यंदाचे मराठी नववर्ष रविवार दि. ३० मार्च २०२५, चैत्र शुध्द प्रतिप्रदा म्हणजेच “गुढी पाडवा” रोजी सुरु होत आहे. या दिवसापासून “अभिजात मराठी, आपली मराठी” हा मराठी भाषा विभागाच्या विविध कामकाजविषयक माहिती सांगणारी मालिका दर रविवारी सकाळी ७:२५ मिनिटांनी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरुन प्रसारीत करण्यात येत आहे.

मराठी भाषेला दि. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अभिजात भाषेचा दर्जा केंद्र शासनाकडून मिळाला आणि मराठी प्रेमीमध्ये आनंदाची लाट पसरली. मराठी प्रेमींची अस्मिता सुखावली. मराठी भाषा विभागाकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. मराठी भाषा विभागाअंतर्गत क्षेत्रिय कार्यालये, त्यांचे कामकाज, योजना भावी कोणते उपक्रम राबविता येतील, याबाबत विभागाचे मा. सचिव महोदय डॉ. श्री. किरण कुलकर्णी (भाप्रसे) यांच्याकडून जाणून घेऊ या. सदर मुलाखत घेतली आहे, श्रीमती वासंती काळे यांनी!


दि. ६ एप्रिल २०२५

जैसी दीपांमाजी दिवटी । का तिथींमाजी पूर्णिमा गोमटी ।।
तैसी भाषांमध्ये मऱ्हाटी। सर्वोत्तम ।।

संत ज्ञानेश्वर यांच्या ओळी मऱ्हाटी सवौत्तम असल्याचे सांगतात.  या सर्वोत्तम भाषेतील उत्तम दुर्मिळ पुस्तकांचा ठेवा प्रकाशित करणे, साहित्य संमेलनांना अनुदान देणे, यासारख्या अनेक योजना मराठी भाषा विभागांतर्गत असलेल्या “साहित्य संस्कृती मंडळाकडून” राबविल्या जातात.  साहित्य संस्कृती मंडळाची रचना आणि कामकाजाविषयी अधिक जाणून घेवू या, साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव – डॉ. मीनाक्षी पाटील यांच्या कडून!  ही मुलाखत घेतली आहेवासंती काळे यांनी.

सदर मुलाखत आकाशवाणी मुंबईच्या अस्मितावाहिनी आणि महाराष्ट्रातील 22 आकाशवाणी केंद्रावरुन एकाचवेळी रविवारी दि. 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 7.25 वाजता प्रसारीत झाली होती.


दि. १३ एप्रिल २०२५

“अभिजात मराठी आपली मराठी” ह्या सदरातील तिसरी मुलाखत या आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरुन आणि महाराष्ट्रातील 22 केंद्रावरुन दि. 13 एप्रिल 2025 रोजी प्रसारीत झाली. महाराष्ट्र राज्याच्या भाषा संचालक डॉ. विजया डोनीकर यांची भाषा संचालनालयाच्या अंतर्गत चालणाऱ्या विविध कामकाजाविषयी मुलाखत   श्रीमती वासंती काळे यांनी घेतली होती.


दि. २० एप्रिल २०२५

“अभिजात मराठी आपली मराठी” या आकाशवाणीच्या प्रायोजित कार्यक्रमात  महाराष्ट्र राज्याचे सहायक भाषा संचालक श्री.संतोष गोसावी यांची भाषा संचालनालयाच्या अंतर्गत चालणाऱ्या  कामकाजाविषयी मुलाखत  प्रसारीत झाली. यात भारताचे संवितधान आणि संसदेत पारित होणारे विविध कायदे  यांचे मराठी भाषेत उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी भाषा संचालनालय पार पाडते, ही प्रक्रिया श्री. संतोष गोसावी यांच्या  मुलाखतीतून आपण समजवून घेणार आहेत. सदर मुलाखत श्रीमती वासंती काळे यांनी घेतली असून आकाशवाणी मुंबईच्या  अस्मिता वाहिनीवरुन आणि महाराष्ट्रातील 22 केंद्रावरुन दि. 20 एप्रिल 2025 रोजी  एकाचवेळी प्रसारीत झाली आहे.


