस्ट, 2015 च्या शासन निर्णयान्वये मंडळाची पुर्नरचना करण्यात आली आहे. मंडळामध्ये एकूण 22 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ:-
विविध विषयांच्या एकत्रित सारभूत नोंदी उपलब्ध व्हाव्यात याकरिता महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. ब्रिटानिका एनसायक्लोपिडीयाच्या धर्तीवर मराठी वर्णमालेनुसार (“अ” ते “ज्ञ” पर्यंत) विश्वकोशाचे एकूण २० खंड प्रकाशित झाले आहेत. पहिला खंड १९७६ मध्ये प्रकाशित झाला होता व २०१६ मध्ये २० वा अंतिम खंड प्रकाशित झाला आहे. पारंपारिक पध्दतीने विश्वकोशचे सर्व खंड प्रकाशित होण्यास ४० वर्षाइतका प्रदीर्घ कालावधी लागला. विश्वकोशाचे काम दर्जेदार व अजोड स्वरुपाचे असले तरी माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात सध्याच्या नोंदीतील तपशील झपाटयाने अद्ययावत करणे गरजेचे आहे. ही बाब विचारात घेता, यापुढे विश्वकोशाचे अद्ययावतीकरण पूर्णपणे संगणकावर करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे तज्ञांनी नोंदी लिहिण्यापासून त्यावर संपादकीय संस्करण करण्यापर्यंतची संपूर्ण प्रक्रीया ऑनलाईन करण्याचे काम सध्या सुरु आहे. यापुढील अद्यावतीकरण वाचकांना / अभ्यासकांना संकेस्थळावर तातडीने उपलब्ध व्हावे याकरीता या कामात मोठया प्रमाणावर शैक्षणिक संस्था व विद्यापीठांचा सहभाग करुन घेण्यात येत आहे. त्यामध्ये मुख्यत्वेकरुन विश्वकोशातील नोंदी वर्णमालेनुसार न ठेवता विषयनिहाय देण्यात येणार असून, याकरीता दिनांक २३ फेब्रुवारी, २०१६ च्या शासन निर्णयान्वये ज्ञानमंडळाची (Knowledge Communities) कार्यपध्दती निश्चित केली आहे. विविध विषयांच्या ६० ते ७० ज्ञानमंडळामार्फत विश्वकोशाचे अद्ययावतीकरण करण्यात येणार असून, आतापर्यंत ४३ विषयनिहाय ज्ञानमंडळे स्थापन झाली आहेत. अन्य ज्ञानमंडळे स्थापनेचे काम सुरु आहे. या सर्व ज्ञानमंडळांना नोंदी लिहिण्यासंबंधीचे प्रशिक्षण देऊन विद्यमान नोंदी अद्ययावत करणे व नवीन नोंदीची नोंद करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे.
मराठी विश्वकोशातील सर्व नोंदी विश्वकोशाच्या संकेतस्थळावर वाचकांसाठी मोफत उपलब्ध आहेत. तसेच हे सर्व २० खंड वाचकांना अधिक सुटसुटीतपणे वापरता यावेत याकरीता आता मोबाईल ॲपच्या स्वरुपातही विश्वकोशाची माहिती वाचकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामुळे आता विश्वकोशातील विविध विषयांच्या नोंदी मोबाईल ॲपवर उपलब्ध असल्याने या उपक्रमास वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.
(संकेतस्थळ:- http://www.marathivishwakosh.org)
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ कार्यालयाची रचना
प्रशासकीय कार्यालय, मुंबई
सचिव – १ (राजपत्रित) |
|
अधीक्षक – १ | सहायक लेखा अधिकारी – १ (राजपत्रित) |
विद्याव्यासंगी सहायक- १ | स्वीय सहायक – १ |
कनिष्ठ लघुलेखक – १ | वरिष्ठ लिपिक – २ |
लिपिक टंकलेखक – २ | वाहनचालक – १ |
शिपाई – २ |
संपादकीय उपकार्यालय, वाई
सहायक सचिव – १ (राजपत्रित) |
|
विद्याव्यासंगी सहायक – ७ | संपादकीय सहायक – ७ |
लिपिक टंकलेखक – ५ | ग्रंथालयीन सहायक – ३ |
शिपाई – ४ | झाडूवाला हमाल – १ |
मानधनावरील पदे |
|
विभाग संपादक – २ | सह संपादक – ३ |
कला संपादक – १ | प्रमुख चित्रकार – १ |
प्रमुख मानचित्रकार – १ | सहायक मानचित्रकार- १ |
संदर्भ सहायक – १ | सहायक-६ |
४) राज्य मराठी विकास संस्था
मराठी भाषा आणि महाराष्ट्राची संस्कृती यांचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन करण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक १ मे, १९९२ रोजी “राज्य मराठी विकास संस्थेची ” स्थापना केली. सदर संस्था “नोंदणी अधिनियम, १८६० ” आणि “ सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० ” अन्वये दिनांक ०२.०१.१९९३ रोजी संस्थेची धर्मादाय आयुक्त, मुंबई यांच्याकडे स्वायत्त संस्था म्हणून नोंदणी झाली. सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर दिनांक ०१.०३.१९९३ पासून संस्थेच्या कामकाजास सुरुवात झाली. तेव्हापासून संस्था मराठी भाषेच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवत आहे. शासन निर्णय, क्रमांक-रामवि-१०१४/प्र.क्र.४४/२०१४/भाषा-३, दिनांक १७.१०.२०१५ अन्वये संस्थेच्या नियामक मंडळाची पुर्नरचना करण्यात आली आहे.
संस्थेच्या नियामक मंडळ / कार्यकारी मंडळ यांच्या सल्ल्याने संस्थेचे कामकाज चालते. सदर संस्थेला शासनाकडून वेतन व वेतनेतर बाबींकरिता सहायक अनुदान देण्यात येते. आतापर्यंत संस्थेकडून विविध भाषीक उपक्रम हाती घेण्यात आले असून सध्या पुस्तकांचे गांव, दुर्मिळ ग्रंथाचे डिजिटायजेशन या सारखे महत्वपूर्ण प्रकल्प संस्थेने हाती घेतले आहे.
(संकेतस्थळ:- http://rmvs.marathi.gov.in)
राज्य मराठी विकास संस्था – कार्यालयाची संरचना
संचालक – (१ पद) | |
उपसंचालक- (१ पद) | वरिष्ठ संशोधन सहायक- (१ पद) |
प्रशासकीय अधिकारी- (१ पद) | कनिष्ठ संशोधन सहायक- (१ पद) |
लेखा अधिकारी- (१ पद) | सहायक – (३ पदे) |
कार्यासन अधिकारी- (१ पद) | |
लघुलेखक- (१ पद) | |
रोखपाल – (१ पद) | |
लिपिक टंकलेखक- (२ पदे) | |
वाहनचालक – (१ पद) | |
शिपाई- (१ पद) |
*****
परिशिष्ट-१
१) मराठी भाषा विभाग (खुद्द)
( अधिकाऱ्यांची यादी व संपर्क दूरध्वनी )
सचिव | सह सचिव | अवर सचिव | कक्ष अधिकारी |
सचिव (मराठी भाषा विभाग)
८ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२. दूरध्वनी क्रमांक (०२२) २२०२७६४९ (०२२) २२७९४१६७ |
सह सचिव (कार्यासन) आस्था-१, आस्था-२, अर्थसंकल्प शाखा, नोंदणीशाखा,भाषा-१,भाषा-२,भाषा-३, रोखशाखा )
८ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२.
|
अवर सचिव (आस्थापना)(कार्यासन – आस्था-१, आस्था-२, रोखशाखा)
८ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ३२. दूरध्वनी क्रमांक (०२२) २२८५१२२२ (०२२) २२७९४१६४ |
कक्ष अधिकारी, कार्यासन-आस्था- दूरध्वनी क्रमांक (०२२) २२७९४१७० |
कक्ष अधिकारी कार्यासन-आस्था-२ दूरध्वनी क्रमांक (०२२) २२७९४१६९ | |||
कक्ष अधिकारी कार्यासन-रोखशाखा दूरध्वनी क्रमांक (०२२) २२७९४२६७ | |||
अवर सचिव (गृहव्यवस्थापन)(कार्यासन-नोंदणी शाखा, भाषा-१, अर्थसंकल्प)
८ वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२. दूरध्वनी क्रमांक (०२२) २२८५१६३९ (०२२) २२७९४१६५ |
कक्ष अधिकारी कार्यासन- नोंदणीशाखा दूरध्वनी क्रमांक (०२२) २२७९४१६९ | ||
कक्ष अधिकारी कार्यासन भाषा-१ दूरध्वनी क्रमांक (०२२) २२७९४१६८ | |||
कक्ष अधिकारी कार्यासन-अर्थसंकल्प दूरध्वनी क्रमांक (०२२) २२७९४१६८ | |||
अवर सचिव (भाषा) (कार्यासन -भाषा-२, भाषा-३)
8 वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई- 400 032 दूरध्वनी क्रमांक (022) 22852298 (022) 22794166 |
कक्ष अधिकारी कार्यासन-भाषा-2
दूरध्वनी क्रमांक (022) 22794170 |
||
कक्ष अधिकारी कार्यासन- भाषा-3 दूरध्वनी क्रमांक (022) 2279416८ |
१) भाषा संचालनालय
(अधिका-यांची यादी व संपर्क दूरध्वनी)
अ.क्र. | पदनाम | कार्यालयीन दूरध्वनी व ईमेल |
१. | भाषा संचालक (प्रभारी) | २६४१७२६५ |
२. | भाषा उप संचालक
(अनुवाद व शब्दावली) |
२९५१०३३१ |
३. | भाषा उप संचालक (विधी) | २९५१०३३१ |
४. | सहायक भाषा संचालक
(अनुवाद व शब्दावली) |
२६५५२१८४ |
५. | सहायक भाषा संचालक
(अनुवाद व शब्दावली) |
२६५५२१८४ |
६. | सहायक भाषा संचालक
(अनुवाद व शब्दावली) |
२६५५२१८४ |
७. | सहायक भाषा संचालक (विधी) | २६५५२१८४ |
८. | प्रभारी सहायक भाषा संचालक (प्रशिक्षण व आस्थापना) | २६५५२१८४ |
९. | भाषा अधिकारी (हिंदी) | २६५५२१८४ |
भाषा संचालनालय – विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांची यादी
अ.क्र. | पदनाम | कार्यालयीन दूरध्वनी व कार्यालयीन ई-मेल |
१. | प्रभारी विभागीय सहायक भाषा संचालक,
विभागीय कार्यालय, नवी मुंबई. |
२७५७३५४२ |
२. | विभागीय सहायक भाषा संचालक,
विभागीय कार्यालय, पुणे. |
०२०-२६१२१७०९ |
३. | विभागीय सहायक भाषा संचालक,
विभागीय कार्यालय, नागपूर. |
०७१२-२५६४९५६ |
४. | विभागीय सहायक भाषा संचालक,
विभागीय कार्यालय, औरंगाबाद. |
०२४०-२३६१३७२ |
२) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
अधिका-यांची यादी व संपर्क दूरध्वनी
पदनाम | कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व ई-मेल |
अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई-४०० ०२५. |
०२२ -२४३२५९३०
ई-मेल : secretary.sblc-mh@gov.in |
सचिव,
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई-४०० ०२५. |
०२२ -२४३२५९२९
ई-मेल : secretary.sblc-mh@gov.in |
कार्यालय,
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई-४०० ०२५. |
०२२ -२४३२५९३१
ई-मेल : secretary.sblc-mh@gov.in |
३) महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
अधिका-यांची यादी व संपर्क दूरध्वनी
पदनाम | कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व ई-मेल |
अध्यक्ष,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई-४०० ०२५ |
०२२-२४२२९०२०, २४२२९०२७.
ई-मेल : vinimaprashasan@yahoo.co.in |
सचिव,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई-४०० ०२५ |
०२२-२४२२९०२०
ई-मेल : vinimaprashasan@yahoo.co.in |
सहायक सचिव,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई, सातारा-४१२८०३ |
०२१६७-२२००५३
ई-मेल : vishwai@yahoo.com |
४) राज्य मराठी विकास संस्था
अधिकाऱ्यांची यादी व संपर्क दूरध्वनी
पदनाम | कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व ई-मेल |
प्रभारी संचालक,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई-४०० 0०1 |
दूरध्वनी क्रमांक
(022) 22631325 फॅक्स -(022) 22653966 rmvs_mumbai@yahoo.com |
वरिष्ठ संशोधन सहायक,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई-४०० 0०1
|
दूरध्वनी क्रमांक
(022) 22631325 फॅक्स -(022) 22653966 rmvs_mumbai@yahoo.com |
कनिष्ठ संशोधन सहायक,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई-४०० ००1
|
दूरध्वनी क्रमांक
(022) 22631325 फॅक्स -(022) 22653966 rmvs_mumbai@yahoo.com |
प्रभारी प्रशासकीय अधिकारी,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई-४०० ००1
|
दूरध्वनी क्रमांक
(022) 22631325 फॅक्स -(022) 22653966
|
लेखा अधिकारी,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई-४०० ००1
|
दूरध्वनी क्रमांक
(022) 22631325 फॅक्स -(022) 22653966 rmvs_mumbai@yahoo.com |
कार्यासन अधिकारी,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई-४०० 0०1
|
दूरध्वनी क्रमांक
(022) 22631325 फॅक्स -(022) 22653966 rmvs_mumbai@yahoo.com |
****************************
परिशिष्ट -२
कार्यपूर्तीचे वेळापत्रक
मराठी भाषा विभाग (खुद्द)
कार्यासन
क्रमांक |
विषय | आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाते. | सेवा पुरविणारा अधिकारी (दालन क्रमांक व दूरध्वनी क्रमांक) | सेवा विहित कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करता येईल तो अधिकारी व त्यांचा दूरध्वनी क्रमांक |
1 | 2 | 3 | 4 | 5 |
आस्था-1 | · भाषा विभाग (खुद्द) आस्थापनाविषयक सर्व बाबी.
· आस्थापनाविषयक समन्वयाच्या सर्व बाबी. · आपले सरकार / माहिती अधिकाराबाबत समन्वय सर्व बाबी. |
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील प्रकरण क्र.3 च्या कलम 10(1) मधील तरतुदीस अनुसरुन, तात्काळ नस्ती शक्यतो त्याच दिवशी आणि तातडीच्या स्वरुपाची नस्ती शक्यतो 4 दिवसात निकाली काढण्यात येते. अन्य विभागाशी संबंधित नसलेल्या नस्तीवर 45 दिवसाच्या आत व दुसऱ्या विभागाशी बाब अंतर्भूत असलेल्या नस्तीवर 3 महिन्याच्या आत निर्णय घेऊन योग्य कार्यवाही करण्यात येते. (धोरणात्मक प्रकरणांचा यामध्ये समावेश नाही.) | मराठी भाषा विभाग,
(022)22794266
अवर सचिव (आस्थापना), मराठी भाषा विभाग,
(022)22851222
|
सह सचिव,
मराठी भाषा विभाग, 8 वा मजला,नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32.
|
नोंदणी शाखा | · आवक / जावक.
· गृहव्यवस्थापन. · विधानमंडळ समन्वय. · समन्वयाच्या अन्य बाबी. · खरेदी |
वरील प्रमाणे. | कक्ष अधिकारी,
मराठी भाषा विभाग, (022)22794169 अवर सचिव (गृह व्यवस्थापन), मराठी भाषा विभाग, (022)22851639
|
सह सचिव,
मराठी भाषा विभाग, 8 वा मजला, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32.
|
रोख शाखा | · मराठी भाषा विभागातील अधिकारी / कर्मचारी यांची वेतन देयके आहरण व संवितरण.
· मराठी भाषा विभाग(खुद्द) खर्चाचा ताळमेळ घालणे. · सेवापुस्तके नोंदी, भविष्य निर्वाह निधीचे लेखे ठेवणे.
|
वरील प्रमाणे. | कक्ष अधिकारी,
मराठी भाषा विभाग, (022) 22794168 (022) 22794267
अवर सचिव (आस्थापना), मराठी भाषा विभाग, (022)22851222 |
सह सचिव,
मराठी भाषा विभाग, 8 वा मजला, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरू चौक,मादाम कामा मार्ग,मंत्रालय, मुंबई-32.
|
अर्थसंकल्प | · अर्थसंकल्पविषयक सर्व बाबी.
· कार्यक्रम अंदाजपत्रक. · लोकलेखा समिती व महालेखापालांकाडील अहवालातील प्रलंबित मुद्दे. · विभांगातर्गत वाहनांची देखभाल / दुरुस्ती |
वरील प्रमाणे. | कक्ष अधिकारी,
मराठी भाषा विभाग, (022)22794168
अवर सचिव (गृहव्यवस्थापन), मराठी भाषा विभाग, (022)22८५१६३९ |
सह सचिव,
मराठी भाषा विभाग, 8 वा मजला, नवीन प्रशासन भवन, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई
|
आस्थापना-2 | · क्षेत्रीय कार्यालयांच्या आस्थापना विषयक सर्व बाबी.
· क्षेत्रीय कार्यालयाचा आकृतीबंध. · गट-अ संवर्गाची आयोगाकडे पाठवावयाची मागणीपत्रे. · क्षेत्रीय कार्यालयांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती व अन्य बाबी. |
वरील प्रमाणे. | कक्ष अधिकारी,
मराठी भाषा विभाग, (022)22794169
अवर सचिव (आस्थापना), मराठी भाषा विभाग, (022)२२८५१२२२
|
सह सचिव,
मराठी भाषा विभाग, 8 वा मजला, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32.
|
भाषा-1 | · अभिजात भाषा दर्जा देणे.
· भाषा धोरण. · भाषा सल्लागार समिती. · भाषा भवन. · क्षेत्रीय कार्यालयातील गृहव्यवस्थापनविषयक सर्व बाबी. · ई-गव्हर्नन्सबाबत सर्व कामकाज |
वरील प्रमाणे.
|
कक्ष अधिकारी,
मराठी भाषा विभाग, (022)22794168
अवर सचिव (गृहव्यवस्थापन), मराठी भाषा विभाग, (022)228516३9 |
सह सचिव,
मराठी भाषा विभाग, 8 वा मजला, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32. |
भाषा-2 | · भाषा संचालनालयाच्या आस्थापना व्यतिरिक्त सर्व बाबी.
· महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाच्या आस्थापना व्यतिरिक्त सर्व बाबी. · राजभाषा अधिनियम 1964 ची अमंलबजावणी. · मराठी / हिंदी भाषा व टंकलेखन/ लघुलेखन परिक्षा धोरण.
|
वरील प्रमाणे. | कक्ष अधिकारी,
मराठी भाषा विभाग, (022)22794170
अवर सचिव (भाषा), मराठी भाषा विभाग, (022)22852298 |
सह सचिव,
मराठी भाषा विभाग, 8 वा मजला, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32.
|
भाषा-3 | · महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे आस्थापना व्यतिरिक्त अन्य सर्व उपक्रम.
· राज्यस्तरीय पुरस्कार. · राज्य मराठी विकास संस्थांच्या प्रकल्प विषयक सर्व बाबी. · प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता. |
वरील प्रमाणे. | कक्ष अधिकारी,
मराठी भाषा विभाग, (022)2279416८
अवर सचिव (भाषा), मराठी भाषा विभाग, (022) 228५२२९८
|
सह सचिव,
मराठी भाषा विभाग, 8 वा मजला, नवीन प्रशासन भवन, हुतात्मा राजगुरू चौक,मादाम कामा मार्ग मंत्रालय, मुंबई-32.
|
या विभागाकडून नागरिकांना कोणत्याही प्रकारची थेट सेवा पुरविण्यात येत नाही.
परिशिष्ट –2
कार्यपूर्तीचे वेळापत्रक
- भाषा संचालनालय
कार्यासन क्रमांक | विषय | आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाईल. | सेवा पुरविणारा अधिकारी/कर्मचारी (दालन क्रमांक व दूरध्वनी क्रमांक) | सेवा विहित कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करता येईल तो अधिकारी व त्याचा दूरध्वनी क्रमांक व ईमेल आयडी |
1. | 2. | 3. | 4. | 5. |
कार्यासन 5/6 | विद्यापीठीय स्तरावरील निरनिराळया शास्त्रीय व तांत्रिक विषयाचे परिभाषा कोश तयार करणे व भाषा संचालनालयाची अन्य प्रकाशने तयार करणे | — | 1) उपसंचालक,
भाषा संचालनालय, मुंबई. 2) सहाय्यक संचालक, भाषा संचालनालय, मुंबई. 3) पर्यवेक्षक, भाषा संचालनालय, मुंबई. |
भाषा संचालक,
महाराष्ट्र राज्य. दू.क्र. 26417265 director.dol-mh@gov.in |
कार्यासन 7 | राज्यपालांचे अभिभाषण, शासनाचे आदेश, अधिसूचना, अधिनियम, शासकीय व अशासकीय विधेयके, अध्यादेश तसेच संकीर्ण प्रकरणांचा हिंदी अनुवाद करणे. | तात्काळ कालमर्यादित कामे | 1) भाषा अधिकारी (हिंदी),
भाषा संचालनालय, मुंबई 2) पर्यवेक्षक,भाषा संचालनालय, मुंबई |
—//— |
कार्यासन 8 | राज्यपालांचे अभिभाषण, वित्तमंत्री यांचे अर्थसंकल्पीय अभिभाषण, अध्यादेश, शासकीय व अशासकीय विधेयके, राज्य अधिनियम इत्यादी विषयक मराठी अनुवादाची कामे करणे. | —//— | 1) भाषा उपसंचालक (विधि), भाषा संचालनालय, मुंबई.
2)सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई. 3) पर्यवेक्षक, भाषा संचालनालय, मुंबई. |
—//—
|
कार्यासन
8-अ |
राज्य अधिनियमाखालील अधिसूचना, नियम, आदेश व उपविधि यासारख्या दुय्यम विधि विधानांच्या मराठी अनुवादाची कामे करणे. | —//— | 1) भाषा उप संचालक,
भाषा संचालनालय, मुंबई 2) सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई 3) पर्यवेक्षक, भाषा संचालनालय, मुंबई |
—//— |
कार्यासन 9 | वित्त विभागामार्फत विधान मंडळात सादर केले जाणारे अर्थसंकल्पविषयक निवेदन, अर्थसंकल्पविषयक मागणी, अधिक खर्चाची मागणी, त्या त्या वर्षाच्या खर्चाचे पूरक विवरणपत्र यासारख्या अर्थसंकल्पविषयक प्रकाशनांचा मराठी अनुवाद करणे. | —//— | 1) भाषा उपसंचालक,
भाषा संचालनालय, मुंबई 2) सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई 3) पर्यवेक्षक, भाषा संचालनालय, मुंबई |
—//— |
कार्यासन 10 | केंद्रीय अधिनियम यांचा मराठी अनुवाद करणे, न्याय व्यवहार कोश तयार करणे, | अनुवाद विहीत कालमर्यादेत करून देण्यात येतो. | 1) भाषा उपसंचालक,
भाषा संचालनालय, मुंबई. 2) सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई. 3) पर्यवेक्षक, भाषा संचालनालय, मुंबई. |
—/—
|
कार्यासन 12 (14/12) | विभागीय नियमपुस्तिका, प्रपत्रे इत्यादींचा अनुवाद करणे तसेच केंद्र, शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, मंडळे, महामंडळे, स्वायत्त संस्था यांच्याकडून येणारी खाजगी अनुवादाची कामे करणे. | —//— | 1) सहायक भाषा संचालक,
भाषा संचालनालय, मुंबई 2) पर्यवेक्षक व प्र.सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई |
—//— |
कार्यासन 13 | शासनाचे विविध प्रकारचे गोपनीय चौकशी अहवाल, लोकआयुक्तांचे अहवाल, प्रमाण नमुने, मंत्रिमंडळाच्या टिप्पण्या, निवडणूक विषयक अनुवादाची कामे इ. संकीर्ण अनुवादाची कामे. | अनुवादाची कामे तातडीची असल्याने तात्काळ करून देण्यात येतात. | 1) सहा. भाषा संचालक,
भाषा संचालनालय, मुंबई 2) सहा. भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई 3) पर्यवेक्षक, भाषा संचालनालय, मुंबई |
—//—
|
कार्यासन 13अ | प्रत्येक वर्षाचे वित्तीय लेखा, विनियोजन लेखा, ब्रोशर पुस्तिका, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचा अहवाल यांचा मराठी अनुवाद करणे. | —//— | 1) सहा. भाषा संचालक,
भाषा संचालनालय, मुंबई 2) सहा. भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई 3) पर्यवेक्षक, भाषा संचालनालय, मुंबई |
—//— |
कार्यासन 14 | · मुख्यालय तसेच विभागीय कार्यालये यांच्या आस्थापनेवरील सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या सेवा विषयक बाबी .
· ई-गव्हर्नन्स. · आस्थापनाविषयक समन्वयाच्या सर्व बाबी.
|
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांचे बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील प्रकरण क्र.3 च्या कलम10(1) मधील तरतुदीस अनुसरुन, तात्काळ नस्ती शक्यतो त्याच दिवशी आणि तातडीच्या स्वरुपाची नस्ती शक्यतो 4 दिवसात निकाली काढण्यात येईल. अन्य विभागाशी संबंधित नसलेल्या नस्तीवर 45 दिवसाच्या आत वदुसऱ्या विभागाशी बाब अंतर्भूत असलेल्या नस्तीवर 3 महिन्याच्या आत निर्णय घेऊन योग्य कार्यवाही करण्यात
येईल. |
1) प्र. सहायक भाषा संचालक,
भाषा संचालनालय, मुंबई 2) अधीक्षक, भाषा संचालनालय, मुंबई
|
—//—
|
कार्यासन 15 | शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर या शासनाच्या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे काम शासनाने या कार्यालयाकडे सोपविले आहे त्या अनुषंगाने शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, मंडळे, महामंडळे, स्वायत्त संस्था या कार्यालयातून राजभाषा मराठीचा वापर किती प्रमाणात करण्यात येतो त्याची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल शासनाला पाठवण्यात येतो. | — // — | 1) प्र. सहायक भाषा संचालक,
भाषा संचालनालय, मुंबई 2) अधीक्षक, भाषा संचालनालय, मुंबई |
—//—
|
कार्यासन 16 | · भाषा संचालनालयातील अधिकारी / कर्मचारी यांची वेतन देयके आहरण व संवितरण
· देयकांच्या अनुषंगाने आवश्यक त्या हिशोबांच्या नोंदवहया ठेवणे. · सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे. · भाषा संचालनालयाच्या खर्चाचा ताळमेळ घालणे. · गट ड कर्मचाऱ्यांच्या भविष्यनिर्वाह निधीचे लेखे ठेवणे. · लेखापरीक्षणाबाबतची सर्व प्रकारची कामे. · कार्यरत व सेवानिवृत्त राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचेकरिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमाछत्र योजना लागू करणे. · अधिकारी / कर्मचारी यांच्या वेतनातून विहित वेळेत आयकर कपात करुन भरणा करणे. |
—//— | 1) प्र. सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई
2) अधीक्षक, भाषा संचालनालय, मुंबई |
—//— |
कार्यासन 17 | · शासनाच्या एतदर्थ मंडळामार्फत शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, मंडळे, महामंडळे, स्वायत्त संस्था या कार्यालयातील राजपत्रित अधिकाऱ्यांसाठी व अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा वर्षातून 2 वेळा घेण्यात येतात.
· शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी हिंदी भाषा निम्नश्रेणी व उच्चश्रेणी या परीक्षा माहे जून व डिसेंबर या महिन्यात घेण्यात येतात त्याबाबतचे सर्व कामकाज. · एतदर्थ मंडळामार्फत शासकीय / निमशासकीय कार्यालयातील इंग्रजी लघुलेखक, लघुटंकलेखक, लिपिक टंकलेखक यांच्यासाठी घेण्यात येणाऱ्या मराठी लघुलेखन व टंकलेखन परीक्षा माहे एप्रिल व ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्यात येतात त्याबाबतचे सर्व कामकाज. |
—//— | 1) प्र. सहायक भाषा संचालक,
भाषा संचालनालय, मुंबई 2) अधीक्षक, भाषा संचालनालय, मुंबई |
—//— |
कार्यासन
18 |
मुंबई व महाराष्ट्र अधिनियमांचे अद्ययावतीकरण करणे व मुद्रण तसेच संहितीकरण करणे इत्यादी कामे. | विहित वेळेत ही कामे करण्यात येतात. | 1) भाषा उप संचालक,
भाषा संचालनालय, मुंबई 2) सहायक भाषा संचालक, भाषा संचालनालय, मुंबई 3) पर्यवेक्षक, भाषा संचालनालय, मुंबई |
—//— |
** या कार्यालयाकडून नागरिकांना कोणत्याही प्रकारची थेट सेवा पुरविण्यात येत नाही.
परिशिष्ट –2
कार्यपूर्तीचे वेळापत्रक
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
कार्यासन क्रमांक | विषय | आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाते. | सेवा पुरविणारा अधिकारी/कर्मचारी (दालन क्रमांक व दूरध्वनी क्रमांक) | सेवा विहित कालावधीत पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करता येईल तो अधिकारी व त्यांचा दूरध्वनी क्रमांक |
मंडळाची आस्थापना शाखा
|
मंडळाच्या आस्थापनाविषयक बाबींची पूर्तता करणे आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी पाहणे, मंडळाच्या कार्यालयात सर्वसाधारण देखरेख ठेवणे, शिस्त राखणे, कनिष्ठ कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करणे, शासनाशी व इतर कार्यालयाशी पत्रव्यवहार करणे, विधानसभा / विधानपरिषद प्रश्नांच्या संदर्भात कार्यवाही करणे, सचिवांच्या गैरहजेरीत इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व जनतेशी कार्यालयीन व्यवहार, तसेच दूरध्वनी करणे, सचिवांच्या सुचनेनुसार वार्षिक अंदाजपत्रक, सुधारित अंदाजपत्रक, पंचवार्षिक योजना यासंबधीचे आराखडा तयार करणे, गोपनीय अभिलेख सांभाळणे, कर्मचाऱ्यांची रजा, अग्रीमे बघणे, लेखा परिक्षण व लेखाविषयक कामे, लोकलेखा समितीशी संवाद इत्यादी. कार्यालयाने वेळोवेळी सोपविलेली इतर कामे नियमित पार पाडणे. | शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रकानुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे.
|
अधीक्षक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटय मंदिर इमारत, 2 रा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई – 400025
दूरध्वनी क्रमांक. (022)24325931 ई मेल आयडी –
|
सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,
रवींद्र नाटय मंदिर इमारत, 2 रा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई -400 025 दूरध्वनी क्रमांक – (022) 24325929
|
मंडळाची पुस्तक प्रकाशन शाखा व ललित /
ललितेतर पुस्तकांना अनुदान शाखा
|
मंडळाच्या व समित्यांच्या बैठकींची सर्व कामे, बैठकींची विषयसूची व वृत्तांत तयार करणे, मंडळाच्या व समितींच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयावर विशेषत: वाङ्मयीन निर्णयावर कार्यवाही करणे, मंडळाकडे आलेल्या हस्तलिखितांवर त्यांचे लेखक, प्रकाशक व मुद्रणालय यांच्याशी कार्यक्रमानुसार व मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार पत्रव्यवहार करणे, मंडळाने प्रकाशनार्थ/अनुदानार्थ स्वीकारलेल्या हस्तलिखितांची पूर्ण माहिती सुरक्षित ठेवणे व त्यावर मंडळाच्या निर्णयानुसार कार्यवाही करणे, हस्तलिखित मुद्रणालयास सोपविण्यापूर्वी त्याची प्रत्यक्ष तपासणी करून ती व्यवस्थित व परिपूर्ण आहेत का याची खात्री करणे, पुस्तक मुद्रणार्थ प्रकाशकाकडे सोपविणे, पुस्तके प्रकाशित होईपर्यंत प्रकाशकांशी / मुद्रणालयांशी आणि लेखकांशी पत्रव्यवहार करणे, विविध मुद्रणालयांकडे / प्रकाशकांकडे सोपविलेल्या पुस्तकांच्या कामाच्या सततच्या प्रगतीवर व ती पुस्तके लवकर प्रकाशित होण्यावर लक्ष ठेवणे, मुद्रित झालेली पुस्तके प्रकाशित करून ती मंडळाच्या सदस्यांना वितरित करणे, तसेच मंडळाच्या वतीने स्वीकारलेल्या पुस्तकासंबंधी विविध लेखक, संपादकांकडून करारपत्र करून घेणे, त्याचप्रमाणे प्रकाशकांकडे प्रकाशनासाठी सोपविलेल्या पुस्तकासंबधी प्रकाशकांशी पत्रव्यवहार करणे, प्रदर्शने, जाहिराती याद्वारे मंडळाच्या प्रकाशनांची व मंडळाच्या वाङ्मयीन कार्याची प्रसिध्दी करणे, स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना, अन्य मराठी साहित्य संमेलनास अनुदान योजना व मंडळाच्यावतीने हाती घेण्यात येणारे विविध वाड्:मयीन बृह्दप्रकल्पा संदर्भातील कामकाज पार पाडणे व कार्यालयाने वेळेावेळी सोपविलेली इतर कामे पार पाडणे. | शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रकानुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे.
|
प्रपाठक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, 2 रा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई – 400 025
दूरध्वनी क्रमांक. (022) 24325931 ई मेल आयडी – secretary.sblc-mh@gov.in
|
सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, 2 रा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई – 400 025
दूरध्वनी क्रमांक – (022) 24325929
|
नवलेखक अनुदान शाखा / नवलेखक कार्यशाळा शाखा /
नियतकालिक अनुदान शाखा
|
नवलेखक अनुदान योजनेची दरवर्षी जाहिरात प्रसिद्धीस देणे, जाहिरातीनुसार आलेली हस्तलिखिते वाङ्मय प्रकारानुसार नोंद घेणे, रजिस्टर ठेवणे,नवलेखक अनुदान समितीच्या बैठकीत विचारार्थ ठेवणे, बैठकीसंबधी विषयसूची, वृत्तांत तयार करणे, बैठकीत झालेल्या निर्णयानुसार निवड झालेली हस्तलिखिते तज्ज्ञांकडे अभिप्रायार्थ सोपविणे तदनंतर हस्तलिखीते प्रकाशनार्थ प्रकाशकांकडे सोपविणे, लेखकाशी, तज्ज्ञांशी, प्रकाशकांशी पत्रव्यवहार करणे, नवलेखकांना मार्गदर्शन व्हावे म्हणून वाङ्मयप्रकारानुसार कार्यशाळांचे आयोजन करणे,
मंडळातर्फे अनुदान मिळत असलेल्या नियतकालिकांना नियमित अनुदान वाटप करणे, नियतकालिक संस्थांशी पत्रव्यवहार करणे, नियतकालिक बैठकीत नियतकालिकांची विषयसूची ठेवणे, त्यावर झालेले निर्णय संबंधितांना कळविणे, वृत्तांत लिहिणे वगैरे तसेच कार्यालयाने सोपविलेली इतर कामे. |
शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रकानुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे.
|
वरिष्ठ लिपिक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटय मंदिर इमारत, 2 रा मजला, सयानी रोड, प्रभादेवी,
मुंबई- 400 ०25 दूरध्वनी क्रमांक – (022) 24325931 ई मेल आयडी – secretary.sblc-mh@gov.in
|
सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,
रवींद्र नाटय मंदिर इमारत, 2 रा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई -400 025 दूरध्वनी क्रमांक – (022) 24325929
|
मंडळाची लेखाशाखा
|
मंडळाच्या कार्यालयातील मासिक वेतन देयके, अध्यक्षांचे मानधन व आतिथ्य भत्ता, मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांचे प्रवास व बैठक भत्ता देयके, आकस्मिक खर्चाची देयके, स्थायी अग्रीम नोंदवही, रोखीचे पुस्तक (Cash Book) आकस्मिक व इतर खर्चाची वर्गीकृत नोंदवही तसेच उत्सव अग्रीम, आगाऊ प्रवास भत्ता, वेतन व भत्ते इत्यादी तसेच वर्ग 3 व 4 कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधी, अग्रीम नोंदवही इत्यादी तपासणी. वार्षिक अंदाजपत्रक, सुधारित अंदाजपत्रक, वार्षिक विकास कार्यक्रम आदीसंबंधीची माहिती तयार करणे, लेखा आक्षेपांना उत्तर देणे, खर्च मेळ, विनियोजन लेख्यासंबधी माहिती घेणे, महालेखापाल कार्यालयाकडून होणाऱ्या वार्षिक लेखापरिक्षण पथकास माहिती व कागदपत्रे पुरविणे, रोखीचे व्यवहार पाहणे, एन.ई.एफ. टी करणे /धनादेश पाठविणे तसेच कॅशबुक, स्थायी अग्रीम नोंदवही, आकस्मिक खर्च नोंदवही, वर्ग – 4 च्या कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची नोंदवही, देयक नोंदवही अद्ययावत ठेवणे, लेखाशाखेतील कागदपत्र सुरक्षित ठेवणे, तसेच किरकोळ पत्रव्यवहार करणे. कार्यालयीन सर्व प्रकारची देयके (आकस्मिक, प्रवासभत्ता व इतर) तयार करून अधिदान व लेखा कार्यालयास सादर करणे, पदाच्या अनुषंगाने येणारी व कार्यालयाने सोपविलेली इतर कामे. | शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रकानुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे.
