आंतरराष्ट्रीय मराठी प्रचार आणि प्रसार स्पर्धा

आंतरराष्ट्रीय मराठी प्रचार आणि प्रसार स्पर्धा

मराठी भाषेचा भारताबाहेर प्रसार व प्रचार करण्यासाठी तसेच विदेशात राहणाऱ्या मराठी माणसापर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रथमच मराठी भाषा विभागातर्फे विविध स्पर्धा आयोजित करत आहे. भारताबाहेरील रहिवासी या उपक्रमात social media द्वारे सहभागी होऊ शकतात.

पात्रता : विदेशातील (भारताबाहेर स्थित असलेले/NRI) नागरिक.
(भारतात स्थित असलेल्या नागरिकांसाठी वेगळी स्पर्धा आयोजित करण्यात येईल)

स्पर्धेचे स्वरूप

 • मराठी भाषे-बद्दल खालील स्वरूपात स्पर्धकांना आपले नामांकन देता येऊ शकते –
 • फेसबुक पोस्ट –
  • चलचित्रफीत/video : कमीत कमी १ मिनिट व जास्तीत जास्त २ मिनिट मध्ये मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारी चलचित्रफीत/विडिओ
  • निबंध : १००० ते १५०० शब्दात मराठी भाषेबद्दल निबंध
 • ट्विटर –
  • चलचित्रफीत : ट्विट स्वरूपात कमीत कमी १ मिनिट व जास्तीत जास्त २ मिनिट मध्ये मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारी चलचित्रफीत/विडिओ
  • ट्विट : मराठी बद्दल एक ट्विट
 • परकीय भाषा – स्थानिक नागरिक तिथल्या आंतरराष्ट्रीयभाषेत सुद्धा स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. मराठी भाषेबद्दल विदेशी नागरिक त्यांच्या मातृभाषेत संदेश देऊ शकतात. चलचित्रफितीस इंग्लिश किंवा मराठी subtitles देणे आवश्यक असेल. (उदाहरणार्थ : फ्रेंच भाषेतील व्हिडिओला ला subtitles असणे अपेक्षित आहे)

स्पर्धा कालावधी : १० मार्च २०२१ ते २७ एप्रिल २०२१

निकाल घोषणा :

 • १ मे २०२१ (महाराष्ट्र दिन) – online कार्यक्रमाद्वारे बक्षीस समारंभ
 • कोरोना-मुळे विस्कळीत झालेले जनजीवन व्यवस्थित झाले तर न्यू यॉर्क किंवा वॉशिंग्टन डीसी मध्ये बक्षीस समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात येईल

विशेष प्रमाणपत्र :

 • परकीय भाषेमध्ये मराठीचे महात्म्य सांगणाऱ्या स्पर्धकांना विशेष पुरस्कार देण्यात येईल
 • विदेशातील विविध मराठी मंडळ/संस्था या प्रकल्पात सहभागी होऊ शकतात, त्यांनी त्यांच्या social media द्वारे या स्पर्धेची जाहिरात केली व २० स्पर्धक प्रेरित केले तर त्यांना विशेष प्रमाणपत्र १ मे २०२१ रोजी देण्यात येईल
 • विदेशात प्रचार आणि प्रसारासाठी विशेष स्वयंसेवकांची गरज आहे व सर्व स्वयंसेवकांना विशेष प्रमाणपत्र देण्यात येईल
 • सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल, प्रमाणपत्रावर हवे असणारे नाव नमूद करणे आवश्यक आहे

नियम व अटी :

 • मराठी भाषेत किंवा मराठी भाषेबद्दलच पोस्ट/ट्विट असणे अपेक्षित आहे
 • सर्वात जास्त likes/comments आणि retweet झालेल्या व्यक्तीच बक्षीस पात्र असतील
 • कमीत कमी १० like आणि ५ retweet मिळालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल
 • स्पर्धेस पात्र असलेली फेसबुक पोस्ट आणि ट्विट सर्व लोकांना दिसेल अशी व्यवस्था privacy setting मध्ये करून ठेवणे आवश्यक आहे (पारदर्शकते साठी हि खूप महत्वाची बाब आहे)
 • स्पर्धकांनी विवादास्पद तसेच समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट केल्यास त्यांची पात्रता रद्द करण्यात येईल
 • स्पर्धेमध्ये बदल करण्याचे सर्व अधिकार मराठी भाषा विभागाकडे राखीव असतील
 • मराठी भाषा विभागाचा निर्णय अंतिम राहील

अधिक माहिती –

 • www.marathi.gov.in/nri
 • विदेशातील मराठी मंडळांसाठी तसेच व्यक्तिगत स्पर्धकांसाठी न्यू यॉर्क तसेच वॉशिंग्टन डीसी शहरात मार्च व एप्रिल मध्ये निःशुल्क कार्यक्रम आयोजित करण्यात येईल.
 • संपर्क : अभिषेक सूर्यवंशी abhishek.nricoordinator@marathi.gov.in