माजी राष्ट्रपती स्व.डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने दिनांक १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने यावर्षी राज्य मराठी विकास संस्था (मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन) व माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनव कल्याण यांची प्रस्तुती असलेला “साहित्ययान मैफल” हा कार्यक्रम दिनांक १५ व १६ ऑक्टोबरच्या संध्याकाळी ६ वा. विविध ऑनलाइन माध्यमांतून प्रसारित होणार आहे. हा कार्यक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या, तसेच ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वेबसाइटवरूनही अनुभवता येईल.येथे पाहा कार्यक्रम —http://www.youtube.com/maharashtradgipr या यूट्युब चॅनेलवरही हा कार्यक्रम थेट बघता येईल.

Leave a Reply