|
सहायक लेखा अधिकारी व लिपिक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटय मंदिर इमारत, 2 रा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई – 4000 25
दूरध्वनी क्रमांक. (022) 24325931 ई मेल आयडी – secretary.sblc-mh@gov.in
|
सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटय मंदिर इमारत, 2 रा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई – 400 025
दूरध्वनी क्रमांक – (022) 24325929
|
ग्रंथालय शाखा
|
मंडळाच्या कार्यालयातील ग्रंथाची देखभाल करणे व ग्रंथाची नोंदवहीत नोंद ठेवणे, कार्यालयातील शोकेसमध्ये नव्याने प्रकाशित होणारी मंडळाची व मंडळाच्या अनुदानाने प्रकाशित झालेली सर्व पुस्तके लावणे, जनतेच्या मागणीनुसार मंडळाच्या प्रकाशनाची सूची पाठविणे. मंडळाच्या वेळोवेळी होणाऱ्या बैठकीस व उपसमितीच्या बैठकीस उपस्थित सदस्यांना प्रकाशित पुस्तकांचे वाटप करणे व देवघेव नोंदवहीत नोंद ठेवणे. ग्रंथालयाशी संबंधित वेळोवेळी नेमून दिलेली इतर कामे. | शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रकानुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे.
|
ग्रंथालयीन सहायक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाटय मंदिर इमारत, 2 रा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई – 400 025
दूरध्वनी क्रमांक. (022)24325931 ई मेल आयडी – secretary.sblc-mh@gov.in
|
सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,
रवींद्र नाटय मंदिर इमारत, 2रा मजला, सयानी रोड, प्रभादेवी, मुंबई – 400 025 दूरध्वनी क्रमांक. (022) 24325929
|
परिशिष्ट –2
कार्यपूर्तीचे वेळापत्रक
४) महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
कार्यासन क्रमांक | विषय | आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाते | सेवा पुरविणारा अधिकारी/कर्मचारी (दालन क्र. व दूरध्वनी क्र.) | सेवा विहीत कालावधी पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करता येईल तो अधिकारी व त्याचा दूरध्वनी क्र. |
1 | 2 | 3 | 4 | 5 |
1. | आस्थापना-1 :-
1) कर्मचारी भरती प्रक्रिया, नेमणुका, बदल्या इ. बाबींची हाताळणी करणे. 2) कार्यालयातील आस्थापनाविषयक कामे आणि कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक बाबी पाहणे. 3) शासन व इतर कार्यालयांशी पत्रव्यवहार करणे, कार्यालयीन आस्थापनेविषयक महत्वाचे प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करणे. 4) कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके वेतन पडताळणी पथकाकडे तपासणीसाठी पाठविणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवनिवृत्तीची प्रकरणे हाताळणे. 5) गोपनीय अभिलेख, कर्मचाऱ्यांची विविध प्रकारची अग्रिमे मंजूरीसाठी पाठविणे व इतर कार्यालयीन अभिलेखांची नोंद घेणे व सांभाळणे. 6) माहिती अधिकाराअंतर्गत माहिती देणे, अपील, मासिक अहवाल देणे इ. कामे. 7) विभागीय चौकशीची प्रकरणे हाताळणे, न्यायालयीन प्रकरणे हाताळणे व त्याबाबत न्यायालयात उपस्थित रहाणे |
महाराष्ट्र शासकीय कर्मचारी यांचे बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील प्रकरण क्र. 3 च्या कलम 10(1) मधील तरतुदीस अनुसरून वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रकानुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे. | अधीक्षक,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400 025. दूरध्वनी क्र. (022) 24229020 |
सचिव,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रशासकीय कार्यालय, रवींद्र नाट्यमंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई – 400025. दूरध्वनी क्र. 24229020. ईमेल आयडी – vinimaprashasan@ yahoo. co.in
|
2
|
आस्थापना-2 :-
1) मुंबई व वाई कार्यालयातील कर्मचाऱ्यांची रजा विषयक प्रकरणे हाताळणे. 2) प्रशासकीय कार्यालय, मुंबई येथील कर्मचाऱ्यांचे हजेरीपत्रक हाताळणे. 3) मुंबई व वाई कार्यालयातील कर्मचाऱ्यांची सेवापुस्तके अद्ययावत ठेवणे. 4) विधानसभा / विधानपरिषद प्रश्नांबाबत कार्यवाही करणे. 5) नागरिकांची सनद, महिला विषयक धोरणाची अंमलबजावणी इ. कामे पार पाडणे. 6) शासनास नियतकालिक विवरण (Perodical Return) पाठविणे. 7) पोस्टेज स्टॅम्प मिळविणे व त्याचा दैनंदिन व वार्षिक हिशोब ठेवणे. 8) आवक जावक विषयक नोंदी करणे. 9) निवड फाईल ठेवणे, रेकॉर्ड झालेली प्रकरणे संकलित (complied) करणे. 10) कार्यालयाशी संबंधित संकीर्ण पत्रव्यवहार करणे. 11) पदांचा मासिक अहवाल तयार करणे. 12) कर्मचाऱ्यांच्या मालमत्ता विषयक माहिती देणे. 13) अभ्यागत संपादक निमंत्रित करण्याबाबत पत्रव्यवहार हाताळणे. |
महाराष्ट्र शासकीय कर्मचारी यांचे बदल्यांचे विनियमन व शासकीय कर्तव्ये पार पाडण्यास होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005 मधील प्रकरण क्र. 3 च्या कलम 10(1) मधील तरतुदीस अनुसरून वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रकानुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे. | अधीक्षक,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400 025. दूरध्वनी क्र. 022-24229020 |
सचिव,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रशासकीय कार्यालय, रवींद्र नाट्यमंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई – 400025. दूरध्वनी क्र. 24229020. ईमेल आयडी – vinimaprashasan@yahoo. co.in
|
३. | लेखाशाखा:-
1) मंडळाच्या मुंबई कार्यालयातील मासिक वेतन देयके व अध्यक्षांचे मानधन देयक तयार करणे. 2) मंडळाचे अध्यक्ष व सभासदांची तसेच दोन्ही कार्यालयातील कर्मचाऱ्यांची बैठक भत्ता व प्रवास भत्ता देयके करणे / पारीत करून घेणे. 3) रोखीचे व्यवहार हाताळणे, रोख नोंदवहीत नोंद घेणे व तद्नुषंगिक अन्य कामे पूर्ण करणे. नोंदवह्यातील नोंदी घेणे (स्थायी अग्रिम नोंदवही, आकस्मिक व इतर खर्चासाठी वर्गीकृत संक्षिप्त नोंदवही, उत्सव अग्रिमधन नोंदवही, आगाऊ प्रवासभत्ता नोंदवही, वेतन व भत्ते नोंदवही इ. 4) वर्ग 3 व 4 च्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधी अग्रिमधन नोंदवही इ. ची तपासणी करणे व सांभाळणे. 5) संक्षिप्त देयके व सविस्तर देयके तयार करणे. 6) वार्षिक अंदाजपत्रक, कार्यक्रम अंदाजपत्रक/ सुधारित अंदाजपत्रक, वार्षिक विकास कार्यक्रम आदीसंबंधी ढोबळ माहिती तयार करणे. 7) खर्चाच्या ताळमेळसंबंधी कामे व विनियोजन लेखासंबंधी माहिती तयार करणे व शासनास सादर करणे. 8)महालेखापाल कार्यालयाकडून होणाऱ्या वार्षिक लेखा परीक्षण पथकास माहिती पुरविणे, कागदपत्र पुरविणे व लेखा आक्षेपांची उत्तरे तयार करणे. 9) सहायक जनमाहिती अधिकारी म्हणून लेखाविषयक माहिती देणे. 10) कार्यालयाने वेळोवेळी सोपविलेली इतर कामे पार पाडणे. |
शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रकानुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे.
|
सहायक लेखा अधिकारी,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025. दूरध्वनी क्र.022-24229020 |
सचिव,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रशासकीय कार्यालय, रवींद्र नाट्यमंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई – 400025. दूरध्वनी क्र. 24229020. ईमेल आयडी –
|
४. | भांडार, प्रकाशन व सभा शाखा :-
1)कार्यालयाच्या, मंडळाच्या तसेच उपसमित्यांच्या वेळोवेळी बैठका बोलाविणे, विषयसूची तयार करणे व बैठकींचा वृत्तांत लिहिणे,सदस्यांना पाठविणे. 2) मंडळाच्या विविध बैठका, कार्यशाळा, प्रशिक्षण इ. ची व्यवस्था पाहणे. 3) मंडळाच्या बैठकांच्या वृत्तांतातील निर्णयानुसार पुढील कार्यवाही करणे कार्यवाहीसाठी पाठविणे. ४) मंडळाच्या वाङ्मयीन कार्यक्रमासंबंधात विविध संस्था / कार्यालये इत्यादींशी पत्रव्यवहार करणे. ५) मंडळातर्फे प्रकाशित होत असलेल्या मराठी विश्वकोश खंडांच्या विक्रीसंबंधात हिशोब ठेवणे व अहवाल मागविणे. ६) मंडळाच्या वाङ्मयीन कार्यासंबंधात शासकीय कार्यालये, पुस्तक विक्री केंद्रे, पाठ्यपुस्तक मंडळ व त्यांच्या भांडार विक्री केंद्रांशी पत्रव्यवहार करणे, हिशोब ठेवणे. ७) मंडळाचे विविध उपक्रमांचे प्रस्ताव तयार करणे व मान्यता घेणे. ८) विश्वकोश मुद्रण, पुनर्मुद्रणासंबंधीची कामे करणे, मुद्रणाच्या खर्चाचे हिशोब ठेवणे. ९) मंडळाच्या प्रकाशनांची वितरण व्यवस्था पाहणे, त्यासंबंधीचे हिशोब ठेवणे. 1०) कार्यालयासाठी जडसंग्रह वस्तू, पुस्तके, साहित्य खरेदी करणे व त्याची नोंद जडसंग्रह वस्तू नोंदवहीत ठेवणे, कार्यालयातील खरेदी करण्यात आलेल्या वस्तूंची देखभाल व दुरुस्ती करणे. 1१) सहायक जनमाहिती अधिकारी म्हणून प्रकाशन व सभा विषयक माहिती देणे. 1२) कार्यालयाने वेळोवेळी सोपविलेली कामे करणे. |
शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रकानुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे.
|
अधीक्षक,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई-400025. दूरध्वनी क्र. 022-24229020 |
सचिव,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रशासकीय कार्यालय, रवींद्र नाट्यमंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई – 400 025. दूरध्वनी क्र. 24229020
ईमेल आयडी – vinimaprashasan@yahoo.co.in
|
** या कार्यालयाकडून नागरिकांना कोणत्याही प्रकारची थेट सेवा पुरविण्यात येत नाही.
परिशिष्ट-२
कार्यपूर्तीचे वेळापत्रक
४–अ) मराठी विश्वकोश कार्यालय, वाई, जि. सातारा
कार्यासन क्रमांक | विषय | आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाते | सेवा पुरविणारा अधिकारी/कर्मचारी
(दालन क्र. व दूरध्वनी क्र.) |
सेवा विहीत कालावधी पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करता येईल तो अधिकारी व त्याचा दूरध्वनी क्र. |
1 | 2 | 3 | 4 | 5 |
1. | आस्थापना शाखा:-
1) वाई येथील संपादकीय उपकार्यालयावर सर्वसाधारण नियंत्रण ठेवणे, प्रत्यक्षात पाहणी/ देखरेख ठेवणे, निरीक्षण / तपासणी करणे व दैनंदिन कामे पाहणे. तसेच कार्यालयाच्या कार्यक्षम व सुरळीत कारभारास जबाबदार राहणे. 2) वाई कार्यालयाच्या कार्यकक्षेतील आस्थापकीय व प्रशासकीय कामे पाहणे व प्रशासकीय कार्यालयांशी पत्रव्यवहार करणे. 3) मंडळाच्या मासिक तसेच विविध उपसमित्यांच्या बैठकांना हजर राहणे. सचिवांच्या गैरहजेरीत या बैठकांचे काम स्वत: पाहणे. 4) मंडळाच्या मराठी विश्वकोश खंडांच्या खरेदी / विक्रीसंबंधात आढावा घेण्यासाठी पाठ्यपुस्तक मंडळाची विभागीय कार्यालयांशी पत्रव्यवहार करणे. 5) सचिवांना मंडळाच्या संपादकीय व प्रशासकीय सर्व कारभारात मदत करणे उपयुक्त असणे. 6) जनमाहिती अधिकारी म्हणून काम पहाणे. |
शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रकानुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे.
|
सहायक सचिव,
मराठी विश्वकोश कार्यालय, गंगापूरी, वाई जि. सातारा-412803. दूरध्वनी क्र. 02167- 220053, 220154
ईमेल आयडी – mvkosh@gmail. com |
सचिव,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रशासकीय कार्यालय, रवींद्र नाट्यमंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई – 400025. दूरध्वनी क्र. 24229020.
ईमेल आयडी – vinimaprashasan @yahoo.co.in
|
2. | लेखा शाखा :-
1) वाई कार्यालयाचे कार्यालय प्रमुख आणि आहरण व संवितरण अधिकारी म्हणून दैनंदिन कामाची जबाबदारी पार पाडणे. 2) रोखीचे पुस्तक (cash book), आकस्मिक खर्च नोंदवही तसेच इतर महत्त्वाच्या नोंदवह्या तयार ठेवणे. 3) वाई कार्यालयातील कर्मचाऱ्यांची मासिक वेतन देयके, आकस्मिक खर्च व इतर खर्चाची देयके मंजूर करणे. |
शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रकानुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे.
|
सहायक सचिव,
मराठी विश्वकोश कार्यालय, गंगापूरी, वाई जि. सातारा-412803. दूरध्वनी क्र. 02167- 220053, 220154 ईमेल आयडी – mvkosh@gmail. com |
सचिव,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रशासकीय कार्यालय, रवींद्र नाट्यमंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई – 400025. दूरध्वनी क्र. 24229020. ईमेल आयडी –
|
3. | संपादकीय टंकलेखन:-
मराठी विश्वकोश खंड आणि इतर संबंधित संपादकीय कामाच्या नोंदींचे टंकलेखन करणे. |
|||
4. | संपादकीय कामे:-
1) प्रमुख संपादक / विभाग संपादक यांच्या मार्गदर्शनाखाली विश्वकोशाच्या सोपविण्यात आलेल्या शाखेच्या – मानव्यविद्या कक्ष / विज्ञान आणि तंत्रविद्या कक्ष- अंतिम संपादनास जबाबदार असणे. त्यासाठी आवश्यक ते सर्व संदर्भ, साहित्य उपलब्ध करून घेणे. 2) सहसंपादक, विद्याव्यासंगी सहायक व संपादकीय सहायक यांना संपादन कामाचे वाटप करणे, कामाचे नियोजन व अंमलबजावणी करून कामावर नियंत्रण ठेवणे. 3) विश्वकोश व कुमार विश्वकोशातील अभ्यागत संपादकांमध्ये संपादन कामाचे वाटप करणे, अद्ययावतीकरण कामासंबंधात त्यांच्या शंका / अडचणीसंबंधी चर्चा करणे, निर्णय देणे. 4) विविध विषयातील तज्ज्ञ व्यक्तींना लेखन, समीक्षण, संपादन करण्यासाठी सहभागी करून घेणे, आवश्यकतेनुसार सदर कामे स्वत: करणे. 5) कुमार विश्वकोश आणि मराठी विश्वकोशातील नोंदींचे संदर्भ विचारात घेऊन जबाबदारीने अंतिम संपादन करणे. 6) कला विभागाच्या सहाय्याने नोंदी सोबत येणारी चित्रे, नकाशे, आराखडे, चित्रपत्रे इ. ची नियोजन करणे, अंमलबजावणी करणे. 7) विश्वकोशातील विषयाच्या आवश्यकतेनुसार त्या त्या विषयातील नोंदी संपादनासाठी निमंत्रित करावयाच्या अभ्यागत संपादकांच्या शिफारशी करणे. 8) मराठी विश्वकोश खंडाचे पुनर्मुद्रणासाठी मूळ चित्रे मुद्रणालयास उपलब्ध करुन देणे, मुद्रणावर लक्ष ठेवून ते तपासून त्यास मान्यता देऊन मुद्रण करुन घेणे. प्रमुख संपादकांच्या मार्गदर्शनाने विश्वकोश संकेतस्थळ, सीडी, पेनड्राईव्ह इ. स्वरुपात प्रकाशित करण्यास जबाबदार असणे तसेच विश्वकोश प्रकाशनासाठी नवीन माध्यमांचा शोध घेऊन त्यात प्रकाशित करणे. 9) मराठी विश्वकोश अद्ययावत करण्यासाठी नवीन उपक्रमांची आखणी करणे, कुमार विश्वकोश, बाल विश्वकोश इ. योजना राबविणे. 10) नवीन तंत्रज्ञानाचा विश्वकोश अद्ययावतीकरणात वापर करणे. 11) विश्वकोश विद्यार्थी, शिक्षक, जन सामान्यांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्नशील असणे, प्रसार, प्रचार करणे. 12) संपादन कार्यासाठी आवश्यक असणाऱ्या संदर्भ पुस्तकांची व इतर साहित्याची मागणी नोंदविणे, प्राप्त करून घेणे. 13) शाखेशी संबंधित आवश्यक तो पत्रव्यवहार करणे. 14) सर्वसाधारणपणे विश्वकोश संपादन व मुद्रण कामात प्रमुख संपादक यांना उपयोगी आणि जबाबदार असणे. |
शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रकानुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे.
|
विभाग संपादक,
मराठी विश्वकोश कार्यालय, गंगापूरी, वाई जि. सातारा-412803 दूरध्वनी क्र. 02167- 220053, 220154 |
सचिव,
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रशासकीय कार्यालय, रवींद्र नाट्यमंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई – 400025. दूरध्वनी क्र. 24229020.
