This slideshow requires JavaScript.

मराठी भाषेचा सर्वांगीण प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी तसेच, सर्वांमध्ये मराठीतून संवाद साधण्याची रुची निर्माण करण्यासाठी, दैनंदिन वापरामध्ये मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करण्यासाठी, जनतेला प्रोत्साहित करण्याकरिता “मराठी तितुका मेळवावा ” या उदात्त हेतूने पहिले विश्व मराठी संमेलन दि. ४, ५ व ६ जानेवारी २०२३ रोजी मुंबई येथे महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत आयोजित करण्यात आले होते.

सदर विश्व संमेलनात परदेशस्थ मराठी उद्योजकांना प्रोत्साहित करणे तसेच त्यांच्यापैकी ज्या उद्योजकांना महाराष्ट्रामध्ये उद्योग सुरू करावयाचा असेल किंवा भांडवली गुंतवणूक करायची असेल तर त्या उद्योजकांना योग्य ती शासकीय मदत उपलब्ध करून देणे, लुप्त होत चाललेली वाद्य संस्कृती, खाद्य संस्कृती, वस्त्र संस्कृती यांचे स्पर्धात्मक सादरीकरण तसेच मराठी साहित्य, कला, संगीत या सर्व सांस्कृतिक अंगांचा परामर्ष घेणे हा सुध्दा या संमेलनाच्या आयोजनाचा हेतू आहे. यामध्ये मराठी पारंपरिक खेळ (लेझीम, ढोल, ताशे), मराठी पारंपरिक मनोरंजन (नाटक, लावणी, लोकसंगीत), समग्र मराठी साहित्याचे प्रतिनिधित्व करणारे भव्य ग्रंथ प्रदर्शन, मराठी भाषिक खेळ व स्पर्धा अशा नानाविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सदर संमेलनात पार पडलेले विविध कार्यक्रम आपण खाली दिलेल्या दुव्यांवर पाहू शकता.

उदघाटनाच्या सुरवातीला ढोलताशा पथक,  लेझीम पथक प्रात्यक्षिक, दांडपट्टा – तलवारबाजी यांचे प्रात्यक्षिकं


परिसंवाद १ – मराठी भाषा काल, आज, उद्या | मराठी नाट्य चित्र सृष्टीतील कलाकारांच्या मुलाखती | मराठी वस्त्रालंकारांचा मराठमोळा फॅशन शो – विविध क्षेत्रातील १० महिला | मराठीचा झेंडा अटकेपार – परदेशातील निमंत्रितांचे अनुभव कथन


लोकसंगीत कार्यक्रम


चला हसूया


स्वर अमृताचा भावगीत, भक्तीगीत आणि नाट्यसंगीताची मैफल | परिसंवाद २ – मराठी पाऊल पडते पुढे (भारतातील २ आणि भारताबाहेरील २ उद्योजक) | आकाशझेप – विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती


वाद्यमहोत्सव – “महाताल” | समाज माध्यम क्षेत्रातील मान्यवरांसोबत चर्चा | हास्यजत्रा | मराठीचा झेंडा अटकेपार – परदेशातील निमंत्रितांचे अनुभव कथन | वाद्य जुगलबंदी – संबळ व हलगी वादन करणारे विविध लोककलाकार | महासंस्कृती लोकोत्सव – विविध कला सादर करणारे २०० ते २५० कलाकार, विशेष सहभाग : वैशाली सामंत संगीत


इन्व्हेस्टर मीट – केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी, उद्योगमंत्री श्री. उदय सामंत, मराठी भाषा मंत्री श्री. दीपक केसरकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते उद्योजकांचा सत्कार | आनंदयात्री कविता वाचन, अभिवाचन आणि गाण्यांचा कार्यक्रम | दिंडी


मुलाखत – गप्पाष्टक (सहभाग – अंजली भागवत, संजय मोने, सिद्धार्थ जाधव, चित्रकार सुहास बहुळकर, लेखक आणि IT तज्ञ अच्युत गोडबोले) | अप्सरा आली – लावणीचा बहारदार कार्यक्रम | मराठीचा झेंडा अटकेपार – परदेशातील निमंत्रितांचे अनुभव कथन | आदरणीय मंत्री तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत समारोप समारंभ तसेच उपस्थित लोकांशी चर्चा

Leave a Reply