शासन परिपत्रक –
शासन परिपत्रक, मराठी भाषा विभाग, क्रमांक-माअनि-२०१८/प्र.क्र.१२८/आस्था-१, दिनांक ०५ सप्टेंबर, २०१८ अधिक्रमित करुन या शासन परिपत्रकान्वये मराठी भाषा विभागासाठी (खुद्द) “परिशिष्ट – अ” मध्ये नमूद अधिकारी / कर्मचारी यांची माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ कलम ५ (१) व ५ (२) अन्वये अनुक्रमे राज्य जन माहिती अधिकारी व राज्य सहायक जन माहिती अधिकारी तसेच कलम १९(१) अन्वये अपिलीय प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. सदर आदेश तात्काळ अंमलात येतील.
२. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांंक २०१९०८२८१५३३०६७६३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
सही /- ( अपर्णा अ.गावडे ) सह सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत,
परिशिष्ट-अ
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ कलम ५ (१) व ५ (२) व कलम १९ (१) अन्वये घोषित करण्यात आलेले राज्य सहायक जन माहिती अधिकारी व राज्य जन माहिती अधिकारी तसेच अपिलीय प्राधिकारी यांची यादी.
अ. क्र. | कार्यासननिहाय महत्वाचे विषय | राज्य सहायक जन माहिती अधिकारी | राज्य जन माहिती अधिकारी | अपिलीय अधिकारी |
१. |
आस्था-१ मराठी भाषा विभाग (खुद्द) आस्थापना विषयक बाबी. |
सहायक कक्ष अधिकारी आस्था-१ दू.क्र.२२७९४१७० | कक्ष अधिकारी, आस्था-१ दू.क्र.२२७९४१७० | अवर सचिव (आस्थापना) दू.क्र.२२७९४१६४ |
२. |
आस्था-२ भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था या क्षेत्रीय कार्यालयांच्या सर्व आस्थापना विषयक बाबी |
सहायक कक्ष अधिकारी, आस्था-२ दू.क्र.२२७९४१६९ | कक्ष अधिकारी, आस्था-२ दू.क्र.२२७९४१६९ | अवर सचिव (आस्थापना) दू.क्र.२२७९४१६४ |
३. |
रोखशाखा १) मराठी भाषा विभागातील अधिकारी/कर्मचारी यांची देयके व अन्य देयके आहरण व संवितरण २) मराठी भाषा विभाग (खुद्द) खर्चमेळ्याची कामे ३) सेवा पुस्तकाच्या सर्व नोंदी जतन करणे. |
सहायक कक्ष अधिकारी / रोख लेखापाल , रोखशाखा दू.क्र.२२७९४२६७ | कक्ष अधिकारी, रोखशाखा दू.क्र.२२७९४२६७ | अवर सचिव (आस्थापना) दू.क्र.२२७९४१६४ |
४. |
अर्थसंकल्प शाखा १) विभाग (खुद्द) व क्षेत्रीय कार्यालयांचे अर्थसंकल्पीय अंदाज (सुधारित अर्थसंकल्पासह) व तद्नुषंगिक इतर सर्व बाबी व समन्वय. २) विनियोजन लेखे |
सहायक कक्ष अधिकारी, अर्थसंकल्प शाखा दू.क्र.२२७९४१६८ | कक्ष अधिकारी, अर्थसंकल्प शाखा दू.क्र.२२७९४१६८ | अवर सचिव (गृह व्यवस्थापन) दू.क्र.२२७९४१६५ |
५. |
नोंदणी शाखा १) विभागात आलेले टपाल/नस्त्या यांची आवक-जावक (गोपनीय टपालासह) नोंदी ठेवणे व त्यांचे कार्यासन निहाय वाटप करणे. २) मराठी भाषा विभागातील अभिलेख्यांची नोंदणी व जतन ३) विधानमंडळ कामकाजाशी संबंधित समन्वयाची कामे व विभागांतर्गत एकपेक्षा अधिक कार्यासनांशी संबंधित कामकाजाचे समन्वय |
सहायक कक्ष अधिकारी, नोंदणीशाखा दू.क्र.२२७९४१६९ | कक्ष अधिकारी, नोंदणीशाखा दू.क्र.२२७९४१६९
|
अवर सचिव (गृह व्यवस्थापन) दू.क्र.२२७९४१६५ |
६. |
भाषा-१ विभागांतर्गत स्थापन केलेल्या समित्यांचे कामकाज, अभिजात भाषा विषयक कामकाज, मराठी भाषा धोरण विषयक कामकाज |
सहायक कक्ष अधिकारी भाषा-१ दू.क्र.२२७९४१६८ | कक्ष अधिकारी, भाषा-१ दू.क्र.२२७९४१६८ | अवर सचिव (गृह व्यवस्थापन) दू.क्र.२२७९४१६५ |
७. |
भाषा-२ भाषा संचालनालय आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे आस्थापना विषयक कामकाज वगळून इतर सर्व कामकाज |
सहायक कक्ष अधिकारी भाषा-२ दू.क्र.२२७९४१७० | कक्ष अधिकारी, भाषा-२ दू.क्र.२२७९४१७० | अवर सचिव (भाषा) दू.क्र.२२७९४१६६ |
८. |
भाषा-३ महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्था या कार्यालयांचे आस्थापना विषयक कामकाज वगळून इतर सर्व कामकाज |
सहायक कक्ष अधिकारी भाषा-३ दू.क्र.२२७९४१६८ | कक्ष अधिकारी भाषा-३ दू.क्र.२२७९४१६८ | अवर सचिव (भाषा) दू.क्र.२२७९४१६६ |