ईमेल आयडी -vinimaprashasan@yahoo.co.in
|
1) प्रमुख संपादक /विभाग संपादक कार्यालयाच्या निर्देशानुसार व देखरेखीखाली सोपविण्यात आलेल्या विषयातील अभ्यास, नैपुण्य व विशेषता लक्षात घेऊन विश्वकोशातील नोंदीचे लेखन/समीक्षण करणे, करवून घेणे व त्याबाबतच्या प्रकरणिका हाताळणे व जतन करणे.
2) नोंदीशी संबंधित चित्रे, नकाशे, आराखडे, चित्रपत्रे, दृक-श्राव्य माध्यमातील चलचित्रे इ. तयारी करणे, करवून घेणे व प्रमुख संपादकांच्या मान्यतेने अंतिम करणे. 3) विश्वकोशातील नोंदीचे अद्ययावतीकरण करणे, ज्ञानमंडळातील तज्ज्ञ, समन्वयक, संस्था यांच्याशी संपर्क साधून सोपविण्यात आलेल्या विषयांच्या अद्ययावतीकरणाचे कार्य करणे. 4) विविध माध्यमातून विश्वकोशाचे प्रकाशन करण्यासाठी (ग्रंथ, संकेतस्थळ, श्राव्य इ.) सहाय्यभूत असणे. 5) विश्वकोशामार्फत राबविण्यात येणा-या विविध उपक्रमांची जबाबदारी. 6) सोपविलेल्या विषयासंबंधी पत्रव्यवहार करणे व त्यासंबंधीची सर्व प्रशासकीय कामे करणे. 7) लेखक, समीक्षक व अभ्यागत संपादकांची मान्य दराने देयके तयार करुन प्रशासकीय कार्यालयास पाठविणे. 8) सर्वसाधारणपणे विश्वकोश संपादन कामात प्रमुख संपादक / विभाग संपादक / सहसंपादक यांना सहाय्यभूत असणे. ९) कार्यालयाने वेळोवेळी सोपविलेली कामे पूर्ण करणे. |
शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रकानुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे. |
विद्याव्यासंगी सहायक, मराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जि. सातारा 412 803.
दूरध्वनी क्र.02167-220053, 220154 |
सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रशासकीय कार्यालय, रवींद्र नाट्यमंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025.
ईमेल आयडी-vinimprashasan@yahoo.co.in |
|
1) विभाग संपादक / सहसंपादक यांच्या निर्देश व देखरेखीखाली विश्वकोशातील माहितीचे अद्ययावतीकरण संपादन / संकलन आदी कामे करणे.
2) विश्वकोशातील विषयासंबंधीची सर्व प्रशासकीय कामे करणे. 3) विषयानुसार (नोंदीप्रमाणे) फाईल्स व अद्ययावत कार्डस ठेवणे. 4) विषयानुरुप तज्ञांकडे, लेखकांकडे सोपविलेल्या लेखन / संपादन कामासंबंधी पाठपुरावा करणे व सर्वसाधारणपणे संपादन / संकलन कामात विभाग संपादक / सह संपादक / विद्याव्यासंगी सहायक यांना उपयोगी असणे.
|
शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रकानुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे. | संपादकीय सहायक,मराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जि. सातारा 412 803.
दूरध्वनी क्र.02167-220053, 220154
|
सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रशासकीय कार्यालय, रवींद्र नाट्यमंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025. | |
1) मराठी विश्वकोश खंडातील मानव्य आणि विज्ञान व तंत्रज्ञान कक्षेतील नोंदीबाबत मागणीनुसार येणारी रेखाचित्रे, छायाचित्रे योग्य आकारात तयार करणे. (ऑनलाईन/ऑफलाईन प्रिंटींगच्या दृष्टीने)
2) रंगीत, एकरंगी चित्रपत्र व नकाशांचे लेआउट तयार करणे. 3) रंगीत नकाशांच्या लेआउटनुसार चार रंगात त्याचे आर्टवर्क तयार करणे. 4) कला विभागातील चित्रकार, अभ्यागत संपादकांना मार्गदर्शन करुन योग्य आकारात चित्रे / साधे रेखाटन / नकाशे आराखडे काढून घेणे. 5) खंडातील चित्रे, एकरंगी नकाशे, रंगीत चित्रपत्रे व रंगीत नकाशांचे छपाई आकारात पॉझिटिव्ह, ठसे मुद्रणालयाकडून तयार करुन घेणे व त्याच्या अंतिम छपाईस मान्यता देणे. 6) ज्ञानमंडळाशी संबंधित कामे विद्याव्यासंगी सहायक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडणे.
|
शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रकानुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे. | कला संपादक, मराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जि. सातारा 412 803.
दूरध्वनी क्र.02167-220053, 220154
|
सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रशासकीय कार्यालय, रवींद्र नाट्यमंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025. | |
1) कलासंपादकांच्या सूचना/मार्गदर्शनानुसार विश्वकोशात अंतर्भूत व्हावयाचे काळे-पांढरे तसेच रंगीत चित्रपत्रांचे / संकलन चित्र काढणे.
2) विश्वकोशात यावयाच्या चित्रपत्रांसंबंधीची विश्वकोश पृष्ठावर यावयाच्या चित्रांची मांडणी करणे. 3) विश्वकोशात यावयाच्या चित्रपत्रांसंबंधी व एकूण कला कामात कला संपादकास उपयोगी असणे. |
शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रकानुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे. | प्रमुख मानचित्रकार मराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जि. सातारा 412 803.
दूरध्वनी क्र.02167-220053, 220154
|
सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रशासकीय कार्यालय, रवींद्र नाट्यमंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025. | |
1) प्रमुख संपादक / विभाग संपादक यांच्या सूचनेनुसार तसेच विश्वकोश कार्यालयाच्या गरजेनुसार देशी तसेच परदेशी ग्रंथ / कालिके (जर्नल) मासिके, दैनिके यांची वेळोवेळी मागणी करणे.
2) मागणीनुसार आलेली पुस्तके / संदर्भग्रंथ यांची तपासणी करणे, त्याचे वर्गीकरण करणे, अवाप्ती नोंदवहीत अवाप्ती क्रमांक देणे, ग्रंथांची कपाटात विषयवार मांडणी करणे. 3) ग्रंथालयाची नियमित देखभाल करणे व त्यास जबाबदार असणे. 4) संपादकीय वर्गात तसेच विश्वकोश कार्यालयात येणाऱ्या अभ्यागत संपादकवर्गास त्यांच्या दैनंदिन कामात लागणारे संदर्भग्रंथ पुरविणे. 5) संपादन कामासंबंधात लागणारे संदर्भग्रंथ पुरवून त्यांची नोंदवहीत व कार्डावर नोंद ठेवणे तसेच ग्रंथ परत मिळविण्याची व्यवस्था करुन आलेले ग्रंथ पुन्हा जागच्या जागी लावणे. |
शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रकानुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे. | ग्रंथालयीन सहायक, मराठी विश्वकोश कार्यालय, गंगापुरी, वाई, जि. सातारा 412 803.
दूरध्वनी क्र.02167-220053, 220154
|
सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, प्रशासकीय कार्यालय, रवींद्र नाट्यमंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025. |
परिशिष्ट-२
कार्यपूर्तीचे वेळापत्रक
५) राज्य मराठी विकास संस्था
कार्यासन क्रमांक | विषय | आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरविली जाते | सेवा पुरविणारा अधिकारी /
कर्मचारी (दालन क्र. व दूरध्वनी क्र.) |
सेवा विहीत कालावधी पुरविली न गेल्यास ज्यांच्याकडे तक्रार करता येईल तो अधिकारी व त्याचा दूरध्वनी क्र. |
1 | 2 | 3 | 4 | 5 |
प्रकल्प शाखा – 2 | · मराठी ग्रंथसूचीमाला
· विज्ञानविषयक लोकलक्ष्यी पुस्तकांची मराठी भाषांतरे · अमराठी भाषकांसाठी उपक्रम: 1. मराठी भाषेचे प्रशिक्षणवर्ग रेल्वे, तेल-अविव (इस्राईल) इ. 2. प्रशिक्षण साधने तयार करणे. · शब्दकोश प्रकल्प : अशोक केळकर शब्दकोश, निरंतर शब्दकोश, बिनीवाले शब्दकोश. · संगणक व मराठी 1. युनिकोड कन्सोर्शियम 2. युनिकोड प्रशिक्षण 3. विकिपीडिया संवर्धन 4. मराठी प्रमाणलेखन यंत्रणा (युनिकोड स्पेलचेकर) 5. मराठी भाषण-लेखन, लेखन – भाषण यंत्रणा 6. मुक्तस्रोत साधनांचे मराठीकरण · मराठींच्या बोलींचे प्रतिमांकन · दुर्मिळ ग्रंथ प्रकल्प – टप्पा २, 3. |
आवश्यकतेनुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे. | कनिष्ठ संशोधन सहायक,
राज्य मराठी विकास संस्था
दूरध्वनी क्रमांक (022) 22631325 फॅक्स -(022) 22653966
|
प्रभारी संचालक,
राज्य मराठी विकास संस्था
दूरध्वनी क्रमांक- (०२२) २२६३१३२५ फॅक्स -(022) 22653966 ई-मेल आयडी rmvs_mumbai@yahoo.com
|
प्रकल्प शाखा-3 | · संस्थेच्या पुस्तकांची छपाई आणि प्रकाशन
· पाठ्यवृत्ती, शिष्यवृत्ती, आंतरभारती · अनुवाद प्रशिक्षण प्रकल्प · मराठीचे भाषिक टप्पे (सीडी) प्रकल्प. · विधिशास्र परिभाषा कोश · ऑलिम्पिक माहितीकोश · बृहन्महाराष्ट्र योजना · ग्रंथालय व्यवस्थापन · प्रासंगिक उपक्रम- १. वाचन प्रेरणा दिन- 15 ऑक्टोबर २. आप्तवाक्य ३. वाचू आनंदे 4 मराठी भाषा गौरव दिन- 27 फेब्रुवारी ५. भाषा पंधरवडा- 1 ते 15 जानेवारी |
आवश्यकतेनुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे | कार्यासन अधिकारी,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
दूरध्वनी क्रमांक (022) 22631325 फॅक्स -(022) 22653966
|
प्रभारी संचालक,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
दूरध्वनी क्रमांक (०२२)२२६३१३२५
फॅक्स -(022) 22653966 ई-मेल आयडी rmvs_mumbai@yahoo.com |
प्रकल्प शाखा- 4 | · दलित-ग्रामीण शब्दकोश आणि वर्णनात्मक सूची
· वाराणसी येथील मराठी भाषकांचा समाजभाषा वैज्ञानिक अभ्यास · मराठी संशोधन संस्थांना अर्थसहाय्य · प्रस्तावित प्रकल्प 1. युनिकोड टंक 2. ई-बुक प्रकल्प 3. दुर्मिळ ग्रंथ प्रकल्प टप्पा 1 · मोडी हस्तलिखितांचे मराठीकरण तंजावूर · गीतार्णव शब्दार्थ संदर्भ कोश प्रकल्प · संस्थेच्या सर्व प्रकाशनांच्या विक्रीव्यवस्थेशी संबंधित सर्व बाबी · प्रासंगिक उपक्रम वनस्थळी, विशेष मुल्ये साधन निर्मिती. · संदर्भसेवा · वस्त्रनिर्मिती माहितीकोश |
आवश्यकतेनुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे | वरिष्ठ संशोधन सहायक,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई दूरध्वनी क्रमांक (022) 22631325 फॅक्स -(022) 22653966
|
प्रभारी संचालक,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
दूरध्वनी क्रमांक (०२२)22631325
फॅक्स -(022) 22653966 ई-मेल आयडी rmvs_mumbai@yahoo.com |
प्रकल्प शाखा- 5 | पुस्तकांचे गाव | आवश्यकतेनुसार विहित कालावधीत सेवा पुरविणे. | प्रकल्प व्यवस्थापक (कंत्राटी)
दूरध्वनी क्रमांक (022) 22631325 फॅक्स -(022) 22653966
|
प्रभारी संचालक,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई
दूरध्वनी क्रमांक (०२२)२२६३१३२५
फॅक्स -(022) 22653966 ई-मेल आयडी rmvs_mumbai@yahoo.com |
परिशिष्ट-3
अधिनियम व नियमांची यादी
1 | महाराष्ट्र राजभाषा अधिनियम, 1964 व त्या अंतर्गत सुधारणा. |
2 | महाराष्ट्र शासकीय कर्मचारी (न्यायिक विभागातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त) मराठी भाषा परीक्षा नियम,1987 |
3 | महाराष्ट्र नागरी सेवा (इंग्रजी लघुलेखक व इंग्रजी टंकलेखक यांनी प्राप्त करावयाचा मराठी लघुलेखक / मराठी टंकलेखन परीक्षा सक्तीची करण्याबाबत) नियमावली, 1991 |
4 | हिंदी भाषा परीक्षा नियम. |
विभागाचे महत्वाचे शासन निर्णय
1 | नवलेखकांची चर्चासत्रे / कार्यशाळा | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्रमांक नलेका /1012/प्र.क्र. 134/2012/भाषा – 3, दिनांक 24 जून, 2013 |
2 | नवलेखकांना प्रोत्साहन अनुदान | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्रमांक – सासंमं 1013/प्र.क्र.165/2013/भाषा – 3, दिनांक 7 डिसेंबर, 2013 |
3 | वाङ्मयीन नियतकालिकांना अनुदान योजना | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्रमांक सासंमं – 1013/प्र.क्र. 166/2013/भाषा – 3, दिनांक 15 जानेवारी, 2014 |
4 | सात साहित्य संस्थांना अनुदान | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय सासंमं – 1010/प्र.क्र. 74/2014/भाषा – 3, दिनांक 22 ऑगस्ट, 2014 |
5 | ललित/ललितेतर वाङ्मयासाठी अनुदान | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. सासंमं 2013/प्र.क्र.180/2013 भाषा – 3,
दि. 1 ऑक्टोबर, 2014 |
6 | पुस्तक प्रकाशन योजना | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्रमांक : सासंमं 1014/प्र.क्र.300/2014/भाषा, दिनांक 15 डिसेंबर, 2014 |
7 | विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्र. विंदापु – 1014/प्र.क्र.112/2014/भाषा – 3, दि. 12 फेब्रुवारी, 2015 |
8 | श्री. पु. भागवत पुरस्कार | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्रमांक श्रीपुभा- 1014 /प्र.क्र.113/2014/भाषा – 3, दि. 12 फेब्रुवारी, 2015 |
9 | भाषा पंधरवडा | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय, क्रमांक: मभादि-2012/183/प्र.क्र.61/भाषा-2, दि.12 एप्रिल, 2013
मराठी भाषा विभाग, शासन निर्णय, क्रमांक : मभाप-2015/ प्र.क्र.70/भाषा-2, दि.22 जुलै, 2015 |
१० | भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय, क्रमांक: भासस-201५/प्र.क्र.३०/भाषा-१, दि.०५ ऑगस्ट, 201५ |
११ | महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाची पुनर्रचना | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय, क्रमांक: विनिमं-201५/प्र.क्र.५९/भाषा-२, दि.०५ ऑगस्ट, 201५ |
१२ | महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची पुनर्रचना | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय, क्रमांक: सासंमं-१01५/प्र.क्र.५८/२०१५/भाषा-३, दि.०५ ऑगस्ट, 201५ |
१३ | राज्य मराठी विकास संस्थेची रचना | शिक्षण व सेवा योजना विभाग, शासन निर्णय, क्रमांक: इएसटी-५५९२/४१८/९२/ प्रशा-१, दिनांक २० एप्रिल, १९९२ |
1४ | अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अनुदान | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय, क्रमांक : सासंअ-1015/प्र.क्र. 103/ 2015/ भाषा-3, दिनांक 9 ऑक्टोबर, 2015 |
1५ | अन्य मराठी साहित्य संमेलन अनुदान योजना | मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रासांधो -1012/प्र.क्र. 126/2012/भाषा- 3, दिनांक 17 एप्रिल, 2015 व
मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रासांधो – 1015/प्र.क्र. 111/2015/भाषा-3, दिनांक 16 जानेवारी, 2016 |
1६ | स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना | मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक:रावापु – 1012/ प्र.क्र.104/2012/भाषा-3,
दि.10 सप्टेंबर, 2012 मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक पुरस – 1012/प्र.क्र.111/2012/भाषा – 3, दि. 03 मार्च, 2014 व मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – 1014/प्र.क्र.120/2014/भाषा- 3, दि. 02 फेब्रुवारी, 2016 |
1७ | अनुवादकांची तासिका | सा.प्र.विभाग, शासन निर्णय, क्रमांक-एलएनजी-2007/6841/प्र.क्र.9/07/20-ब, दि.18 जानेवारी, 2008
मराठी भाषा विभाग, शासन निर्णय, क्रमांक-नामिका-2015/प्र.क्र.100/भाषा-2, दि.15 फेब्रुवारी, 2016 |
1८ | डॉ. अशोक केळकर व कविवर्य मंगेश पाडगांवकर | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय, क्रमांक-भासंपु-2016/प्र.क्र.26/2016/भाषा-3, दि.18 फेब्रुवारी, 2016 |
1९ | ज्ञानमंडळाची निर्मिती | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय, क्रमांक: विकोश-2015/प्र.क्र.171/भाषा-2, दि.23 फेब्रुवारी, 2016 |
२० | खाजगी विक्रेत्यांची नियुक्ती करणे.
