२ एप्रिल २०२२ रोजी गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मराठी भाषा भवनाच्या इमारतीच्या भूमीपूजनाचा सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाला.

मराठी भाषेचा विकास आणि संवर्धनासाठी चर्निरोड येथे मराठी भाषा भवन उभारण्यात येत आहे. भवनात मराठी भाषेची अभिजातता आणि कालखंडनिहाय समृद्धतेची ओळख निर्माण करून देणारे भाषिक तसेच वस्तू संग्रहालय निर्माण करण्यात येणार आहे. या वास्तूमधे २०० आसनक्षमतेचे बहुउद्देशीय सभागृह, १४५ प्रेक्षकांची क्षमता असलेले ऍम्फीथिएटर आणि चार मजल्यांवर प्रदर्शनासाठी जागा असेल.

मराठी भाषा विभागाच्या मा. मंत्रीमहोदयांनी ह्यासंदर्भात दिलेले मूळ पत्र खाली सादर केले आहे.

 

सबब महाराष्ट्रातील जनतेस विनंती करण्यात येत आहे की, सदर मराठी भाषा भवनाच्या भाषिक वस्तूसंग्रहालयासंदर्भात आपले बहुमोल अभिप्राय/सूचना थोडक्यात सुमारे १०० शब्दात सादर कराव्या. खालीलपैकी कुठलाही पर्याय वापरून तुम्ही सूचना सादर करू शकता.

लेखी सूचना

खालील पत्त्यावर आपण आपल्या सूचना पत्राद्वारे पाठवू शकता.

मराठी भाषा विभाग
नवीन प्रशासन भवन,
८ वा मजला, मादाम कामा मार्ग,
हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई-४०००३२.

इमेल द्वारे

मराठी भाषा विभागाच्या खालील अधिकृत इमेलवर आपण मेल करू शकता

sec.marathibhasha@maharashtra.gov.in

फॉर्म भरून

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक क्लिक करा आणि आपला अभिप्राय नोंदवा.

ऑनलाईन अभिप्राय