वाचन प्रेरणा दिन-२०१९
वाचन प्रेरणा दिन-वाचन कट्टा
महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विभागतर्फे "मराठी भाषा पंधरवडा" दर वर्षी दि. १ जानेवारी ते १५ जानेवारी रोजी संपन्न होतो. मराठी भाषेच्या विकासाला चालना मिळावी ह्या दृष्टीन विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
ग्रंथ प्रसाराला चालना मिळण्याच्या हेतूने, तसेच त्यावर एकत्र येऊन विचार विनिमय करण्याच्या हेतूने न्या. रानडे यांनी लोकहितवादींच्या सहकार्याने १८७८ च्या मे महिन्यात ग्रंथकारांना एकत्र आणण्याचे ठरविले. त्यासाठीचे आवाहन ज्ञान प्रकाश (फेब्रुवारी ७, १८७८) मधे प्रसिद्ध झाले आणि या आवाहनानुसार मे ११, १८७८ रोजी सायंकाळी पुण्याच्या हिराबागेत मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन भरले. याला पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन समजले जाते. या संमेलनाचे अध्यक्ष पद न्या.रानडे यांनीच भूषविले. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची परंपरा अ.क्र. वर्ष ठिकाण अध्यक्षांचे नाव शासनाने मंजूर केलेले अनुदान १ १८७८ पुणे न्या. महादेव गोविंद रानडे - २ १८८५ पुणे कृष्णशास्त्री राजवाडे - ३ १९०५ सातारा रघुनाथ…
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत. भाषा प्राचीन आणि साहित्य श्रेष्ठ असावे भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावेत प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते. भारत सरकारने आत्तापर्यंत ६ भाषांना अभिजात दर्जा दिलेला आहे. तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि उडिया. मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरु झाल्या आणि प्रा. रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली. मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे…
महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० अंतर्गत मराठी भाषेतील प्रतिमुद्राधिकाराची (कॉपीराइटची) मुदत संपलेले दुर्मिळ ग्रंथ महाजालावर उपलब्ध करून द्यावे असे म्हटले आहे. त्यानुसार मराठी भाषा विभागाच्या आदेशाप्रमाणे (शासननिर्णय क्र. रासांधो १०१२/ प्र. क्र./ २०१२/भाषा-३ दि. २८ मार्च २०१३) राज्य मराठी विकास संस्थेद्वारे असे ग्रंथ आणि नियतकालिके महाजालावर उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प राबवण्यात येत आहे. ह्या प्रकल्पांतर्गत उपलब्ध होणारे ग्रंथ व नियतकालिके प्रतिमुद्राधिकार अधिनियमाची मुदत उलटलेले असल्याने सार्वजनिक स्वरूपात उपलब्ध आहेत. ही सामग्री विविध ग्रंथालयांनी जतन करून ठेवल्यामुळेच आज आपल्याला उपलब्ध होत आहे. अधिक माहितीसाठी राज्य मराठी विकास संस्थेच्या अधिकृत पानाला भेट द्या महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने डिजीटाइज केलेल्या पुस्तकांसाठी…