प्रकाशनावर सुट |
मराठी भाषा विभाग, शासन निर्णय,क्रमांक: संकीर्ण-1015/प्र.क्र.145/2015/भाषा -३, दि.15 मार्च, 2016 |
२१ | वाचन प्रेरणा दिन | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय,क्रमांक: वाप्रदि-2016/प्र.क्र.144/2016/भाषा-३ दि.26 सप्टेंबर, 2016 |
२२ | भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारी | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय,क्रमांक: मभादि-2017/प्र.क्र.15/2017/भाषा-3, दि.21 जानेवारी, 2017 |
२३ | केंद्र शासनाच्या त्रि-भाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची कार्यालय, बँका, विमा कंपन्या, रेल्वे इत्यादीमध्ये इंग्रजी व हिंदीबरोबरच मराठीचा वापर करण्याबाबत | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय,क्रमांक: मभावा-201६/प्र.क्र.८२/भाषा-२,
दि.०५ डिसेंबर, 2017 |
२४ | शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर करण्याबाबत | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय,क्रमांक: मभावा-201८/प्र.क्र.४७/भाषा-२,
दि.०७ मे,201८ |
२५ | खाजगी अनुवादकांची नामिका (पॅनल) | मराठी भाषा विभाग, शासन निर्णय,क्रमांक: नामिका-201७/प्र.क्र.८३/भाषा-२,
दि.२५ जानेवारी, २०१८ |
** उपरोक्त शासन निर्णय विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
परिशिष्ट – 4
विभागांतर्गत महत्वाच्या समित्या व मंडळे
मराठी भाषा विभागाच्या विविध योजना / कामकाज कार्यान्वित करण्याकरिता स्थापन केलेल्या
मुख्य समित्या व मंडळांची माहिती
- अभिजात मराठी भाषा समिती :-
भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात केंद्र शासनाकडून कार्यवाही केली जाते. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्र शासनाने कळविलेल्या निकषांच्या अनुषंगाने मराठी भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पात्र ठरते किंवा कसे, याबाबतचा अभ्यास करुन केंद्र शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठविण्यासाठी राज्य शासनाने प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली भाषातज्ज्ञांची एक समिती दिनांक १०.०१.२०१२ च्या शासन निर्णयानुसार स्थापन केली. या समितीने तयार केलेला मराठी भाषेतील अहवाल शासनाने दिनांक १२.०७.२०१३ रोजी केंद्र शासनाचे सचिव, संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविला आहे. सदरच्या अहवालाची इंग्रजी अनुवादित प्रत दिनांक १६.११.२०१३ रोजी केंद्र शासनाचे सचिव, संस्कृती मंत्रालय, नवी दिल्ली यांच्याकडे पाठविली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे विचाराधीन आहे.
(२) भाषा सल्लागार समिती :-
महाराष्ट्र शासनाने दिनांक २२.०६.२०१० च्या शासन निर्णयान्वये शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा वापर करण्याचे धोरण राबविण्यासाठी भाषा संचालनालयांतर्गत कायमस्वरुपी भाषा सल्लागार समितीची स्थापना केली. या समितीवरील अशासकीय सदस्यांची नियुक्ती ३ वर्षांकरिता असल्याने समितीचे अध्यक्ष आणि सदस्य नव्याने नियुक्त करुन दिनांक ०५.०८.२०१५ च्या शासन निर्णयान्वये भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली. सदर समितीवरील अशासकीय व शासकीय सदस्यांची संख्या २८ आहे. या समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे आहे :-
- राज्याचे पुढील २५ वर्षातील मराठी भाषेचे धोरण ठरविणे.
- भाषा अभिवृध्दीसाठी नवनवे उपाय व कार्यक्रम सुचविणे व या अनुषंगाने शासनाला मार्गदर्शन करणे.
- भाषा संचालनालयाने प्रकाशित केलेल्या कोशांमध्ये प्रचलित शब्दांची भर घालून कोश अद्ययावत करणे.
- नवीन परिभाषा कोशांची निर्मिती करणे आणि
- परिभाषा कोशांचे पुनर्मुद्रण,परिभाषेतील अत्यावश्यक परिष्करणे, शब्दव्युत्पत्ती, मराठी परिभाषिक संज्ञांच्या समस्या सोडविणे.
(३) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ :-
मराठी भाषेतील विविध साहित्य विषयक उपक्रम राबविणे व साहित्यिकांना प्रोत्साहन देणे, याकरीता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. शासन निर्णय, क्रमांक-सासंमं-१०१५/प्र.क्र.५८/२०१५/भाषा-३, दिनांक ०५ ऑगस्ट, २०१५ अन्वये मंडळाची पुर्नरचना करण्यात आली असून मंडळामध्ये एकूण २८ साहित्यिकांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.
(४) महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ :-
महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाकडून विश्वकोशाची १ ते २० खंड प्रसिध्द करण्यात आले आहेत. विश्वकोशातील नोंदी अद्ययावत करण्याकरीता विश्वकोश निर्मिती मंडळाची शासन निर्णय, क्रमांक-विनिमं-२०१५/प्र.क्र.५९/२०१५/भाषा-२, दिनांक ०५ ऑगस्ट, २०१५ अन्वये पुर्नरचना करण्यात आली आहे. विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये एकूण २३ अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
(५) राज्य मराठी विकास संस्था, नियामक मंडळ :-
मराठी भाषेच्या सर्वागिंण विकासासाठी राज्य मराठी विकास संस्था या स्वायत्त संस्थेची निर्मिती करण्यात आली असून संस्थेचे कामकाज नियामक मंडळाच्या मान्यतेने करण्यात येते. शासन निर्णय, क्रमांक-रामवि-१०१४/प्र.क्र.४४/२०१४/भाषा-३, दिनांक १७ ऑक्टोबर, २०१५ अन्वये संस्थेच्या नियामक मंडळाची पुर्नरचना करण्यात आली आहे. यामध्ये भाषा व साहित्य क्षेत्रातील एकूण २१ अशासकीय सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.
**********
परिशिष्ट-५
क्षेत्रीय कार्यालयांचे विविध उपक्रम
भाषा संचालनालय
भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई प्रकाशित शास्त्रीय व तांत्रिक विषयांवरील परिभाषा कोश, शब्दावल्या व इतर प्रकाशनांची यादी (एकूण ४८)
अ.क्र. | प्रकाशनाचे नाव |
1 | ग्रंथालयशास्त्र परिभाषा कोश |
2 | गणितशास्त्र परिभाषा कोश |
3 | समाजशास्त्र परिभाषा कोश |
4 | तत्वज्ञान व तर्कशास्त्र परिभाषा कोश |
5 | वाणिज्यशास्त्र परिभाषा कोश |
6 | रसायनशास्त्र परिभाषा कोश |
7 | भूशास्त्र परिभाषा कोश |
8 | शारीर परिभाषा कोश |
9 | शिक्षणशास्त्र परिभाषा कोश |
10 | यंत्र अभियांत्रिकी परिभाषा कोश़़ |
11 | स्थापत्य अभियांत्रिकी परिभाषा कोश |
12 | भौतिकशास्त्र परिभाषा कोश |
13 | विद्युत अभियांत्रिकी परिभाषा कोश |
14 | कृषिशास्त्र परिभाषा कोश |
15 | जीवशास्त्र परिभाषा कोश |
16 | शरीरक्रियाशास्त्र परिभाषा कोश |
17 | राज्यशास्त्र परिभाषा कोश़़ |
18 | साहित्य समीक्षा परिभाषा कोश |
19 | लोकप्रशासन परिभाषा कोश |
20 | अर्थशास्त्र परिभाषा कोश |
21 | धातूशास्त्र परिभाषा कोश |
22 | मानसशास्त्र परिभाषा कोश |
23 | व्यवसाय व्यवस्थापन परिभाषा कोश |
24 | संख्याशास्त्र परिभाषा कोश |
25 | औषधशास्त्र परिभाषा कोश |
26 | भाषाविज्ञान व वाङ्मय विद्या परिभाषा कोश |
27 | भूगोलशास्त्र परिभाषा कोश |
28 | विकृतिशास्त्र पारिभाषिक शब्दावली |
29 | वृत्तपत्रविद्या परिभाषा कोश़ |
30 | न्यायवैद्यक व विषशास्त्र परिभाषा कोश |
31 | भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली (मराठी x इंग्रजी) |
32 | कृषिशास्त्र पारिभाषिक शब्दावली (मराठी x इंग्रजी) |
33 | शासन व्यवहार शब्दावली (मराठी x इंग्रजी) |
34 | पदनाम कोश |
35 | वित्तीय शब्दावली |
36 | शासन व्यवहार कोश |
37 | न्याय व्यवहार कोश |
38 | मराठी लघुलेखन मार्गदर्शिका |
39 | प्रशासनिक लेखन |
40 | शासन व्यवहारात मराठी |
41 | प्रशासन वाक्प्रयोग |
42 | राजभाषा परिचय |
43 | मराठी टंकलेखन प्रवेशिका |
44 | भारताचे संविधान (सहावी आवृत्ती) |
45 | कार्यदर्शिका |
46 | मंथन |
47 | प्रमाणलेखन नियमावली |
48 | राजभाषा परिचय (कार्यरुप व्याकरण) |
- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
मंडळाचे उपक्रम :
- पुस्तक प्रकाशन उपक्रम : या योजनेमध्ये शास्त्रीय (विज्ञान) ग्रंथमाला, उत्कृष्ट ग्रंथांचे भाषांतर, महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित ऐतिहासिक कागदपत्रांचे संपादन व प्रकाशन, वैचारिक, समीक्षात्मक, चरित्रात्मक इत्यादी विषयांवरील ग्रंथ प्रकाशित केले जातात. तसेच मंडळाने प्रकाशित केलेल्या पुस्तकांचे मागणीनुसार पुनर्मुद्रणही केले जाते. सदर योजनेअंतर्गत आतापर्यंत ५३५ पुस्तके प्रकाशित केली आहेत.
- उत्कृष्ट ग्रंथांची भाषांतरे – मराठीतील व अन्य भाषांमधील विविध विषयांवरील अभिजात वाङ्मयाच्या ग्रंथांनी जगातील वैचारिक साहित्यात मोलाची भर घातली आहे. अशा मौलिक व महत्वपूर्ण ग्रंथांची भाषांतरे मराठी तसेच हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध करुन देण्याचा या योजनेमागील उद्देश आहे. या योजनेअंतर्गत इंग्रजी, रशियन, फ्रेंच इत्यादी पाश्चात्य व संस्कृत, प्राकृत यांसारख्या भारतीय भाषांतून मंडळाने पुस्तके निवडली असून, भाषांतरीत पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.
ब) महाराष्ट्राचा इतिहास व त्यावर प्रकाश टाकणा–या ऐतिहासिक कागदपत्रांचे संपादन व प्रकाशन – महाराष्ट्राच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी उपलब्ध नवीन साधने आणि साहित्य लक्षात घेऊन व अशा अद्ययावत साधनसामग्रीचा उपयोग करुन आधुनिक इतिहास रचनेच्या तत्वानुसार महाराष्ट्राचा प्रमाणभूत असा सुलभ राजकीय, सांस्कृतिक इतिहास मराठी भाषेत नव्याने संपादित / प्रकाशित करण्यात येतो. प्रागैतिहासिक काळापासून आधुनिक काळापर्यंत साधारणत: प्रत्येकी ५०० पृष्ठांच्या ५ खंडात म्हणजे (१) प्राचीन कालखंड, (२) मध्ययुगीन कालखंड, (३) मराठा कालखंड भाग-१, शिवकाल, (४) मराठा कालखंड भाग-२ पेशवेकाळ व (५) आधुनिक कालखंड अशा पाच भागांचा यात समावेश आहे, यापैकी प्राचीन कालखंड भाग-१, मध्यमयुगीन कालखंड भाग-१ (खंड -१ व २), मराठा कालखंड भाग-१ (शिवकाळ) व मराठा कालखंड भाग-२ (पेशवेकाळ) हे चार खंड प्रकाशित झाले आहेत. आधुनिक कालखंडाच्या लेखनाचे काम डॉ. के.के.चौधरी यांनी पूर्ण केले असून सदर आधुनिक कालखंडावरील आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या पुस्तकाचे दोन्ही खंड प्रसिध्द करण्यात आले आहेत.
क) मंडळाची वैचारिक, समीक्षात्मक, चरित्रात्मक स्वरुपाची अन्य प्रकाशने – खाजगी प्रकाशकांमार्फत साधारणत: जी पुस्तके प्रकाशित करण्यास नकार दिला जातो, अशी पुस्तके जिज्ञासू, चोखंदळ तसेच वाचकांस वाजवी किंमतीत उपलब्ध करुन देण्यात येतात. मराठीतील प्रतिभावंत साहित्यिकांच्या साहित्याचे पुनर्मुद्रण तसेच समाज-परिवर्तन घडविण्यास मदत होऊ शकेल असे थोर विचारवंतांचे वाङ्मय, असामान्य व्यक्तींची चरित्रे वगैरे प्रकाशित करण्यात येतात. संपूर्ण गडकरी भाग-१, महात्मा फुले समग्र वाङ्मय, लोकहितवादी समग्र वाङ्मय, आगरकर समग्र वाङ्मय खंड १ ते ३, आचार्य भागवतांचे संकलित वाङ्मय, प्रबोधनकार ठाकरे समग्र वाङ्मय १ ते ५, सांस्कृतिक महाराष्ट्र खंड १ व २, केशवसुतांची कविता (हस्तलिखिताची यथामूल आवृत्ती), नामदेवगाथा, भावार्थ रामायण, संत तुकाराम बाबांची गाथा (१९५० मध्ये प्रकाशित केलेली) अशा प्रकारची पुस्तके प्रकाशित केली आहेत.
ड) महाराष्ट्राचे शिल्पकार उपक्रम : महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक व वैचारिक जडणघडणीत ज्या महनीय व्यक्तींनी भर घातली आहे, त्यांच्या जीवनकार्यावर आधारित साधारणत: शंभर ते सव्वाशे पानांची चरित्रे महाराष्ट्राचे शिल्पकार या योजनेंतर्गत पुस्तकरुपाने प्रकाशित करण्यात येतात. आतापर्यंत एकूण ४५ महनीय व्यक्तींची चरित्रे प्रकाशित करण्यात आली आहेत.
२) ललित व ललितेतर वाङ्मयाच्या प्रकाशनार्थ अनुदान : मराठीतील वैचारिक व शास्त्रीय विषयावरील ग्रंथांची उणीव लक्षात घेऊन लिहिलेल्या शास्त्रीय व तांत्रिक विषयावरील वैशिष्ट्यपूर्ण संशोधनात्मक अशा उच्च दर्जाच्या लेखनाचा तसेच ललित साहित्यातील वाड्:मयीन दृष्टीने गुणवत्तापूर्ण असलेल्या लेखनाचा विचार अनुदानासाठी केला जातो. महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडे पुस्तकाच्या प्रकाशनार्थ अनुदानासाठी व्यक्ती अथवा संस्थांकडून प्राप्त होणा-या पुस्तकाच्या प्रकाशन खर्चाच्या ७५ % इतके एकरकमी परंतु जास्तीत जास्त रु.३०,०००/-च्या मर्यादेत अर्थसहाय्य केले जाते.
३) नवलेखक उत्तेजनार्थ अनुदान : मराठी भाषेतील नवलेखकांना ललित वाङ्मयाच्या प्रकाशनासाठी उत्तेजनार्थ अनुदान देण्याची योजना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत दरवर्षी राबविली जाते. सदर योजना महाराष्ट्रातील मराठी नवलेखकांनाच लागू आहे. मंडळाकडे दरवर्षी काव्य, कथा, नाटक / एकांकिका, कादंबरी, ललित गद्य व बाल वाङ्मयातील विविध प्रकारची हस्तलिखिते प्राप्त होतात. मंडळाच्या नवलेखक अनुदान समितीच्या बैठकीमध्ये प्राप्त अनुकूल हस्तलिखितांना अनुदान देण्यासंबंधीचा निर्णय दरवर्षी घेतला जातो. अनुकूल हस्तलिखिताच्या प्रकाशनासाठी मंडळाकडून प्रकाशकांना सुरुवातीस २५ टक्के अनुदान रक्कम देण्यात येते व प्रकाशकाने नवलेखकांची पुस्तके सुविहित पध्दतीने मंडळास छापून दिल्यानंतर उर्वरित ७५ टक्के अनुदानाची रक्कम मंडळाकडून देण्यात येते.
४) नवलेखकांची चर्चासत्रे/कार्यशाळांना अनुदान : नवलेखकांना ज्येष्ठ साहित्यिकांचे मार्गदर्शन व्हावे, त्यांच्या लेखनात सुधारणा व्हावी म्हणून महाराष्ट्रात विविध ठिकाणी नवलेखकांची चर्चासत्रे / कार्यशाळा आयोजित केल्या जातात.
५) साहित्य संस्थांना अनुदान : या अनुदान योजनेअंतर्गत शासनामार्फत मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या विकासासाठी खालील ७ संस्थांना सध्या दरवर्षी प्रत्येकी रु.१०.०० लक्ष इतके वार्षिक अनुदान देण्यात येते.
- अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
- विदर्भ साहित्य संघ, नागपूर
- मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद
- महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
- मुंबई मराठी साहित्य संघ, मुंबई
- कोकण मराठी साहित्य परिषद, रत्नागिरी
- दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर
६) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास अनुदान : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करते. या संमेलनासाठी रु.२५ लाख इतके अनुदान देण्यात येत होते त्यात वाढ करुन सन २०१८ पासून दरवर्षी रु.५० लाख इतके अनुदान देण्यात येते.
७) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून साहित्य व संस्कृतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्ती / संस्था / साहित्यिक यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. (पुरस्कार परिशिष्ट-६)
८) अन्य मराठी साहित्य संमेलनांना अनुदान : महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण २०१० नुसार अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळामार्फत दरवर्षी आयोजित केल्या जाणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाव्यतिरिक्त राज्यामधील आयोजित होणा-या अन्य १५ मराठी साहित्य संमेलनांना प्रत्येकी दरवर्षी रु.२.०० लाखाचे अनुदान देण्यात येते. या योजनेची अंमलबजावणी करताना, दरवर्षी जाहिरातीद्वारे दिनांक ०१ मे ते ३१ मे या कालावधीत महाराष्ट्रात मुख्य मानल्या जाणा-या प्रवाहापेक्षा वेगळ्या प्रवाहातील जनसमुदायांच्या आणि उपेक्षित वर्गाच्या अन्य मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करणा-या साहित्य संस्थांकडून अर्ज मागविण्यात येतात. या अर्जामधून शासनाकडून ठरविण्यात आलेल्या निकषांस पात्र ठरणा-या १५ साहित्य संस्थांची निवड महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या बैठकीत करण्यात येते व अशा पात्र संस्थांनाच प्रत्येकी रु.२.०० लक्ष इतके अनुदान त्या त्या आर्थिक वर्षात प्रदान करण्यात येते.
