जाहीर आवाहन

महाराष्ट्र शासनाने विकसित महाराष्ट्र २०४७ असे व्हिजन निर्माण करण्याचे ठरविले असून त्यानुषंगाने नागरिकांकडून सूचना, कल्पना, संकल्पना तसेच याबाबतचे व्हिजन लोकसहभागातून निर्माण करण्याचे ठरविले आहे. मराठी भाषा विभागातर्फे विभागाचा मसुदा तयार करण्याचे काम सुरु आहे.

मराठी भाषा सर्वसमावेशक करण्याच्या दृष्टीने आपल्या काही सूचना, कल्पना, प्रकल्प, विचार असतील तर त्या मराठी भाषा विभागाच्या sec.marathibhasha@maharashtra.gov.in या ई मेल आयडी वर दि.१५.०६.२०२५ पर्यंत पाठवाव्यात असे आवाहन आपणांस करण्यात येत आहे.

Leave a Reply