दि. २७ एप्रिल २०२५

महाराष्ट्र राज्याची राजभाषा मराठी भाषेचा वापर शासन व्यवहारात कसा केला जातो, त्यासठी भाषा संचालनालय मराठीचे काम शासन व्यवहारात करते, म्हणजे नेमके काय करते हे जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या अंतर्गत असलेल्या भाषा संचालनाच्या मुंबई व कोकण विभागाचे सहायक भाषा संचालक श्री. योगेश शेट्ये यांना आकाशवाणी केंद्रावर  निमंत्रित केले आहे. त्यांच्याशी संवाद साधला आहे, श्रीमती वासंती काळे यांनी.


दि. ४ मे २०२५

महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे सचिव डॉ.श्री. शामकांत देवरे यांची  विश्वकोश स्थापना, कार्य , उद्दिष्ट, लोकाभिमुख कार्य, विश्वकोश खंड याबाबत माहिती देणारी मुलाखत श्रीमती वासंती काळे यांनी घेतली. सदर मुलाखतीचे रेकॉर्डिंग मराठी भाषा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


दि. ११ मे २०२५

राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.श्री. शामकांत देवरे यांची त्या संस्थेची  स्थापना, कार्य, उद्दिष्ट, लोकाभिमुख कार्य, राबविण्यात येणारे विविध प्रकल्प याबाबत माहिती देणारी मुलाखत श्रीमती वासंती काळे यांनी घेतली असून सदर मुलाखतीचे ध्वनीमुद्रण मराठी भाषा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


दि. ११ मे २०२५

पुस्तकांचे गांव व कवितांचे गांव या योजनेविषयी माहिती देणारी श्रीमती ऐश्वर्या गोवेकर, कक्ष अधिकारी यांची वासंती काळे यांनी घेतलेली मुलाखत आकाशवाणी मुंबईच्या  अस्मिता वाहिनी आणि एकाचवेळी 22 केंद्रावरुन सकाळी 7.25 वाजता प्रसारीत झाली. तीचे ध्वनीमुद्रण


दि. २५ मे २०२५

भाषा संचालनालयातील अनुवादक डॉ.श्री.संजय पवार यांची मराठी भाषा व रोजगाराच्या संधी या विषयी श्रीमती वासंती काळे यांनी घेतलेल्या  मुलाखतीचा पहिला भाग आकाशवाणी मुंबईच्या  अस्मिता वाहिनी आणि एकाचवेळी 22 केंद्रावरुन सकाळी 7.25 वाजता प्रसारीत झाला. त्या भागाचे ध्वनीमुद्रण


दि. ३१ मे २०२५

भाषा संचालनालयातील अनुवादक डॉ.श्री.संजय पवार यांची “मराठी भाषा व रोजगाराच्या संधी” या विषयी श्रीमती वासंती काळे यांनी घेतलेल्या  मुलाखतीचा  दुसरा  भाग आकाशवाणी मुंबईच्या  अस्मिता वाहिनी आणि एकाच वेळी 22 केंद्रावरुन सकाळी 7.25 वाजता प्रसारीत झाला. त्या भागाचे ध्वनीमुद्रण ..


दि. ८ जून २०२५

प्रशासकीय कामकाजात  मराठी भाषेचा वापर वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेले राजभाषा अधिनियम , अधिनियमात करण्यात आलेल्या सुधारणा, केंद्रशासनाचे त्रिभाषा सूत्र  याबाबत श्रीमती उर्मिला धादवड, अवर सचिव, मराठी भाषा विभाग यांची दि. 8 जून 2025 रोजी प्रसारीत झालेली मुलाखत. सदर मुलाखत घेतली आहे वासंती काळे यांनी.


दि. १५ जून २०२५

“मराठी भाषा पंधरवडा आणि बाल-कुमार भाषा मेळावा”  या विषयावर राज्य मराठी विकास संस्थेच्या उप संचालक श्रीमती अंजली ढमाळ  यांची दि. 15  जून 2025 रोजी प्रसारीत झालेली  आणि वासंती काळे यांनी घेतलेली मुलाखत उपलब्ध करुन देत आहोत.

 

अधिक मुलाखती ऐकण्यासाठी ह्या पानाला बुकमार्क करा…