९) मंडळाच्या ग्रंथांचे ई-बुक : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने मराठी भाषा, संस्कृती, विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान व समाजविद्या यासारख्या विविध विषयांवर आजमितीपर्यंत ५३३ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. त्यापैकी ४४४ पुस्तकांचे ई-बुक करण्याचे काम सी-डॅक, पुणे या संस्थेने पूर्ण केले आहे.
१०) विविध वाङ्मयीन प्रकल्प : नाट्यसंज्ञा कोश, मराठी नाटक आणि रंगभूमीचा समग्र इतिहास, महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास, विविध विषयांच्या बृहद्ग्रंथांचे प्रकाशन इत्यादी विविध प्रकल्प मंडळाने हाती घेतले आहेत.
३) महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत राबविण्यात येणारे विविध उपक्रम.
- मराठी विश्वकोश खंडांमध्ये विविध विषयांची माहिती नोंदीच्या स्वरुपात प्रकाशित करण्यात येते. संकेतस्थळावर, सीडी स्वरुपात व कार्ड पेनड्राईव्ह स्वरुपात देखील प्रकाशित झालेले सर्व खंड उपलब्ध आहेत.
- मराठी विश्वकोशाचे मराठी वर्णमालेनुसार अ ते ज्ञ पर्यंतचे २० खंड प्रकाशित करण्यात आले आहेत.
१ ते २० खंडांचा नोंदीचा तपशील खालीलप्रमाणे
अ.क्र. | मजकुराची पृष्ठे | नोंदींची संख्या | नोंदशीर्षक | चित्रपटांची संख्या | प्रकाशन वर्ष |
– | – | परिचय ग्रंथ | – | १९६५ | |
– | – | परिभाषा संग्रह (खंड १८ वा) | – | १९७३ | |
१. | ९४४ | ९४२ | अंक ते आतुर चिकित्सा | ८४ | १९७६ |
२. | १०४२ | ९१८ | आतुर निदान ते एप्सटाईन, जेकब | ७८ | १९७६ |
३. | ९६५ | १११७ | एहिबंगहाऊस, हेरमान ते किसंगानी | ४८ | १९७६ |
४. | ९९७ | 1064 | कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका | 54 | 1976 |
५. | 1022 | 897 | गाल्वा, एव्हारीस्त ते चेदि | 72 | 1976 |
६. | 1083 | 1141 | चेन, सर एर्न्स्ट बोरिस ते डोळा | 54 | 1976 |
7. | 1078 | 897 | ड्युइस ते धरणगाव | 50 | 1977 |
८. | ११११ | 773 | धरणे व बंधारे ते न्वाकशॉट | 54 | 1979 |
9. | 1143 | 898 | पउमचरिउ ते पेहलवी साहित्य | 58 | 1979 |
१०. | 1253 | 798 | पैकारा ते बंदरे | 52 | 1982 |
11. | 1112 | 1106 | बंदा ते ब्वेनस एअरीझ | 60 | 1982 |
12. | 1586 | 668 | भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य | 60 | 1985 |
13. | 1328 | 1069 | महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ ते म्हैसूर संस्थान | 58 | 1987 |
14. | 1307 | 847 | यंग एडवर्ड ते रेयून्यों बेट | 58 | 1989 |
15. | 1396 | 902 | रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण | 48 | 1995 |
16. | 1000 | 488 | वाद्यवृंद ते विज्ञानशिक्षण | 20 | 1999 |
१७. | 893 | 780 | विज्ञानाचे तत्वज्ञान ते शेक्सपिअर | 44 | 2007 |
18. | 877 | 699 | शेख अमर ते सह्याद्री | 30 | 2008 |
19. | 886 | 769 | सँगर, फ्रेडरिक ते सृष्टी आणि मानव | 50 | 2012 |
20. | 754
582 |
690
624 |
सेई शोनागुन ते हर्षचरित्र (पूर्वार्ध)
हर्षवर्धन, सम्राट ते ज्ञेयवाद (उत्तरार्ध) |
48
18 |
2015
2015 |
3) कुमार विश्वकोषाच्या योजनांतर्गत योजनेत जीवसृष्टी आणि पर्यावरण या विषयाचे भाग 1 व 2 पुस्तक स्वरुपात ब्रेल लिपीत प्रकाशित करण्यात आला आहे. बोलक्या स्वरुपात तसेच संकेतस्थळावर देखील प्रकाशित करण्यात आले आहेत.
4) कुमार विश्वकोश
भाग-2 जीवसृष्टी आणि पर्यावरण
प्रकाशित खंड | नोंदशीर्षक | प्रकाशन वर्ष |
परिचय ग्रंथ | 2003 | |
भाग १ | अंकुरण ते ग्लुकोज | 2011 |
भाग २ | घटसर्प ते पॅरामिशियम | 2014 |
मराठी विश्वकोशाचे अद्ययावतीकरण
विश्वकोशाचे सर्व खंड पूर्ण करण्यास लागलेल्या प्रदीर्घ कालावधीमुळे विश्वकोशातील अनेक नोंदी आता कालबाह्य असून, त्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. सर्व विषयातील / ज्ञानशाखेतील झालेले बदल विचारात घेता विश्वकोशाचे अद्ययावतीकरण जलद गतीने करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच अद्ययावतीकरण करताना विश्वकोशाचा मूळ दर्जा कायम ठेवून अद्ययावतीकरणाकरिता माहिती व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सर्व ज्ञान क्षेत्रातील माहिती एकाच वेळी उपलब्ध करुन त्याचे समीक्षण-संपादन करुन अंतिम करणे आवश्यक आहे. त्यासाठी विविध विषयांशी संबंधित ज्ञानमंडळे गठीत करण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी विद्यापीठे / शैक्षणिक व संशोधन संस्था यांच्या सहकार्याने ज्ञानमंडळाच्या माध्यमातून अद्ययावतीकरणाचे काम सुरु करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
उपरोक्त बाबी विचारात घेऊन शासनाने विविध विद्यापीठे, शैक्षणिक व संशोधन संस्था यांमध्ये विषयनिहाय ज्ञानमंडळे स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.
मराठी विश्वकोश खंडांच्या अद्ययावतीकरणासाठी स्थापन झालेली ज्ञानमंडळे
(शासन निर्णय : मराठी भाषा विभाग क्र.विकोश/2015/प्र.क्र.171/भाषा-2, दिनांक 23 फेब्रुवारी 2016)
क्र. | पालक संस्था | ज्ञानमंडळाचे नाव |
1. | मुंबई विद्यापीठ, मुंबई | भारतीय धर्म आणि तत्वज्ञान |
2. | मुंबई विद्यापीठ, मुंबई | भारतीयेतर धर्म आणि तत्वज्ञान |
3. | मुंबई विद्यापीठ, मुंबई | आधुनिक तत्वज्ञ आणि त्यांचे तत्वज्ञान |
4. | मुंबई विद्यापीठ, मुंबई | अर्थशास्त्र |
5. | मुंबई विद्यापीठ, मुंबई | मानसशास्त्र |
6. | मुंबई विद्यापीठ, मुंबई | भौतिकी |
7. | मुंबई विद्यापीठ, मुंबई | गणित-सांख्यिकी |
8. | मुंबई विद्यापीठ, मुंबई | वनस्पतीशास्त्र |
9. | डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे | प्रागैतिहासिक काळ व आद्य ऐतिहासिक काळ |
10. | डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे | प्राचीन ऐतिहासिक काळ |
11. | डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, पुणे | भाषाशास्त्र |
12. | भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर, पुणे | अभिजात भाषा आणि साहित्य |
13. | रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई | रसायनशास्त्र |
१4. | यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक | शिक्षणशास्त्र |
15. | मराठी विज्ञान परिषद, मुंबई | वैज्ञानिक चरित्र, विज्ञान संस्था आणि संकीर्ण |
16. | मराठी विज्ञान परिषद, मुंबई | अणुविज्ञान आणि उर्जा तंत्रज्ञान |
17. | महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. | विश्वसाहित्य |
18. | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेंड | अब्जांश तंत्रज्ञान |
19. | महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अहमदनगर | कृषिविज्ञान |
20. | गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था, पुणे | सामरिकशास्त्र आणि राष्ट्रीय सुरक्षा |
21. | रचना संसद, मुंबई | वास्तुकला आणि वास्तुविज्ञान |
22. | रचना संसद, मुंबई | दृश्यकला (चित्रकला आणि शिल्पकला) |
23. | महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे | भारतीय भाषा-साहित्य |
24. | महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे | लोकसाहित्य व लोकसंस्कृती |
25. | प्रभात चित्रपट मंडळ, मुंबई | चित्रपट |
26. | हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती | क्रीडा |
27. | अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे | स्थापत्य अभियांत्रिकी |
28. | अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे | यंत्र व स्वयंचल अभियांत्रिकी |
29. | अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे | विद्युत अभियांत्रिकी |
30. | अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे | धातुविज्ञान |
31. | अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे | संदेशवहन अभियांत्रिकी |
32. | शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर | मराठी साहित्य |
33. | शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर | राज्यशास्त्र |
34. | शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर | आधुनिक इतिहास-भारतीय आणि जागतिक |
35. | गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर | संगीत (गायन, वादन, नृत्य) |
36. | विश्वेश्वरय्या प्रौद्योगिकी संस्थान, नागपूर | खाणविज्ञान |
37. | डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद | नाट्यशास्त्र |
38. | डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद | प्रसारमाध्यमे |
39. | आयएलएस लॉ कॉलेज, पुणे | कायदा |
40. | के.जे.सोमय्या भारतीय संस्कृती पीठ्म, मुंबई | योगविज्ञान |
41. | म.रा.म.वि.नि.मंडळ, मुंबई | आंतरराष्ट्रीय संबंध |
42. | संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती | भूविज्ञान |
43. | डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद | माहिती तंत्रज्ञान-संगणक विज्ञान |
5) राज्य मराठी विकास संस्था
संस्थेचे उपक्रम
(1) संगणक व मराठी भाषा – माहिती व तंत्रज्ञान युगात संगणकाद्वारे मराठी भाषेचा प्रभावी वापर करण्याकरिता संस्था प्रयत्नशील आहे. विशेषत: प्रमाणीकरण (स्टॅण्डर्डायझेशन) व रुपांतरण (कन्व्हर्जन) याकामी संगणकतज्ज्ञांना भाषिकदृष्ट्या मार्गदर्शन करण्याचे कार्य संस्थेने केले आहे. कळफलकाच्या एकरुपतेसाठी मराठी वर्णमालेचे प्रमाणीकरण तसेच मराठीतील अकारविल्हे रचना (सॉर्टींग ऑर्डर्स) निश्चित करणे आवश्यक होते, ही गरज ओळखून संस्थेने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, भाषातज्ज्ञ व संगणकतज्ज्ञ यांच्या सहकार्याने वर्णमाला व वर्णक्रम यांच्या प्रमाणीकरणासंदर्भात तयार केलेली वर्णमाला आणि वर्णलिपी शासन निर्णय (क्रमांक-मभावा- 2004/(प्र.क्र.25/2004) 20 ब, दिनांक 06.11.2009) अन्वये शासनाने प्रसृत केला आहे.
(2) काही महत्वपूर्ण प्रकाशने : मराठी भाषेच्या विकासाला पूरक असे माहितीकोश, संकल्पनाकोश, सूची, माहितीपुस्तिका, कार्यपुस्तिका, वैचारिक, संशोधनात्मक लेखन, मराठी साहित्यकृतीची हिंदी भाषांतरे अशी विविधांगी 71 पुस्तके संस्थेने प्रकाशित केली आहेत. त्यापैकी काही उल्लेखनीय प्रकाशने पुढीलप्रमाणे आहेत :-
** भाषा विषयक प्रकरणे
अ) मराठी भाषा : वाढ आणि बिघाड – (श्री.के.क्षीरसागर) मराठी बोलताना आणि तिच्यातून लेखनव्यवहार पार पाडताना सर्वसामान्य शिक्षित माणसाच्या मनात आज जे-जे प्रश्न घुटमळत आहेत, त्यांचा मुक्त मनाने घेतलेला परामर्श.
ब) महाराष्ट्राचा भाषिक नकाशा पूर्वतयारी – (प्रमुख संशोधक – डॉ.रमेश धोंगडे, संशोधन समन्वयक आणि संशोधन सहाय्यक- डॉ.अशोक सोलनकर) प्रमाण मराठी, बोली, उपभाषा, आदिवासींच्या भाषा, मिश्रभाषा इत्यादींचे विविध भाषिक अविष्कार, त्यांची प्रदेशानुसार नकाशाद्वारे मांडणी करुन महाराष्ट्रातील भाषांची वैविध्यपूर्ण माहिती देणारा ग्रंथ.
(3) कोश व सूची वाङ्मय :-
अ) कोश व सूची वाङ्मय स्वरुप आणि साध्य (संपादन – सरोजिनी वैद्य, सुषमा पौडवाल, अनिता जोशी, कविता महाजन) बी.ए.एम.ए.चे मराठी विषयाचे विद्यार्थी, ग्रंथालयशास्त्र विद्यार्थी तसेच संशोधनपर लेखन करु
इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त, संस्कृत-इंग्रजी-मराठी भाषांतील वैविध्यपूर्ण कोश व सूची वाङ्मयाचा सांगोपांग परिचय करुन देणारा ग्रंथ.
ब) शालेय मराठी शब्दकोश – (वसंत आबाजी डहाके, गिरीश पतके) इयत्ता 5 वी ते 12 वी पर्यंतच्या सर्व विषयांच्या मराठी पाठ्यपुस्तकांशी संबंधित शब्द, संज्ञा, वाक्यप्रचार आदींची सचित्र व सोदाहरण ओळख या बाबी अंतर्भूत आहेत.
क) विज्ञान संकल्पना कोश – (प्रा.रा.वि. सोवनी) इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र व जीवशास्त्रातील संकल्पना सुबोध मराठीतून उलगडून सांगणारा कोश, (मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने)
ड) मराठी लघुलेखन शब्दकोश – (व.वा.इनामदार) मराठी लघुलेखनाचे शिक्षक आणि विद्यार्थी यांना सरावासाठी उपयुक्त ठरलेला लघुलेखनविषयक एकमेव ग्रंथ ना.गो.कालेलकर पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कार 1995-९६
ई) दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश – (संपादक – डॉ.गंगाधर पानतावणे) याकरिता इ.स. 1818 ते 2005 या कालखंडात प्रकाशित झालेल्या साहित्यातून दलित-ग्रामीण जीवनानुभव व्यक्त झाले आहेत असे साहित्य या शब्दकोशासाठी आधारभूत मानलेले आहे. त्यातील अपरिचित व नवीन शब्द कोशबध्द करण्यात येणार आहेत. दोन खंड प्रकाशित, तिसरा खंड लवकरच प्रकाशित होईल.
(4) शैक्षणिक :-
अ) मराठी लेखन मार्गदर्शिका (यास्मिन शेख) सर्वसामान्य नागरिक, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी, भाषा शिकणाऱ्या अन्य भाषक व्यक्ती, दूरचित्रवाणीपटावर लेखन करणारे कलावंत, पाटया रंगविणारे रंगारी, टंकलेखक, संगणकावर अक्षरजुळणी करणारे तंत्रज्ञ अशा सर्वांना मराठीत लेखन करण्यासाठी बिनचूक मार्गदर्शन करणारे उपयुक्त पुस्तक, तिसरी सुधारित आवृत्ती लवकरच प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.
ब) प्रशासनिक मराठी भाषेचा विकास – (गीता भागवत) प्रशासनिक लेखन करणाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर सूचनांसह, प्रशासनिक मराठीचा वस्तुनिष्ठ व शास्त्रशुध्द पध्दतीने केलेला अभ्यास.
संस्थेचे अन्य उपक्रम :-
(1) बृहन्महाराष्ट्र मंडळांना अर्थसहाय्य योजना : या योजनेअंतर्गत, महाराष्ट्राबाहेर मराठी भाषा, साहित्य व संस्कृती वृध्दींगत होण्यासाठी कार्य करणा-या देशांतर्गत बृहन्महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्था / मंडळे यांना विहित कार्यपध्दतीनुसार एकूण रु.20.00 लक्ष (प्रत्येकी रु.2.00 लक्षच्या मर्यादेत) अर्थसहाय्य करण्यात येते.
(2) प्रासंगिक उपक्रम :- वाचन प्रेरणा दिन / मराठी भाषा संवर्धन पंधरवडा – भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून सन 20१5 पासून दरवर्षी दिनांक 15 ऑक्टोबर हा दिवस “ वाचन प्रेरणा दिन ” म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्त विविधांगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्याचप्रमाणे राज्यामध्ये दरवर्षी 1 जानेवारी ते १५ जानेवारी हा कालावधी “ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ” म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने लेखन / वाचन / प्रचार / प्रसार म्हणजेच मराठीचा सक्षमपणे वापर करण्याकरिता संस्थेच्या स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येतात.
(3) दलित-ग्रामीण साहित्य शब्दकोश व साहित्यसूची : दलित आणि ग्रामीण साहित्य हे मराठी साहित्यातील महत्वाचे असे दोन प्रवाह आहेत. अपरिचित शब्द, संज्ञा, संकल्पना, म्हणी, वाक्यप्रयोग यांमुळे हे साहित्य काही प्रमाणात वाचकांच्या दृष्टीने दुर्बोध राहिले आहे. लोकजीवनाच्या वेगवेगळ्या अंगांशी निगडित अशा दलित-ग्रामीण साहित्यातील, शब्दांचा नेमका अर्थ सापडेल असा शब्दकोश आज मराठीत नसल्याने तसेच या साहित्यामधून जे नवनवीन आणि अपरिचित शब्द मिळतात ते प्रमाण मराठी भाषेत येणे आवश्यक असल्याने असे शब्द विविध साहित्यकृतींमधून निवडून त्यांचे अर्थ तपशीलांसह या कोशात दिलेले आहेत. ते विशिष्ट शब्द असलेले साहित्यकृतीतील मूळ वाक्यही वाचकांच्या संदर्भासाठी त्या त्या नोंदीमध्ये दिलेले आहे. या कोशाचे खंड- 1 व 2 प्रकाशित झाले आहेत.
