भारती सृष्टीचे सौंदर्य

भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे दावीत सतत रुप आगळे वसंत वनांत जनांत हासे सृष्टीदेवी जाणू नाचे उल्हासे गातात संगीत पृथ्वीचे भाट चैऋ-वैशाखाचा ऐसा हा थाट ज्येष्ठ-आषाढात मेघांची दाटी कडाडे चपला होतसे वृष्टी घालाया सृष्टीला गंगल स्नान पूर अमृताचा सांडे वरुन गगनी नर्तन कृष्ण मेघांचे भूतली मयूर उत्तान नाचे श्रावणी पाऊस हास्याचा पडे श्रीकृष्ण-जन्मताची दंग उडे बांधिती वृक्षांना रम्य हिदोंळे कामिनी धरणी वैभवी लोळे - शांताराम आठवले

0 Comments

भारत अमुचा देश

भारत अमुचा देश, भारत अमुचा देव 'भारत अमुचा सत्यधर्म' हा मंत्र जपू हा एक भारतीय मी आहे आधी, आपण सारे एक आम्ही मराठी, आम्ही गुर्जर, मद्रासी, माळी हिंदी प्रांत आमुचा भाषा आमुची श्रेष्ठाचि सर्वांमधी दुराभिमाना देऊ असल्या पूर्ण छेदती रेघ धर्म-जातिच्या, जुन्या मनूच्या, जुन्या कल्पना सोडू उच्चनीचता गाडुन टाकू जाचक रुढिंना तोडू विशाल भारत स्वपूनीपनी त्याचा साकारु आलेख प्रांत, देश, या पुढेहि जाऊ, जुजु या मानवतेला मित्र जगाचे सार्या होऊ, मित्र करु या त्याला सत्य, अहिंसा, शांती यांचा संगम साधु सुरेश - विनायक रहातेकर

0 Comments

End of content

No more pages to load