शासन आदेश / निर्णय यांचे संकलन असलेली ई पुस्तिका

मराठी भाषा विभागाशी संबंधित धोरणात्मक शासन आदेश / निर्णय यांचे संकलन असलेली ई पुस्तिका तयार करण्यात आली आहे. सदर पुस्तिकेमधे विभागाच्या स्थापनेपासून नोव्हेंबर २०२२ पर्यंतचे सारे शासन आदेश, निर्णय, अधिसूचना अशा विवीध बाबींचे एकत्रीकरण आहे. ही पुस्तिका डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा : https://marathi.gov.in/GR/book.pdf

0 Comments

लैंगिक छळ ऑनलाईन तक्रार

भारत सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाद्वारे कामाच्या ठिकाणी महिलाच्या लैंगिक छळ प्रतिबंध मनाई व निवारण अधिनियम-२०१३ अंतर्गत Sexual Harassment Electronic Box (She-Box) या ऑनलाईन तक्रारीची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर ठिकाणी तक्रार नोंदवण्यासाठी पुढील दुव्यावर जाऊन आवश्यक माहिती भरावी. Sexual Harassment Electronic Box (She-Box)

0 Comments

विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार – सन २०२० व श्री.पु.भागवत पुरस्कार – सन २०२० जाहीर

मराठी साहित्य / वाङ्मय क्षेत्रात भरीव व मोलाची कामगिरी करणाऱ्या नामवंत साहित्यिकास सन २०२० या वर्षासाठीचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार तसेच मराठी साहित्य निर्मिती क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या उत्कृष्ट प्रकाशन संस्थेस, सन २०२० या वर्षासाठीचा श्री.पु.भागवत पुरस्कार मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक पुरस–२०२१/प्र.क्र.६/भाषा–३, दि. ११ फेब्रुवारी २०२१ अन्वये जाहीर करण्यात आलेले आहेत‍. निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

0 Comments

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार २०१९ जाहीर

महाराष्ट्र शासनाकडून मराठी भाषेतील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील व राज्याबाहेरील ज्या लेखकांनी मराठी भाषेत वाङ्मय निर्मिती केली आहे अशा लेखकांकडून विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तके स्वीकारण्यात येतात. मराठी भाषा विभाग शासन निर्णय क्रमांक रावापु – २०२१/प्र.क्र.१/भाषा – ३, दि. २८ जानेवारी २०२१ अन्वये सन २०१९ या वर्षात निर्मिती करण्यात आलेल्या / प्रथम प्रकाशित झालेल्या मराठी साहित्यास दि. १० सप्टेंबर, २०१२ व दि. २ फेब्रुवारी, २०१६ च्या शासन निर्णयानुसार स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार-२०१९ जाहीर करण्यात आलेले आहेत‍. निकाल पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

0 Comments

९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन – यवतमाळ (२०१९)-अरूणा ढेरे यांचे भाषण 

९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - यवतमाळ (२०१९)-अरूणा ढेरे यांचे भाषण                                                                        ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - यवतमाळ (२०१९) येथे पार पडले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा  अरूणा ढेरे यांनी केलेले भाषण खालील लिंकवर उपलब्ध आहे.                                                        …

0 Comments

बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना..

राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून "बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसहाय्य योजना" कार्यान्वित करण्यात आली असून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

0 Comments

End of content

No more pages to load