(४) दलित-ग्रामीण-साहित्य रूढी, प्रथा, परंपरा विधिकोश : दलित-ग्रामीण-साहित्य शब्दकोश या प्रकल्पाचाच हा एक भाग असून त्यामध्ये दलित व ग्रामीण साहित्यकृतींमधून आलेल्या विविध जाती-जमातींच्या विधी, रूढी, प्रथा, परंपरा, श्रध्दा, समजुती, सण-उत्सव, नवस-सायास, दैवत, लोकाचर इत्यादी विषयांच्या अनुषंगाने सांस्कृतिक संदर्भ असलेल्या अनेक संकल्पनांचे संकलन करुन त्यांची सचित्र स्पष्टीकरणात्मक माहिती या कोशातून दिलेली असून हा कोश प्रकाशित करण्यात आला आहे.
(5) वस्त्रनिर्मिती-माहितीकोश : वस्त्रोद्योगाची सर्वांगीण व अद्ययावत माहिती मराठी भाषेतून उपलब्ध करुन देणारा वस्त्रनिर्मिती माहितीकोश हा प्रकल्प राज्य मराठी विकास संस्था आणि दत्ताजीराव कदम तांत्रिक शिक्षण संस्था, इचलकरंजी यांनी संयुक्तपणे कार्यान्वित केला आहे. झपाट्याने विकसित होणाऱ्या विज्ञान तंत्रज्ञानामुळे भारतातील वस्त्रोद्योगाचा, वस्त्रनिर्मितीकलेचा विकास कसा होत गेला ते विकासाचे टप्पे, भारतीय वस्त्रोद्योगाचे आजवरचे स्वरुप त्याची वैज्ञानिक-तांत्रिक प्रगती, महाराष्ट्राचे या उद्योगामधील स्थापन, होऊ घातलेले जागतिकीकरण या सर्वांचा या कोशात साकल्याने विचार करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सर्वसामान्य जिज्ञासूला समजेल अशी माहिती या कोशात देण्यात आली आहे. या माहितीकोशाचे एकूण नऊ खंड संकल्पित असून आतापर्यंत चार खंडांचे प्रकाशन झाले आहे. पाचव्या खंडाची (फॅशन व वस्त्रप्रावरणे) मुद्रणप्रत तयार झाली आहे.
(६) मराठी ग्रंथसूचीमाला (१९५१-२०००) : शं.ग.दाते यांनी सन १९५० पर्यंतच्या मराठी ग्रंथांची विषयवार सूची दोन भागांत तयार केली होती. ही सूची बरीच वर्षे अनुपलब्ध असल्याने तिचे नवीन परिशिष्टांसह पुनर्मुद्रण संस्थेमार्फत करण्यात आले होते. इ.स. १९५० नंतर मराठीमध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथांची एकत्रित अशी विषयवार ग्रंथसूची उपलब्ध नसल्याने राज्य मराठी विकास संस्थेने “ मराठी ग्रंथसूचीमाला ” हा प्रकल्प हाती घेतला असून, त्याअंतर्गत इ.स. 1951 ते 2000 या कालखंडातील मराठी ग्रंथांची विषयवार सूची तयार करण्यात येत आहे. आतापर्यंत या मालेतील चार भाग प्रकाशित करण्यात आले आहेत.
(७) मराठी उत्तमोत्तम साहित्यकृतींची श्राव्य पुस्तके (ऑडियो सीडीज) : या प्रकल्पांतर्गत मराठीतील प्रसिध्द निवडक संतसाहित्य तसेच ज्ञानपीठ पारितोषिक विजेत्या साहित्यिकांचे साहित्य, साहित्य अकादमी पारितोषिक विजेते साहित्य व महाराष्ट्र शासन पारितोषिक विजेते निवडक साहित्यकृतींची श्राव्य पुस्तके तयार करण्यात येणार असून, आतापर्यंत रम्य कृष्णाकाठ (स्व. यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र) व श्री दासबोध (श्री समर्थ रामदास) या ग्रंथांची श्राव्य पुस्तके तयार करण्यात आली असून, ती संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच त्यांच्या ऑडिओ सीडीही संस्थेच्या कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठीतील ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज आणि विंदा करंदीकर यांचे अनुक्रमे रसयात्रा व प्रवासी पक्षी आणि संहिता व आदिमाया या कवितासंग्रहांची श्राव्य पुस्तके संस्थेच्या संकेतस्थळावर जनतेसाठी विनामुल्य उपलब्ध करण्यात आली आहेत.
(८) मोडी हस्तलिखितांचे मराठी भाषेत रुपांतरण व विषयसूची खंड तयार करणे : तमिळ विद्यापीठ, तंजावर येथील मोडी हस्तलिखितांचे मराठी भाषेत रुपांतरण करण्याचा प्रकल्प संस्थेने माहे मार्च 2013 मध्ये तमिळ विद्यापीठ, तंजावर यांच्याबरोबर करार करुन सुरु केलेला आहे. या प्रकल्पांतर्गत अतिमहत्वाच्या पाच लाख मोडी हस्तलिखितांचे जतन व संवर्धन करण्यासाठी पूर्वतयारी म्हणून त्यांची साफसफाई, दुरुस्ती करुन त्यांची विषयाप्रमाणे सूची (कॅटलॉग) तयार करणे, ती कागदपत्रे संगणकावर (डिजिटायझेशन) आणणे व त्या कागदपत्रांचे मराठीमध्ये रुपांतरण करुन ते प्रकाशित करणे असे या प्रकल्पाचे स्वरुप आहे. यातील पाच लाख हस्तलिखित कागदपत्रांची साफसफाई करणे, कागदपत्रांच्या घड्या काढणे, फाटलेली व जीर्ण झालेली हस्तलिखिते दुरुस्ती करणे इ. कामे पूर्ण झालेली असून या कागदपत्रांची संगणकावर पाच लक्ष इमेजेस / फ्रेम्स तयार करण्यात आली आहेत.
(९) संस्थेच्या प्रकाशनांचे ई-पुस्तक स्वरुपात रुपांतरण करण्याचा प्रकल्प : संगणकीय क्रांतीमुळे उपलब्ध झालेल्या नव्या साधनांवर संस्थेची प्रकाशने उपलब्ध व्हावीत ह्या हेतूने संस्थेच्या काही प्रकाशनांचे ई-बुक स्वरुपात रुपांतर करण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. संस्थेची ही प्रकाशने इ-पब, पीडीएफ अशा विविध संगणकीय पुस्तक स्वरुपांत उपलब्ध होत आहेत.
(१०) मराठी दुर्मिळ ग्रंथांचे संगणकीकरण : मराठी भाषा, संस्कृती, साहित्य आणि समाजजीवन यासंदर्भातील ऐतिहासिक ठेवा जतन करण्याच्या हेतूने आजवर प्रकाशित झालेल्या मराठी ग्रंथांपैकी ज्यांच्या स्वामित्व हक्काची मुदत संपली आहे, अशी मराठी भाषेतील दुर्मिळ पुस्तके आणि नियतकालिके ह्यांचे संगणकीकरण (डिजिटायझेशन) करुन ते जनतेला उपलब्ध करुन देण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. सद्य:स्थितीत राज्य मराठी विकास संस्थेकडून ९५६ दुर्मिळ ग्रंथांची सूची तयार करण्यात आली असून, आतापर्यंत १०३ राज्य मराठी विविध नियतकालिकांचे ३५७ सुटे अंक (२३९ बांधीव खंड – बांधीव खंडात एकाहून अधिक सुटे अंक असतात) उतरवून घेण्यासाठी (डाऊनलोड करण्यासाठी) सध्या संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
(११) संगणक आणि मराठी : मराठी भाषेतील संगणकवरील वापर वाढावा, तो अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व्हावा ह्यासाठी सदर प्रकल्पशीर्षकांतर्गत विविध स्वरुपाचे प्रयत्न करण्यात येत आहेत. यास अनुसरुन राज्य शासनाने दिनांक ०८.०७.२०१६ रोजी प्रथम १ वर्षासाठी युनिकोड व कन्सोर्शियमचे वार्षिक सदस्यत्व घेतले आहे. युनिकोड कन्सोर्शियम ही संगणकावर विविध लिप्यांचा प्रमाणित वापर व्हावा यासाठी प्रमाणक तयार करणारी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्था आहे. या संस्थेचे सदस्यत्व घेतल्याने राज्य शासनास ह्या प्रमाणीकरणाच्या प्रक्रियेत सहभागी होता येणार असून त्याद्वारे भविष्यातील बदलत्या तंत्रज्ञानाचा वेध घेता यावा तसेच मराठीच्या विविध क्षेत्रांतील वापरासाठी आवश्यक असलेल्या चिन्हांसाठी युनिकोड संकेतांक उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
(१२) युनिकोड-आधारित मुक्त (फ्री ॲण्ड ओपन सोर्स) मराठी टंक तयार करणे : “यशोमुद्रा” आणि “यशोवेणू” हे दोन टंक संस्थेच्या संकेतस्थळावर (rmvs.maharashtra.gov.in) विनामुल्य तसेच मुक्त (फ्री ॲण्ड ओपन सोर्स) स्वरुपात उपलब्ध करुन दिले आहेत. त्याचप्रमाणे संस्थेला योग्य ते श्रेय देऊन हे टंक वापरण्यास त्याची प्रत करुन घेण्यास, त्याची सर्व (तांत्रिक आणि ज्ञानात्मक) सामग्री पाहण्यास आणि अभ्यासण्यास, ह्या सामग्रीचा वापर करुन नवी सामग्री तयार करण्यास आणि योग्य त्या श्रेयनिर्देशासह जीपीएल-३ ह्या परवान्याअंतर्गत वितरीत करण्यास स्वामित्व हक्क धारक म्हणून राज्य मराठी विकास संस्थेने मान्यता दिली आहे.
(१३) पुस्तकांचे गाव : वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी याकरीता इंग्लंडमधील “ हे-ऑन-वे ” च्या धर्तीवर महाराष्ट्रात पर्यटनस्थळी वाचकांसाठी “ पुस्तकांचे गांव ” उभारण्याची संकल्पना मा.मंत्री (मराठी भाषा) यांनी सन २०१५ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानमंडळासमोर मांडली. लोकसहभागातून साकारलेला “पुस्तकांचे गांव ” हा नाविन्यपूर्व प्रकल्प महाबळेश्वर व पांचगणीच्या मध्ये वसलेल्या तसेच कृषि पर्यटन व स्ट्रॉबेरी महोत्सव हे प्रमुख आकर्षण असलेल्या “ भिलार ” या गांवात माहे मे, २०१७ पासून कार्यान्वित करण्यात आला आहे. भिलार गांवात घरे, लॉज, शाळा आणि मंदिर अशी सार्वजनिक ठिकाणे मिळून २५ जागा निवडण्यात आल्या आहेत. या २५ ठिकाणी पुस्तकांची साहित्यप्रकारनिहाय दालने ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक घरात, पर्यटकांना पुस्तके व्यवस्थित पाहता येतील, चाळता येतील, प्रसंगी आरामात बसून वाचता येतील अशी व्यवस्था आहे.
(१४) अशोक केळकर यांचा मराठी इंग्रजी शब्दकोश : भाषा वैज्ञानिक डॉ.अशोक केळकर यांच्या अपूर्ण राहिलेल्या “द प्रोजेक्ट ऑफ कॉम्प्रेहेन्सिव्ह मराठी इंग्लिश डिक्शनरी” या प्रकल्पाचे काम पश्चिम विभागीय भाषा केंद्र (भारतीय भाषा संस्था) पुणे या संस्थेच्या विद्यमाने पूर्ण करण्यात येणार आहे.
(१५) विकिपिडीयावर मराठी कार्यशाळा : दि. १ जानेवारी २०१७ ते १५ जानेवारी २०१७ या कालावधीत भाषा पंधरवड्यानिमित्त राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी विकिपिडियावर मराठी या संदर्भातील कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये विविध क्षेत्रांतील ज्येष्ठ अभ्यासक, मराठी भाषा, विकिपिडियाचे महत्व सांगणारी तज्ज्ञ व्यक्ती कोणत्याही ज्ञानशाखेचा प्राध्यापक यांचा समावेश करण्यात आला होता. त्याचप्रमाणे मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून विद्यापीठ स्तरावर मराठी भाषा प्रचार व प्रसार, विकिपिडीयावर मराठी या विषयासंदर्भात मोठ्या प्रमाणावर जागृती करण्यासंदर्भात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभाग झाले होते व मराठी विकिपिडीया या संकेतस्थळावर मराठी माहिती वाचकांना उपलब्ध करुन देण्यात आली.
***************
परिशिष्ट 6
विभागामार्फत साहित्यिक क्षेत्रात देण्यात येणारे पुरस्काराचे स्वरुप
- विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार – मराठी साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत ज्येष्ठ साहित्यिकास ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक कै.विंदा करंदीकर यांच्या नावे दरवर्षी जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. पुरस्काराचे स्वरूप रू.5,00,000/- (अक्षरी रूपये पाच लक्ष फक्त ) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. यापुर्वीचे पुरस्कार सांस्कृतिक विभागाकडून प्रदान करण्यात आले आहेत. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून सन 2010 पासून राबविण्यात येत असलेली ही योजना सन 2012-13 पासून मराठी भाषा विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे.
विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कारांची मान्यवरांची यादी
अ.क्र. | वर्ष | सन्मानित साहित्यिकांचे नाव |
1 | 2010 | श्रीमती विजया राजाध्यक्ष |
2 | 2011 | श्री. के.ज.पुरोहित |
3 | 2012 | श्री.ना.धों.महानोर |
4 | 2013 | श्री. वसंत आबाजी डहाके |
5 | 2014 | श्री. द. मा. मिरासदार |
6 | 2015 | प्रा. रा.ग.जाधव |
7 | 2016 | श्री. मारुती चितमपल्ली |
8 | 2017 | श्री. मधु मंगेश कर्णिक |
- श्री.पु.भागवत पुरस्कार – मराठी साहित्य निर्मिती क्षेत्रात लक्षणीय व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रकाशन संस्थेस मराठी प्रकाशन व्यवसायात मोलाचे कार्य करणारे श्री.पु.भागवत यांच्या नांवे दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरूप रू.3,00,000/- (अक्षरी रूपये तीन लक्ष फक्त) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे आहे. पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून सन 2008 पासून राबविण्यात येत असलेली ही योजना सन 2012-13 पासून मराठी भाषा विभागाकडे वर्ग करण्यात आली आहे.
