मराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन) : सविस्तर बातमी
मराठी भाषेचा सर्वांगीण प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी तसेच, सर्वांमध्ये मराठीतून संवाद साधण्याची रुची निर्माण करण्यासाठी, दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी, जनतेला प्रोत्साहित करण्याकरिता "मराठी तितुका मेळवावा " या उदात्त हेतूने पहिले विश्व मराठी संमेलन दि. ४, ५ व ६ जानेवारी २०२३ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत आयोजित करण्यात आले होते. सदर विश्व संमेलनात परदेशस्थ मराठी उद्योजकांना प्रोत्साहित करणे तसेच त्यांच्यापैकी ज्या उद्योजकांना महाराष्ट्रामध्ये उद्योग सुरू करावयाचा असेल किंवा भांडवली गुंतवणूक करायची असेल तर त्या उद्योजकांना योग्य ती शासकीय मदत उपलब्ध करून देणे, लुप्त होत चाललेली वाद्य संस्कृती, खाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृती यांचे स्पर्धात्मक…