श्री.पु.भागवत पुरस्कारांची मान्यवरांची यादी
अ.क्र. | वर्ष | सन्मानित संस्थेचे नाव |
1 | 2008 | पॉप्युलर प्रकाशन |
2 | 2009 | साकेत प्रकाशन |
3 | 2010 | मौज प्रकाशन |
4 | 2011 | नवचैतन्य प्रकाशन |
5 | 2012 | मॅजेस्टिक प्रकाशन |
6 | 2013 | राजहंस प्रकाशन |
7 | 2014 | श्री. केशव भिकाजी ढवळे प्रकाशन, मुंबई |
8 | 2015 | कॉन्टीनेन्टल प्रकाशन, पुणे |
9 | 2016 | भारतीय विचार साधना, पुणे |
10 | 2017 | वरदा प्रकाशन, पुणे |
- डॅा.अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार – मराठी भाषा अभ्यास क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या अभ्यासकांना (व्यक्ति अथवा संस्था ) आतंरराष्ट्रीय किर्तीचे ज्येष्ठ भाषा वैज्ञानिक आणि साहित्य समीक्षक डॉ. अशोक केळकर यांचे नावाने मराठी भाषा अभ्यासक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. “अशोक केळक, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार ” रु.२.०० लक्ष (रुपये दोन लक्ष फक्त) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
“ डॉ.अशोक केळकर, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार” प्राप्त मान्यवरांची यादी
अ.क्र. | वर्ष | सन्मानित मान्यवर |
1 | 2015 | डॉ.मॅक्सीन बर्नसन, फलटन
(सध्या वास्तव्य हैद्राबाद ) |
2 | 2016 | श्रीमती यास्मिन शेख, पुणे |
3 | 2017 | श्री. अशोक बिनीवाले, पुणे |
- कविवर्य मंगेश पाडगांवकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार – मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता उल्लेखनीय कामगिरी करणा-या व्यक्ती अथवा संस्थेस या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. “कविवर्य मंगेश पाडगांवकर ” मराठी भाषा संवर्धक पुरस्कार” रु.२.०० लक्ष (रुपये दोन लक्ष फक्त) रोख, मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
“ कविवर्य मंगेश पाडगांवकर, मराठी भाषा संवर्धक पुरस्कार” प्राप्त मान्यवरांची यादी
अ.क्र. | वर्ष | सन्मानित मान्यवर |
1 | 2015 | श्रीमती बेबीताई गायकवाड, अहमदनगर |
2 | 2016 | श्री. श्याम जोशी, बदलापूर |
3 | 2017 | मराठी विज्ञान परिषद |
- स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना ( एकूण 35 पुरस्कार )
- मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार या योजने अंतर्गत विविध वाड्:मय प्रकारांकरिता खालीलप्रमाणे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
अ.क्र. | वाड्:मय प्रकार | पुरस्कार | रक्कम |
१ | प्रौढ वाङ्मय – काव्य | कवी केशवसूत पुरस्कार | रु.1,00,000/- |
२ | प्रौढ वाङ्मय – नाटक / एकांकिका | राम गणेश गडकरी पुरस्कार | रु.1,00,000/- |
३ | प्रौढ वाङ्मय – कादंबरी | हरी नारायण आपटे पुरस्कार | रु.1,00,000/- |
४ | प्रौढ वाङ्मय – लघुकथा | दिवाकर कृष्ण पुरस्कार | रु.1,00,000/- |
५ | प्रौढ वाङ्मय – ललितगद्य (ललित विज्ञानासह) | अनंत काणेकर पुरस्कार | रु.1,00,000/- |
६ | प्रौढ वाङ्मय – ललितगद्य
(ललित विज्ञानासह) |
अनंत काणेकर पुरस्कार | रु.1,00,000/- |
७ | प्रौढ वाङ्मय – चरित्र | न.चिं.केळकर पुरस्कार | रु.1,00,000/- |
८ | प्रौढ वाङ्मय – आत्मचरित्र | लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार | रु.1,00,000/- |
९ | प्रौढ वाङ्मय – समीक्षा / वाङ्मयीन संशोधन / सौंदर्यशास्त्र / ललितकला आस्वादपर लेखन | श्री.के.क्षीरसागर पुरस्कार | रु.1,00,000/- |
१० | प्रौढ वाङ्मय – राज्यशास्त्र/समाजशास्त्र | डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार | रु.1,00,000/- |
11 | प्रौढ वाङ्मय – इतिहास | शाहू महाराज पुरस्कार | रु.1,00,000/- |
१२ | प्रौढ वाङ्मय – भाषाशास्त्र/व्याकरण | नरहर कुरूंदकर पुरस्कार | रु.1,00,000/- |
१३ | प्रौढ वाङ्मय – विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह) | महात्मा जोतिराव फुले पुरस्कार | रु.1,00,000/- |
१४ | प्रौढ वाङ्मय – शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह | वसंतराव नाईक पुरस्कार | रु.1,00,000/- |
१५ | प्रौढ वाङ्मय – दलित साहित्य | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार | रु.1,00,000/- |
१६ | प्रौढ वाङ्मय – अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन | सी.डी. देशमुख पुरस्कार | रु.1,00,000/- |
१७ | प्रौढ वाङ्मय – तत्त्वज्ञान व मानसशास्त्र | ना.गो.नांदापूरकर पुरस्कार | रु.1,00,000/- |
१८ | प्रौढ वाङ्मय – शिक्षणशास्त्र | कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार | रु.1,00,000/- |
१९ | प्रौढ वाङ्मय – पर्यावरण | डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार | रु.1,00,000/- |
२० | प्रौढ वाङ्मय – संपादित/ आधारित | रा.ना.चव्हाण पुरस्कार | रु.1,00,000/- |
२१ | प्रौढ वाङ्मय – अनुवादित | तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार | रु.1,00,000/- |
२२ | प्रौढ वाङ्मय – संकीर्ण (क्रीडासह) | भाई माधवराव बागल पुरस्कार | रु.1,00,000/- |
२३ | प्रथम प्रकाशन – काव्य | बहिणाबाई चौधरी पुरस्कार | रु.50,000/- |
24 | प्रथम प्रकाशन – नाटक / एकांकिका | विजय तेंडूलकर पुरस्कार | रु.50,000/- |
25 | प्रथम प्रकाशन – कादंबरी | श्री.ना.पेंडसे पुरस्कार | रु.50,000/- |
26 | प्रथम प्रकाशन – लघुकथा | ग.ल.ठोकळ पुरस्कार | रु.50,000/- |
27 | प्रथम प्रकाशन – ललितगद्य | ताराबाई शिंदे पुरस्कार | रु.50,000/- |
28 | प्रथम प्रकाशन – समीक्षा सौंदर्यशास्त्र | रा.भा.पाटणकर पुरस्कार | रु.50,000/- |
29 | बाल वाङ्मय – कविता | बालकवी पुरस्कार | रु.50,000/- |
30 | बालवाङ्मय – नाटक व एकांकिका | भा.रा.भागवत पुरस्कार | रु.50,000/- |
31 | बालवाङ्मय – कादंबरी | साने गुरुजी पुरस्कार | रु.50,000/- |
32 | बालवाङ्मय – कथा
( छोटया गोष्टी, परीकथा, लोककथांसह) |
राजा मंगळवेढेकर पुरस्कार | रु.50,000/- |
33 | बाल वाङ्मय – सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे) | यदुनाथ थत्ते पुरस्कार | रु.50,000/- |
34 | बालवाङ्मय – संकीर्ण | ना.धो. ताम्हणकर पुरस्कार | रु.50,000/- |
35 | सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार | सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार | रु.1,00,000/- |
**************************
परिशिष्ट-7
माहिती अधिकारी अधिनियम 2005 च्या नियम 5(1) व 5(2) नुसार राज्य जन माहिती अधिकारी व राज्य सहायक जन माहिती अधिकारी तसेच नियम 19 (1) नुसार अन्वये नियुक्त केलेले अपिलीय अधिकारी यांची यादी
- मराठी भाषा विभाग (खुद्द)
अ. क्र. | विषय | राज्य सहायक जन माहिती अधिकारी | राज्य जन माहिती अधिकारी | अपिलीय अधिकारी |
1 | आस्थापना-1
मराठी भाषा विभाग (खुद्द) आस्थापना विषयक बाबी |
सहायक कक्ष अधिकारी,
आस्थापना-1
|
कक्ष अधिकारी, आस्थापना-1
(०२२) २२७९4170 |
अवर सचिव (आस्थापना)
(०२२) 22851222 (022) 22794164
|
२ | आस्था-2
क्षेत्रीय कार्यालयांच्या आस्थापना विषयक बाबी |
सहायक कक्ष अधिकारी, आस्था-2 | कक्ष अधिकारी, आस्था-2
(022) 22794169
|
|
सहायक कक्ष अधिकारी, आस्था-2 | ||||
३ | रोखशाखा
· मराठी भाषा विभागातील अधिकारी / कर्मचारी यांची वेतन देयके व अन्य देयके यांचे आहरण व संवितरण · मराठी भाषा विभाग (खुद्द) खर्चमेळ्याची कामे · सेवा पुस्तकातील सर्व नोंदी जतन करणे. |
सहायक कक्ष अधिकारी,
रोख शाखा |
कक्ष अधिकारी,
रोख शाखा (०२२) 22794267
|
|
४ | भाषा-2
भाषा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या धोरणात्मक बाबी. (आस्थापना विषयक बाबी वगळून) |
सहायक कक्ष अधिकारी, भाषा-2 | कक्ष अधिकारी, भाषा-2
(022) 22794170 |
अवर सचिव
(भाषा) (022) 22852298
(022) 22794166
|
५ | भाषा-3
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था या कार्यालयांचे धोरणात्मक बाबी (आस्थापना विषयक बाबी वगळून)
|
सहायक कक्ष अधिकारी, भाषा-3 | कक्ष अधिकारी, भाषा-3
(022) 2279416८
|
|
६ | नोंदणी शाखा
· विभागात आलेले टपाल / धारीका यांची आवक-जावक (गोपनीय टपालासह) नोंदी ठेवणे व त्यांचे कार्यासननिहाय वाटप करणे. · मराठी भाषा विभागातील अभिलेख्यांची नोंदणी व जतन · विधिमंडळ कामकाज संबंधित समन्वयाची कामे व विभागातील एकापेक्षा अधिक कार्यासनांशी संबंधीत कामकाजाचे समन्वय · गृहव्यवस्थापन |
सहायक कक्ष अधिकारी, नोंदणी शाखा | कक्ष अधिकारी, नोंदणी शाखा
(022) 22794169 |
अवर सचिव
(गृह व्यवस्थापन) (022) 22851639 (022) 22794165
|
७ | भाषा-1
विभागांतर्गत स्थापन केलेल्या समित्यांचे कामकाज, अभिजात भाषा दर्जा विषयक कामकाज, मराठी भाषा धोरण विषयक कामकाज व क्षेत्रीय कार्यालयांचे गृहव्यवस्थापन |
सहायक कक्ष अधिकारी, भाषा-1 | कक्ष अधिकारी, भाषा-1
(022) 22794168
|
|
८ | अर्थसंकल्प
· मराठी भाषा विभाग (खुद्द) व क्षेत्रीय कार्यालयांचे अर्थसंकल्पीय अंदाज व तद्नुषंगिक इतर सर्व बाबी व समन्वय · विनियोजन लेखे |
सहायक कक्ष अधिकारी, अर्थसंकल्प शाखा | कक्ष अधिकारी, अर्थसंकल्प शाखा
(022) 22794168
|
|
परिशिष्ट-7
2) भाषा संचालनालय
माहिती अधिकारी अधिनियम 2005 च्या नियम 5(1) व 5(2) नुसार राज्य जन माहिती अधिकारी व राज्य सहायक जन माहिती अधिकारी तसेच नियम 19 (1) नुसार अन्वये नियुक्त केलेले अपिलीय अधिकारी यांची यादी
अ.क्र. | विषय | राज्य सहायक जन
माहिती अधिकारी |
राज्य जन माहिती अधिकारी | अपिलीय अधिकारी |
1 | भाषा संचालनालय | अधीक्षक,
कार्यासन-14 |
प्र. सहायक भाषा संचालक (प्रशिक्षण व आस्थापना)
|
भाषा संचालक, महाराष्ट्र राज्य |
भाषा संचालनालय -अनुवादाविषयी
|
पर्यवेक्षक | भाषा उप संचालक (विधि)
भाषा उपसंचालक (अनुवाद व शब्दावली) |
— // — | |
2. | विभागीय कार्यालय, नवी मुंबई-आस्थापना व अनुवाद विषयक बाबी | अधीक्षक | विभागीय सहायक भाषा संचालक
|
— // — |
3. | विभागीय कार्यालय, पुणे-
आस्थापना व अनुवाद विषयक बाबी |
अधीक्षक | विभागीय सहायक भाषा संचालक
|
— // — |
4. | विभागीय कार्यालय, नागपूर-
आस्थापना व अनुवाद विषयक बाबी |
अधीक्षक | विभागीय सहायक भाषा संचालक
|
— // — |
5. | विभागीय कार्यालय, औरंगाबाद-
आस्थापना व अनुवाद विषयक बाबी |
अधीक्षक | विभागीय सहायक भाषा संचालक
|
— // — |
परिशिष्ट-7
3) महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ
माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या नियम 5(1) व 5(2) नुसार राज्य जन माहिती अधिकारी व राज्य सहायक जन माहिती अधिकारी तसेच नियम 19 (1) नुसार अन्वये नियुक्त केलेले अपिलीय अधिकारी यांची यादी
अ.
क्र |
विषय | राज्य सहायक जन
माहिती अधिकारी |
राज्य जन माहिती अधिकारी | अपिलीय अधिकारी |
1)
2)
३) |
आस्थापना शाखा – मंडळाच्या कार्यालयातील आस्थापना विषयक बाबी हाताळणे, सेवापुस्तकाच्या सर्व नोंदी जतन करणे, लेखन सामग्री विषयक नोंदी, पदभरती पदाचे प्रस्ताव व अन्य आस्थापना विषयक प्रकरण करणे.
प्रकाशन शाखा – प्रकाशनविषयक बाबी, स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार योजना, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार योजना,श्री. पु. भागवत पुरस्कार योजना, अन्य मराठी साहित्य संमेलन अनुदान योजना, सांस्कृतिक धोरणातील मंडळाकडे सोपविलेले प्रकल्प/ योजना व मंडळाने हाती घेतलेले प्रकल्प/ योजना लेखा शाखा – मंडळाच्या कार्यालयाची सर्व देयके तपासणे, खर्चाचा ताळमेळ, विनियोजन लेखे इतर अन्य लेखाविषयक कामे |
—
प्रपाठक, राज्य सहायक जन माहिती अधिकारी
सहायक लेखा अधिकारी, राज्य सहायक जन माहिती अधिकारी
|
अधीक्षक तथा जन माहिती अधिकारी,
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई दूरध्वनी क्रमांक : (022) 24325931 ई-मेल : secretary.sblc- mh@gov.in
|
सचिव,
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई
दूरध्वनी क्रमांक : (022) 24325929 ई-मेल : secretary.sblc- mh@gov.in
|
परिशिष्ट-7
4) महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ
माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या नियम 5(1) व 5(2) नुसार राज्य जन माहिती अधिकारी व राज्य सहायक जन माहिती अधिकारी तसेच नियम 19 (1) नुसार अन्वये नियुक्त केलेले अपिलीय अधिकारी यांची यादी
अ.
क्र |
विषय | राज्य सहायक जन माहिती अधिकारी | राज्य जन माहिती अधिकारी | अपिलीय अधिकारी |
1. | आस्थापना शाखा
|
—- | अधीक्षक,
जन माहिती अधिकारी, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, रविंद्र नाटय मंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025. दू. क्र. 022-24229020
|
सचिव,
अपिलीय अधिकारी राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, रविंद्र नाटय मंदिर, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025. दू. क्र. 022-24229020
|
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश कार्यालय – वाई
अ.क्र | विषय | राज्य सहायक जन माहिती अधिकारी | राज्य जन माहिती अधिकारी | अपिलीय अधिकारी |
3 | प्रशासन
|
—- | सहायक सचिव,
जन माहिती अधिकारी मराठी विश्वकोश कार्यालय, 309/310, गंगापुरी, वाई, जि. सातारा- 412 803
|
अपिलीय अधिकारी
मराठी विश्वकोश कार्यालय, 309/310, गंगापुरी, वाई, जि. सातारा- 412803 दू. क्र. 022-24229020 |
परिशिष्ट-7
5) राज्य मराठी विकास संस्था
माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या नियम 5(1) व 5(2) नुसार राज्य जन माहिती अधिकारी व राज्य सहायक जन माहिती अधिकारी तसेच नियम 19 (1) नुसार अन्वये नियुक्त केलेले अपिलीय अधिकारी यांची यादी
विषय | राज्य सहायक जन माहिती अधिकारी | राज्य जन माहिती अधिकारी | अपिलीय अधिकारी |
प्रशासन
|
कार्यासन अधिकारी
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई दूरध्वनी क्रमांक (022) 22631325 फॅक्स -(022) 22653966 |
प्रशासकीय अधिकारी,
राज्य मराठी विकास संस्था,मुंबई दूरध्वनी क्रमांक (022) 22631325 फॅक्स -(022) 22653966 |
संचालक ,
राज्य मराठी विकास संस्था, मुंबई दूरध्वनी क्रमांक (022) 22631325 फॅक्स -(022) 22653966 |
***********************************************
परिशिष्ट – 8
मराठी भाषा विभाग- सन 2014-15 ते सन 201७-1८ या चार वर्षांकरीता केलेली आर्थिक तरतूद व खर्च दर्शविणारे विवरणपत्र
(रक्कम रु. लाखात)
वर्ष | कार्यालय/संस्था | एकूण तरतूद | प्रत्यक्ष खर्च | ||||
योजनेतर | योजनांतर्गत | एकूण | योजनेतर | योजनांतर्गत | एकूण | ||
2014-15
|
मराठी भाषा विभाग, मंत्रालय | 243.12 | 507.00 | 750.12 | 201.80 | 3.99 | 205.79 |
भाषा संचालनालय | 540.58 | — | 540.58 | 457.93 | — | 457.93 | |
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ | 238.31 | 163.00 | 401.31 | 186.76 | 85.50 | 272.26 | |
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ | 191.26 | 40.00 | 231.26 | 161.56 | 7.59 | 169.15 | |
राज्य मराठी विकास संस्था | 94.08 | 258.00 | 352.08 | 81.86 | 100.90 | 182.76 | |
शासकीय कर्मचा-यांचे अग्रीम | 13.73 | — | 13.73 | 7.83 | — | 7.83 | |
ठेव संलग्न विमा योजना | 2.40 | — | 2.40 | 0.60 | — | 0.60 | |
एकूण (2014-15) | 1323.48 | 968.00 | 2291.48 | 1098.34 | 197.98 | 1296.32 | |
2015-16
|
मराठी भाषा विभाग, मंत्रालय | 267.02 | 565.70 | 832.72 | 240.31 | 0.00 | 240.31 |
भाषा संचालनालय | 603.52 | — | 603.52 | 535.14 | — | 535.14 | |
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ | 241.94 | 133.50 | 477.74 | 298.55 | 102.50 | 401.05 | |
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ | 226.96 | 40.00 | 266.95 | 192.18 | 39.98 | 232.16 | |
राज्य मराठी विकास संस्था | 98.58 | 290.50 | 389.08 | 80.56 | 154.95 | 235.51 | |
शासकीय कर्मचा-यांचे अग्रीम | 13.51 | — | 13.51 | 10.65 | — | 10.65 | |
ठेव संलग्न विमा योजना | 2.40 | — | 2.40 | 0.00 | — | 0.00 | |
एकूण (2015-16) | 1453.93 | 1029.70 | 2483.63 | 1357.39 | 297.43 | 1654.82 | |
2016-17
|
मराठी भाषा विभाग, मंत्रालय | 301.29 | 302.00 | 603.29 | 257.71 | 1.95 | 259.66 |
भाषा संचालनालय | 666.92 | — | 666.92 | 563.97 | — | 563.97 | |
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ | 252.97 | 198.26 | 451.23 | 214.61 | 125.76 | 340.37 | |
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ | 231.85 | 150.80 | 382.65 | 188.03 | 119.73 | 307.76 | |
राज्य मराठी विकास संस्था | 97.50 | 396.25 | 493.75 | 97.50 | 246.25 | 343.75 | |
शासकीय कर्मचा-यांचे अग्रीम | 14.20 | — | 14.20 | 14.08 | — | 14.08 | |
ठेव संलग्न विमा योजना | 2.40 | — | 2.40 | 0.00 | — | 0.00 | |
एकूण (2016-17) | 1567.13 | 1047.31 | 2614.44 | 1335.90 | 493.69 | 1829.59 | |
2017-18 | मराठी भाषा विभाग, मंत्रालय | 331.84 | 561.72 | 793.56 | 268.88 | 311.21 | 580.09 |
भाषा संचालनालय | 707.58 | — | 707.58 | 602.24 | — | 602.24 | |
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ | 305.02 | 373.90 | 678.92 | 298.70 | 373.77 | 672.47 | |
महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ | 166.31 | 105.56 | 271.87 | 159.54 | 97.04 | 256.58 | |
राज्य मराठी विकास संस्था | 102.50 | 636.30 | 738.80 | 102.50 | 636.30 | 738.80 | |
शासकीय कर्मचा-यांचे अग्रीम | 21.67 | — | 21.67 | 21.20 | — | 21.20 | |
ठेव संलग्न विमा योजना | 1.20 | — | 1.20 | — | — | — | |
एकूण (2017-18) | 1636.12 | 1577.48 | 3213.60 | 1453.06 | 1418.32 | 2871.38 |